1प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही निर्माण केली.2पृथ्वी अंदाधुंद व रिकामी होती. जलाशयावर अंधकार होता, देवाचा आत्मा+ किंवा देवाची शक्ति पाण्यावर पाखर घालत होता.3देव बोलला, “प्रकाश होवो” आणि प्रकाश झाला.4देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे. देवाने अंधकारापासून प्रकाश वेगळा केला.5देवाने प्रकाशाला “दिवस” व अंधकाराला “रात्र” असे नाव दिले. संध्याकाळ झाली व सकाळ झाली+ यहूदी लोकांचा दिवस संध्याकाळी सुरु होत असे , हा पहिला दिवस.6देव बोलला, “जलांच्या मध्यभागी अंतराळ होवो व ते जलापासून जलांची विभागणी करो.”7देवाने अंतराळ केले आणि अंतराळावरच्या व अंतराळाखालच्या जलांची विभागणी केली व तसे झाले.8देवाने अंतराळास आकाश असे म्हटले. संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा दुसरा दिवस.9नंतर देव बोलला, “आकाशाखालील पाणी एकाजागी एकत्र जमा होवो व कोरडी जमीन दिसून येवो,” आणि तसे झाले.10देवाने कोरड्या जमिनीस भूमी आणि एकत्र झालेल्या पाण्याच्या संचयास समुद्र असे म्हटले. त्याने पाहिले की हे चांगले आहे.11देव बोलला, “हिरवळ, बीज देणाऱ्या वनस्पती, आणि आपआपल्या जातीप्रमाणे, ज्यात त्याचे बीज आहे अशी फळे देणारी फळझाडे, ही पृथ्वीवर येवोत.” आणि तसेच झाले.12पृथ्वीने हिरवळ, आपापल्या जातीचे बीज देणाऱ्या वनस्पती आणि आपापल्या जातीची फळे देणारी व त्या फळातच आपापल्या जातीचे बीज असणारी फळझाडे भूमीने उत्पन्न केली. देवाने पाहिले की हे चांगले आहे.13संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा तिसरा दिवस.14मग देव बोलला, “दिवस व रात्र ही वेगळी करण्यासाठी आकाशात ज्योति होवोत व त्या चिन्हे, ऋतू, दिवस, आणि वर्षे दाखविणाऱ्या होवोत.15पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी आकाशात त्या दीपाप्रमाणे होवोत,” आणि तसे झाले.16दिवसावर सत्ता चालविण्यासाठी मोठी ज्योत आणि रात्रीवर सत्ता चालविण्यासाठी लहान ज्योत, अशा दोन मोठ्या ज्योती देवाने निर्माण केल्या. त्याने तारेही निर्माण केले.17-18पृथ्वीवर प्रकाश देण्यासाठी, दिवसावर व रात्रीवर सत्ता चालविण्यासाठी, प्रकाश व अंधकार वेगळे करण्यासाठी देवाने त्यांना अंतराळात ठेवले. देवाने पाहिले की हे चांगले आहे.19संध्याकाळ झाली व सकाळ झाली. हा चौथा दिवस.20देव बोलला, “जले जीवजंतूनी भरून जावोत, आणि पृथ्वीच्या वर आकाशाच्या अंतराळात पक्षी उडोत.”21समुद्रातील फार मोठे जलचर व अनेक प्रकारचे जलप्राणी त्यांच्या त्यांच्या जातींप्रमाणे देवाने उत्पन्न केले. तसेच पंख असलेल्या प्रत्येक पक्षाला त्याच्या जातीप्रमाणे देवाने उत्पन्न केले. देवाने पाहिले की हे चांगले आहे.22देवाने त्यांना आशीर्वाद देऊन म्हटले, “फलद्रूप व्हा आणि बहुगुणित व्हा, समुद्रातील पाणी व्यापून टाका. पृथ्वीवर पक्षी बहुगुणित होवोत.”23संध्याकाळ झाली व सकाळ झाली हा पाचवा दिवस.24देव बोलला, “आपापल्या जातीचे सजीव प्राणी, गुरेढोरे, सरपटणारे प्राणी व वनपशू पृथ्वी उपजवो.” आणि तसे झाले.25देवाने पृथ्वीवरील जनावरे, गुरेढोरे, वनपशू, आणि सरपटणारा प्रत्येक जीव त्याच्या त्याच्या जाती प्रमाणे निर्माण केला. देवाने पाहिले की हे चांगले आहे.26देव बोलला, “आपण आपल्या प्रतिरूपाचा आपल्या सारखा मनुष्य निर्माण करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, सर्व वनपशू, मोठी जनावरे व जमिनीवर सरपटणारे सर्व लहान प्राणी यांच्यावर त्यांना सत्ता चालवू देऊ.”
1त्यानंतर पृथ्वी, आकाश आणि त्यातील सर्वकाही पूर्ण करून झाले, आणि सर्वकाही जिवंत जिवांनी भरून गेले+ अशाप्रकारे सर्व बाबींची उत्पत्ती झाली .2देवाने सातव्या दिवशी आपण करीत असलेले काम समाप्त केले, आणि जे त्याने केले होते त्या त्याच्या कामापासून त्याने सातव्या दिवशी विसावा घेतला.3देवाने सातव्या दिवसास आशीर्वाद दिला आणि तो पवित्र केला, कारण देवाने त्याचे निर्मितीचे जे सर्व काम केले होते त्या आपल्या कामापासून त्या दिवशी त्याने विसावा घेतला.4परमेश्वर देवाने ज्या दिवशी ते निर्माण केले, तेव्हाचा आकाश व पृथ्वीसंबंधीच्या घटनाक्रमाविषयीचा वृत्तान्त हा आहे.5शेतातील कोणतेही झुडूप अजून पृथ्वीवर नव्हते, आणि शेतातील कोणतीही वनस्पती अजून उगवली नव्हती, कारण परमेश्वर देवाने अद्याप पृथ्वीवर पाऊस पाडला नव्हता आणि जमिनीची मशागत करण्यास कोणी मनुष्य नव्हता.6पण पृथ्वीवरुन धुके+ प्रवाह वर जात असे व त्याने सर्व जमिनीचा पृष्ठभाग पाण्याने भिजवला जात असे.7परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला आणि मनुष्य जीवंत प्राणी झाला.
1परमेश्वर देवाने निर्माण केलेल्या सर्व वनपशूंमध्ये सर्प हा अतिशय धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, “‘बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नका’ असे देवाने तुम्हास खरोखरच सांगितले आहे काय?”2स्त्रीने सर्पाला उत्तर दिले, “बागेतल्या झाडांची फळे आम्ही खाऊ शकतो.3परंतु बागेच्या मधोमध जे झाड आहे, त्याच्या फळाविषयी देवाने म्हटले, ते खाऊ नका. त्या झाडाला स्पर्शही करू नका, नाहीतर तुम्ही मराल.”4सर्प त्या स्त्रीला म्हणाला, “तुम्ही खरोखर मरणार नाही.5कारण देवास हे माहीत आहे की, जर तुम्ही त्या झाडाचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील, व तुम्ही देवांसारखे बरेवाईट जाणणारे व्हाल.”6आणि स्त्रीने पाहिले की, त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले व डोळ्यांना आनंद देणारे व शहाणे करण्यासाठी इष्ट आहे, तेव्हा तिने त्याचे काही फळ घेऊन खाल्ले. आणि तिने आपल्याबरोबर आपल्या पतीसही त्या फळातून थोडे दिले व त्याने ते खाल्ले.7तेव्हा त्या दोघांचे डोळे उघडले व आपण नग्न आहोत असे त्यांना समजले; तेव्हा त्यांनी अंजिराची पाने एकत्र जोडून आपणाला झाकण्यासाठी वस्त्रे तयार केली.8दिवसाचा थंड वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत आला. त्या वेळी त्यांनी त्याचा आवाज ऐकला. आणि परमेश्वर देवाच्या समक्षतेपासून दृष्टीआड व्हावे म्हणून मनुष्य व त्याची पत्नी बागेच्या झाडांमध्ये लपली.9तेव्हा परमेश्वर देवाने मनुष्यास हाक मारुन म्हटले, “तू कोठे आहेस?”10मनुष्य म्हणाला, “बागेत मी तुझा आवाज ऐकला व मला भीती वाटली, कारण मी नग्न होतो. म्हणून मी लपलो.”11परमेश्वर त्यास म्हणाला, “तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या झाडाचे फळ तू खाऊ नकोस अशी मी तुला आज्ञा दिली होती त्या झाडाचे फळ तू खाल्लेस काय?”12मनुष्य म्हणाला, “तू ही स्त्री माझ्या सोबतीस म्हणून दिलीस, तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि म्हणून मी ते खाल्ले.”13मग परमेश्वर देव त्या स्त्रीस म्हणाला, “तू हे काय केलेस?” ती स्त्री म्हणाली, “सर्पाने मला फसवले व म्हणून मी ते फळ खाल्ले.”14परमेश्वर देव सर्पास म्हणाला, “तू हे केल्यामुळे सर्व गुरेढोरांमध्ये व सर्व वन्यपशूंमध्ये तू शापित आहेस. तू पोटाने सरपटत चालशील आणि आयुष्यभर तू माती खाशील.15तुझ्यामध्ये व स्त्रीमध्ये आणि तुझ्या बीजामध्ये + संतानामध्ये व स्त्रीच्या बीजामध्ये+ संतानामध्ये मी शत्रुत्व ठेवीन. तो तुझे डोके ठेचील आणि तू त्याची टाच फोडशील.”16परमेश्वर देव स्त्रीस म्हणाला, “मुलांना जन्म देते वेळी तुझ्या वेदना मी खूप वाढवीन तरी तुझी ओढ तुझ्या नवऱ्याकडे राहील; आणि तो तुझ्यावर अधिकार चालवील.”1717 नंतर परमेश्वर देव आदामाला म्हणाला, तू तुझ्या पत्नीची वाणी ऐकली आहे आणि ज्या झाडाचे फळ खाऊ नकोस अशी आज्ञा दिलेली होती, त्या झाडाचे फळ तू खाल्ले आहेस. म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे. तू तिजपासून अन्न मिळवण्यासाठी आपल्या आयुष्याचे सर्व दिवस कष्ट करशील; 18जमीन तुझ्यासाठी काटे व कुसळे उत्पन्न करील आणि शेतातील वनस्पती तुला खाव्या लागतील.19तू माघारी जमिनीमध्ये जाशील तोपर्यंत तू आपल्या निढळाच्या घामाने भाकर खाशील, तू मरणाच्या दिवसापर्यंत अतिशय काम करशील. कारण मातीमधून तू निर्माण झालेला आहेस; आणि मातीमध्ये तू परत जाशील.20आदामाने आपल्या पत्नीचे नाव हव्वा + अर्थ-जीवन ठेवले, कारण सर्व जीवंत मनुष्यांची ती आई होती.21परमेश्वर देवाने आदाम व त्याच्या पत्नीसाठी चामड्यांची वस्त्रे केली; आणि ती त्यांना घातली.22परमेश्वर देव म्हणाला, “पाहा, मनुष्य आपल्यातल्या एका सारखा होऊन त्यास बरे व वाईट समजू लागले आहे. तर आता त्यास त्याच्या हातांनी जीवनाच्या झाडावरून ते फळ घेऊन खाऊ देऊ नये, आणि जर का तो ते फळ खाईल तर मग सदासर्वकाळ तो जीवंत राहील.”23तेव्हा परमेश्वर देवाने मनुष्यास ज्या जमिनीतून उत्पन्न केले होते तिची मशागत करण्यासाठी एदेन बागेतून बाहेर घालवून दिले.24देवाने मनुष्यास बागेतून घालवले, आणि जीवनाच्या झाडाचे रक्षण करण्यासाठी त्याने एदेन बागेच्या पूर्वेकडे करूब ठेवले, आणि सर्व दिशांनी गरगर फिरणारी ज्वालारूप एक तलवार ठेवली.
1मनुष्याने त्याची पत्नी हव्वा हिच्यासोबत वैवाहिक संबंध केला. ती गर्भवती झाली आणि तिने काइनाला जन्म दिला. तेव्हा ती म्हणाली, परमेश्वराच्या साहाय्याने मला पुरुषसंतान लाभले आहे.2त्यानंतर तिने काइनाचा भाऊ हाबेल याला जन्म दिला. आणि हाबेल मेंढपाळ बनला, पण काइन शेतातील कामकरी झाला.3काही काळानंतर काइनाने परमेश्वरास शेतामधील फळांतले काही अर्पण आणले.4हाबेलानेही आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यांतून, आणि पुष्टातून अर्पण आणले. परमेश्वराने हाबेल आणि त्याचे अर्पण स्विकारले.5परंतु त्याने काइन आणि त्याचे अर्पण स्विकारले नाही. यामुळे काइनाला फार राग आला, आणि त्याचे तोंड उतरले.6परमेश्वर काइनाला म्हणाला, “तू का रागावलास? तुझा चेहरा का उतरला आहे?7तू जर चांगल्या गोष्टी करशील तर, मग तुझाही स्विकार केला जाणार नाही का? परंतु तू जर योग्य ते करणार नाहीस, तर पाप दाराशी टपून बसले आहे आणि त्याची तुझ्यावर ताबा मिळवण्याची इच्छा आहे, परंतु तू त्यावर नियंत्रण केले पाहिजेस.”8काइन आपला भाऊ हाबेल याच्याशी बोलला, आणि असे झाले की ते शेतात असता, काइन आपला भाऊ हाबेल ह्याच्या विरूद्ध उठला व त्यास त्याने ठार मारले.9परमेश्वर काइनास म्हणाला, “तुझा भाऊ हाबेल कोठे आहे?” काइनाने उत्तर दिले, “मला माहीत नाही; मी माझ्या भावाचा राखणदार आहे काय?”10देव म्हणाला, “तू हे काय केलेस? तुझ्या भावाच्या रक्ताची वाणी जमिनीतून शिक्षेसाठी ओरड करत आहे.11तर आता तुझ्या हातून तुझ्या भावाचे पडलेले रक्त स्विकारण्यास ज्या जमिनीने आपले तोंड उघडले आहे, तिचा तुला शाप आहे.12जेव्हा तू जमिनीची मशागत करशील तेव्हा ती आपले सत्व यापुढे तुला देणार नाही. पृथ्वीवर तू भटकत राहशील व निर्वासित होशील.”13काइन परमेश्वरास म्हणाला, “माझी शिक्षा मी सहन करण्यापलिकडे, इतकी मोठी ती आहे.14खरोखर, तू मला या माझ्या भूमीवरून हाकलून लावले आहेस, आणि तुझ्या जवळ मला येता येणार नाही. पृथ्वीवर तू मला भटकणारा व निर्वासित केले आणि जर मी कोणाच्या हाती सापडेन तर तो मला ठार मारून टाकेल.”15परमेश्वर त्यास म्हणाला, “जर कोणी काइनाला ठार मारील तर त्याचा सातपट सूड घेण्यात येईल.” त्यानंतर, तो कोणाला सापडला तर त्यास कोणी जिवे मारू नये म्हणून, परमेश्वराने काइनावर एक खूण करून ठेवली.
1आदामाच्या वंशावळीची नोंद अशी आहे. देवाने मनुष्य निर्माण केला त्या दिवशी त्याने आपल्या प्रतिरूपाचा म्हणजे आपल्यासारखा तो केला.2त्यांना नर व नारी असे उत्पन्न केले. त्यांना आशीर्वाद दिला व त्यांना निर्माण केले त्या वेळी त्यांना आदाम हे नाव दिले.3आदाम एकशे तीस वर्षांचा झाल्यावर त्यास त्याच्या प्रतिरूपाचा म्हणजे त्याच्या सारखा दिसणारा मुलगा झाला. त्याने त्याचे नाव शेथ ठेवले; 4शेथ जन्मल्यानंतर आदाम आठशे वर्षे जगला आणि या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या.5अशा रीतीने आदाम एकंदर नऊशें तीस वर्षे जगला; नंतर तो मरण पावला.6शेथ एकशे पाच वर्षांचा झाल्यावर त्यास अनोश झाला7अनोश झाल्यानंतर शेथ आठशेसात वर्षे जगला, त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या; 8शेथ एकंदर नऊशेंबारा वर्षे जगला, मग तो मरण पावला.9अनोश नव्वद वर्षांचा झाल्यावर त्यास केनान झाला; 10केनान झाल्यानंतर अनोश आठशेपंधरा वर्षे जगला; त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या; 11अनोश एकंदर नऊशेंपाच वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला.12केनान सत्तर वर्षांचा झाल्यावर तो महललेलाचा पिता झाला; 13महललेल झाल्यावर केनान आठशेचाळीस वर्षे जगला; त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या; 14केनान एकंदर नऊशेंदहा वर्षे जगला, नंतर तो मरण पावला.15महललेल पासष्ट वर्षांचा झाल्यावर तो यारेदाचा पिता झाला; 16यारेद जन्मल्यानंतर महललेल आठशेतीस वर्षे जगला; त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या; 17महललेल एकंदर आठशे पंचाण्णव वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला.18यारेद एकशे बासष्ट वर्षांचा झाल्यावर तो हनोखाचा पिता झाला; 19हनोख झाल्यावर यारेद आठशे वर्षे जगला; त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या; 20यारेद एकंदर नऊशें बासष्ट वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला.21हनोख पासष्ट वर्षांचा झाल्यावर त्यास मथुशलह झाला; 22मथुशलह जन्मल्यावर हनोख तीनशे वर्षे देवाबरोबर चालला. त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या; 23हनोख एकंदर तीनशे पासष्ट वर्षे जगला; 24हनोख देवाबरोबर चालला, आणि त्यानंतर तो दिसला नाही, कारण देवाने त्यास नेले.25मथुशलह एकशेसत्याऐंशी वर्षांचा झाल्यावर लामेखाचा पिता झाला.26लामेखाच्या जन्मानंतर मथुशलह सातशे ब्याऐंशी वर्षे जगला. त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या.27मथुशलह एकंदर नऊशें ऐकोणसत्तर वर्षे जगला. त्यानंतर तो मरण पावला.28लामेख एकशेब्यांऐशी वर्षांचा झाल्यावर तो एका मुलाचा पिता झाला.29लामेखाने त्याचे नाव नोहा ठेवून म्हटले, परमेश्वराने भूमी शापित केली आहे तिच्यापासून येणाऱ्या कामात आणि आमच्या हातांच्या श्रमात हाच आम्हांला विसावा देईल.30नोहा झाल्यावर लामेख पाचशे पंचाण्णव वर्षे जगला; त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या.31लामेख एकंदर सातशे सत्याहत्तर वर्षे जगला. नंतर तो मरण पावला.32नोहा पाचशे वर्षांचा झाल्यावर त्यास शेम, हाम व याफेथ नावाचे पुत्र झाले.
1पृथ्वीवरील मनुष्यांची संख्या वाढतच राहिली आणि त्यांना मुली झाल्या,2तेव्हा मानवजातीच्या मुली आकर्षक आहेत असे देवपुत्रांनी + स्वर्गीय आत्मे पाहिले, त्यांच्यापैकी त्यांना ज्या आवडल्या त्या त्यांनी स्त्रिया करून घेतल्या.3परमेश्वर म्हणाला, “माझा आत्मा + जीवन देणारा आत्मा मानवामध्ये सर्वकाळ राहणार नाही, कारण ते देह आहेत. ते एकशें वीस वर्षे जगतील.”4त्या दिवसात आणि त्यानंतरही, महाकाय मानव + राक्षस पृथ्वीवर होते. देवाचे पुत्र मनुष्यांच्या मुलीपाशी गेले, आणि त्यांच्याकडून त्यांना मुले झाली, तेव्हा हे घडले. प्राचीन काळचे जे बलवान, नामांकित पुरूष ते हेच.5पृथ्वीवर मानवजातीची दुष्टता मोठी आहे, आणि त्यांच्या मनात येणाऱ्या विचारातील प्रत्येक कल्पना केवळ एकसारखी वाईट असते, असे परमेश्वराने पाहिले.6म्हणून पृथ्वीवर मनुष्य निर्माण केल्याबद्दल परमेश्वरास वाईट वाटले, आणि तो मनात फार दुःखी झाला.7म्हणून परमेश्वर म्हणाला, “मी उत्पन्न केलेल्या मानवास पृथ्वीतलावरून नष्ट करीन; तसेच मनुष्य, पशू, सरपटणारे प्राणी, व आकाशातील पक्षी या सर्वांचा मी नाश करीन, कारण या सर्वांना उत्पन्न केल्याचे मला दुःख होत आहे.”8परंतु नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी झाली.
1नंतर परमेश्वर नोहाला म्हणाला, “चल, तू आणि तुझ्या कुटुंबातील सर्वांनी तारवात यावे, कारण या पिढीमध्ये तूच मला नीतिमान दिसला आहेस.2प्रत्येक शुद्ध जातीच्या प्राण्यांपैकी नर व माद्यांच्या सात सात जोड्या घे, इतर शुद्ध नाहीत त्या प्राण्यापैकी, नर व मादी अशी दोन दोन घे.3आणि आकाशातल्या पक्षांच्या नर व मादी अशा सात जोड्या तुझ्याबरोबर तारवात ने. अशाने पृथ्वीवर त्यांचे बीज राहील.4आतापासून सात दिवसानी मी पृथ्वीवर चाळीस दिवस व चाळीस रात्र पाऊस पाडीन. मी निर्माण केलेल्या प्रत्येक जिवंत गोष्टींचा मी पृथ्वीवरून नाश करीन.”5परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे नोहाने सर्वकाही केले.6जलप्रलय आला तेव्हा नोहा सहाशे वर्षांचा होता.7नोहा, त्याची मुले, त्याची पत्नी, आणि त्याच्या मुलांच्या स्त्रिया, हे सर्व जलप्रलयामुळे तारवात गेले.8पृथ्वीवरील शुद्ध व अशुद्ध पशुतून, पक्षी आणि जमिनीवर रांगणारे सर्वकाही,9देवाने नोहाला सांगितल्याप्रमाणे दोन-दोन नर व मादी असे ते नोहाकडे आले आणि तारवात गेले.10मग सात दिवसानंतर पृथ्वीवर पाऊस पडण्यास व जलप्रलय येण्यास सुरुवात झाली.11नोहाच्या जीवनातील सहाशाव्या वर्षाच्या दुसऱ्या महिन्याच्या सतराव्या दिवशी पृथ्वीतील पाण्याचे सर्व झरे फुटले व पाणी उफाळून वर आले व जमिनीवरुन वाहू लागले. त्याच दिवशी मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली. आणि आकाशाच्या खिडक्या उघडल्या.12पावसास सुरुवात झाली आणि चाळीस दिवस व चाळीस रात्र पृथ्वीवर पाऊस पडत होता.13त्याच दिवशी नोहा आणि त्याची मुले शेम, हाम आणि याफेथ आणि नोहाची पत्नी व त्यांच्या बरोबर त्याच्या मुलांच्या तीन बायकांनीही तारवात प्रवेश केला.14त्यांच्याबरोबर प्रत्येक रानटी प्राणी त्याच्या जातीप्रमाणे आणि प्रत्येक पाळीव प्राणी त्याच्या जातीच्या प्रकाराप्रमाणे आणि पृथ्वीवर रांगणारी प्रत्येक गोष्ट तिच्या जातीच्या प्रकाराप्रमाणे, आणि प्रत्येक पक्षी त्याच्या जातीच्या प्रकाराप्रमाणे, प्रत्येक प्रकारचा पंख असलेला प्राणी, यांनी तारवात प्रवेश केला.15ज्यांच्या शरीरात जीवनाचा श्वास आहे असे सर्व दोन दोन तारवात नोहाकडे आले आणि त्यांनी तारवात प्रवेश केला.16देवाने त्यास आज्ञा दिल्याप्रमाणे सर्व प्रकारचे देहधारी प्राणी नर व मादी असे तारवात गेले. मग परमेश्वराने दार बंद केले.17मग पृथ्वीवर चाळीस दिवस पूर आला आणि पाणी वाढले आणि तारू जमिनीपासून उचलले गेले.18मुसळधार पावसाचा जोर वाढत गेला आणि पृथ्वीवर पाण्याचा जोर खूप वाढत गेला, आणि तारू पाण्यावर तरंगू लागले.19पृथ्वीवरील पाणी जोराने उंच आणि उंच वाढत गेले. आकाशाखालील सर्व उंच पर्वत पूर्णपणे त्याखाली झाकून गेले; 20पाणी पर्वत शिखरावर पंधरा हातापेक्षा+ साधारण सात मीटर अधिक उंच इतके वर चढले.21पृथ्वीवरील हालचाल करणारे सर्व जिवंत प्राणी, सर्व पक्षी, गुरेढोरे, वनपशू, थव्याने राहणारे प्राणी, आणि सर्व मानवजात मरून गेले.22ज्यांच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास होता असे, कोरड्या जमिनीवरील सर्वजण मरण पावले.23अशा रीतीने देवाने सर्वकाही म्हणजे मानव, पशू, सरपटणारे प्राणी आणि आकाशातील पक्षी अशा सर्व मोठ्या जीवधारी प्राण्यांचा नाश केला. पृथ्वीच्या पाठीवरून त्या सर्वांचा नाश करण्यात आला. केवळ नोहा आणि तारवात त्याच्या सोबत जे होते तेच फक्त वाचले.24एकशे पन्नास दिवस पृथ्वीवर पाण्याचा जोर होता.
1देवाने नोहा, त्याच्यासोबत तारवात असलेले सर्व वन्यप्राणी आणि सर्व गुरेढोरे यांची आठवण केली. देवाने पृथ्वीवर वारा वाहण्यास लावला, आणि पाणी मागे हटण्यास सुरवात झाली.2पाण्याचे खोल झरे आणि आकाशाच्या खिडक्या बंद झाल्या, आणि पाऊस पडण्याचा थांबला.3पृथ्वीवरून पुराचे पाणी एकसारखे मागे हटत गेले. आणि दीडशे दिवसाच्या अखेरीस पुष्कळ पाणी कमी झाले.4सातव्या महिन्याच्या सतराव्या दिवशी तारू अरारात पर्वतावर थांबले.5दहाव्या महिन्यापर्यंत पाणी एकसारखे हटत गेले. दहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पर्वतांचे माथे दिसू लागले.6चाळीस दिवसानंतर नोहाने तयार केलेली तारवाची खिडकी उघडली7त्याने एक कावळा बाहेर सोडला आणि पृथ्वीवरील पाणी सुकून जाईपर्यंत तो इकडे तिकडे उडत राहिला.8नंतर जमिनीच्या वरील भागावरून पाणी मागे हटले आहे की नाही हे पाहण्याकरिता नोहाने एक कबुतर बाहेर सोडले,9परंतु कबुतराला पाय टेकण्यास जागा मिळाली नाही आणि ते त्याच्याकडे तारवात परत आले, कारण सर्व पृथ्वी पाण्याने झाकली होती. तेव्हा त्याने हात बाहेर काढून त्यास आपल्याबरोबर तारवात घेतले.10तो आणखी सात दिवस थांबला. आणि त्याने पुन्हा कबुतराला तारवाबाहेर सोडले; 11ते कबुतर संध्याकाळी त्याच्याकडे परत आले. आणि पाहा, त्याच्या चोचीत जैतून झाडाचे नुकतेच तोडलेले पान होते. यावरुन पृथ्वीवरील पाणी कमी झाले असल्याचे नोहाला समजले.12नोहा आणखी सात दिवस थांबला आणि त्याने कबुतरास पुन्हा बाहेर सोडले. ते परत त्याच्याकडे आले नाही.13असे झाले की, सहाशे एकाव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याचा पहिल्या दिवशी पृथ्वीवरील पाणी सुकून गेले, तेव्हा नोहाने तारवाचे आच्छादन काढून बाहेर पाहिले, तो पाहा, जमिनीचा वरील भाग कोरडा झालेला होता.14दुसऱ्या महिन्याच्या सत्ताविसाव्या दिवसापर्यंत पृथ्वी कोरडी झाली होती.15देव नोहाला म्हणाला,16“तू, तुझी पत्नी, तुझी मुले व तुझ्या मुलांच्या स्त्रिया यांना तुझ्याबरोबर घेऊन तारवाच्या बाहेर ये.17तुझ्या बरोबर पक्षी, गुरेढोरे आणि पृथ्वीवर रांगणारा प्रत्येक प्राणी यांसह प्रत्येक जिवंत देहधारी प्राणी बाहेर आण. यासाठी की, त्यांची संपूर्ण पृथ्वीभर सर्वत्र असंख्य पट भरभराट व्हावी आणि पृथ्वीवर ते बहुगुणित व्हावेत.”18तेव्हा नोहा, त्याची पत्नी, मुले व मुलांच्या स्त्रिया यांच्यासह तारवातून बाहेर आला; 19त्याच्या बरोबरचा प्रत्येक जिवंत प्राणी, प्रत्येक रांगणारा प्राणी व प्रत्येक पक्षी, पृथ्वीवर हालचाल करणारा प्रत्येक जीव, आपापल्या जातीप्रमाणे तारवातून बाहेर आले.20नोहाने परमेश्वराकरता एक वेदी बांधली. त्याने शुद्ध पक्ष्यांतून काही आणि शुद्ध पशुंतून काही घेतले, आणि त्यांचे वेदीवर होमार्पण केले.21परमेश्वराने तो सुखकारक सुगंध घेतला आणि आपल्या मनात म्हटले, “मानवामुळे मी पुन्हा भूमीला शाप देणार नाही; मानवाच्या मनातील योजना बालपणापासूनच वाईट आहेत. मी आता केले आहे त्याप्रमाणे मी पुन्हा कधीही सर्व जिवांचा नाश करणार नाही.22जोपर्यंत पृथ्वी राहील तोपर्यंत पेरणी व कापणी, थंडी व ऊन, हिवाळा व उन्हाळा, दिवस व रात्र व्हावयाची थांबणार नाहीत.”
1नंतर देवाने नोहाला व त्याच्या मुलांना आशीर्वाद दिला आणि म्हटले, “फलदायी व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी भरून टाका.2पृथ्वीवरील प्रत्येक जिवंत प्राणी, आकाशातील प्रत्येक पक्षी, जमिनीवर सरपटणारे सर्व प्राणी आणि समुद्रातील सर्व मासे ह्यांच्यावर तुमचे भय व धाक राहील; ते तुमच्या कह्यात दिले आहेत.3प्रत्येक हालचाल करणारा प्राणी हा तुमचे अन्न होईल. जशा मी हिरव्या वनस्पती दिल्या आहेत, तसेच आता सर्वकाही तुम्हास देत आहे.4पण ज्यामध्ये त्याचे जीवन म्हणजे रक्त आहे, ते मांस तुम्ही खाऊ नये.5परंतु तुमच्या रक्तासाठी, जे रक्त तुमचे जीवन आहे, त्याबद्दल मी आवश्यक भरपाई घेईन. प्रत्येक प्राण्याच्या हातून मी ती घेईन. मनुष्याच्या हातून, म्हणजे ज्याने आपल्या भावाचा खून केला आहे त्याच्या हातून, त्या मनुष्याच्या जिवाबद्दल मी भरपाईची मागणी करीन.6जो कोणी मनुष्याचे रक्त पाडतो, त्याचे रक्त मनुष्याकडून पाडले जाईल, कारण देवाने मनुष्यास त्याच्या प्रतिरूपाचे बनवले आहे.7तुम्ही मात्र फलदायी आणि बहुगुणित व्हा, सर्व पृथ्वीवर विस्तारा, आणि तिच्यावर बहुगुणित व्हा.” 8मग देव नोहाला व त्याच्या मुलांना म्हणाला,9“माझे ऐका! मी तुमच्याशी व तुमच्या नंतर तुमच्या वंशजाशी एक करार स्थापन करतो,10आणि तुमच्याबरोबर असलेले सर्व जिवंत प्राणी, म्हणजे तुमच्याबरोबर तारवातून बाहेर आलेले पक्षी, गुरेढोरे, आणि पृथ्वीवर राहणारे सर्व प्राणी त्यांच्याशीही एक करार स्थापित करतो.11अशा प्रकारे मी तुमच्याशी करार स्थापित करतो की, यापुढे पुराच्या पाण्याने पृथ्वीवरील सर्व देह पुन्हा कधीही नष्ट केले जाणार नाहीत व पुन्हा कधीही पुराने पृथ्वीचा नाश होणार नाही.” 12देव म्हणाला, “मी माझ्यामध्ये आणि तुमच्यामध्ये, व तुमच्याबरोबर जे सर्व जिवंत जीव आहेत त्यांच्यामध्ये भावी पिढ्यानपिढ्यासाठी हा करार केल्याची निशाणी हीच आहे.13मी ढगात मेघधनुष्य ठेवले आहे; ते सर्व पृथ्वी व माझ्यामध्ये केलेल्या कराराची निशाणी आहे.14मी जेव्हा पृथ्वीवर ढग आणीन तेव्हा तुम्हास ढगात मेघधनुष्य दिसेल,15नंतर मी ते पाहीन तेव्हा मी तुमच्याशी व पृथ्वीवरील सर्व देहातल्या जिवंत प्राण्यांशी केलेल्या माझ्या कराराची मला आठवण होईल, या कराराप्रमाणे पुराच्या पाण्याने पृथ्वीवरील सर्व देहाचा पुन्हा कधीही नाश करणार नाही.16मेघधनुष्य ढगात राहील आणि जो सर्वकाळचा करार देव आणि पृथ्वीवरील सर्व देहातले जिवंत प्राणी यांच्यामध्ये आहे त्याची आठवण म्हणून मी त्याकडे पाहीन.” 17नंतर देव नोहाला म्हणाला, “हे मेघधनुष्य माझ्यामध्ये व पृथ्वीवरील सर्व देहांमध्ये स्थापित केलेल्या कराराची निशाणी आहे.”
1नोहाच्या शेम, हाम व याफेथ या मुलांचे वंशज हे आहेत. पुरानंतर त्यांना मुले झाली.2याफेथाचे पुत्र+ वंशावळी गोमर, मागोग, माद्य, यावान, तुबाल, मेशेख व तीरास हे होते.3गोमरचे पुत्र आष्कनाज, रीपाथ व तोगार्मा हे होते.4यावानाचे पुत्र अलीशा, तार्शीश, कित्तीम व दोदानीम हे होते.5यांच्यापैकी समुद्र किनारपट्टीवरील लोक वेगळे झाले आणि आपापल्या भाषेनुसार, कुळानुसार त्यांनी देश वसवले.6हामाचे पुत्र कूश, मिस्राईम, पूट व कनान होते.7कूशाचे पुत्र सबा, हवीला, साब्ता, रामा, व साब्तका होते आणि रामाचे पुत्र शबा व ददान हे होते.8कूशाने निम्रोदाला जन्म दिला, जो पृथ्वीवरचा पहिला जगजेत्ता बनला.9तो परमेश्वरापुढे पराक्रमी शिकारी मनुष्य बनला. त्यामुळे ‘निम्रोदासारखा परमेश्वरापुढे पराक्रमी शिकारी’ अशी म्हण पडली आहे.10त्याच्या राज्याची पहिली मुख्य ठिकाणे शिनार देशातील बाबेल+ बाबेलोन , एरक, अक्काद व कालने ही होती.11त्या देशातून तो अश्शूर देशास गेला व तेथे त्याने निनवे, रहोबोथ, ईर, कालह ही शहरे बांधली12आणि निनवे व कालह यांच्या दरम्यान त्याने रेसन नावाचे शहर वसवले. हे एक मोठे शहर आहे.13मिस्राईम हा लूदीम, अनामीम, लहाबीम, नाप्तुहीम,14पात्रुसीम, कास्लूहीम (ज्यांच्यापासून पलिष्टी निघाले), व कफतोरी, ह्यांचा पिता बनला.15कनान हा त्याचा प्रथम जन्मलेला मुलगा सीदोन आणि हेथ यांचा,16तसेच यबूसी, अमोरी, गिर्गाशी,17हिव्वी, आर्की व शीनी18अर्वादी, समारी व हमाथी यांचा पिता होता. त्यानंतर कनानाची कुळे सर्वत्र पसरली.19कनान्यांची सीमा सीदोनापासून गराराकडे जाते त्या वाटेने गज्जा शहरापर्यंत होती. सदोम व गमोरा व तसेच अदमा व सबोयिम या शहरांकडे जाणाऱ्या वाटेवर लेशापर्यंत ती होती.20कूळ, भाषा, देश व यांनुसार हे सर्व हाम याचे वंशज होते.21शेम हा याफेथाचा वडील भाऊ होता. एबर हा शेम यांचा वंशज होता. तो सर्व एबर लोकांचा मूळ पुरुष होता.22शेम याचे पुत्र एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद व अराम हे होते.23अरामाचे पुत्र ऊस, हूल, गेतेर, आणि मेशेख हे होते.24अर्पक्षद हा शेलहचा पिता झाला, शेलह हा एबरचा पिता झाला.25एबर याला दोन मुले झाली. एकाचे नाव पेलेग होते, कारण त्याच्या काळात पृथ्वीची विभागणी झाली; त्याच्या भावाचे नाव यक्तान होते.26यक्तान अलमोदाद, शेलेफ, हसर्मावेथ, येरह27हदोराम, ऊजाल, दिक्ला28ओबाल, अबीमाएल, शबा,29ओफीर, हवीला व योबाब यांचा पिता झाला. हे सर्व यक्तानाचे पुत्र होते.30त्यांचा प्रदेश मेशापासून पूर्वेकडील डोंगराळ भागात, सेफर प्रदेशापर्यंत होता.31आपआपली कुळे, आपापल्या भाषा, देश व राष्ट्रे यांप्रमाणे विभागणी झालेले हे शेमाचे पुत्र.32पिढ्या व राष्ट्रे ह्यांनुसार ही नोहाच्या मुलांची कुळे आहेत. महापुरानंतर यांच्यापासून वेगवेगळी राष्ट्रे निर्माण होऊन पृथ्वीवर पसरली.
1आता पृथ्वीवरील सर्व लोक एकच भाषेचा वापर करत होते आणि शब्द समान होते.2ते पूर्वेकडे प्रवास करत असताना त्यांना शिनार देशात एक मैदान लागले आणि त्यांनी तेथेच वस्ती केली.3ते एकमेकांना म्हणाले, “चला, आपण विटा करू व त्या पक्क्या भाजू.” त्यांच्याकडे बांधकामासाठी दगडाऐवजी विटा आणि चुन्याऐवजी डांबर होते.4मग लोक म्हणाले, “चला, आपण आपल्यासाठी नगर बांधू आणि ज्याचे शिखर आकाशापर्यंत पोहचेल असा उंच बुरूज बांधू, आणि आपण आपले नाव होईल असे करू या. आपण जर असे केले नाही, तर पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होईल.”5आदामाच्या वंशजांनी बांधलेले ते नगर व तो बुरूज पाहण्यासाठी म्हणून परमेश्वर खाली उतरून आला.6परमेश्वर देव म्हणाला, “पाहा, हे सर्व लोक एक असून, एकच भाषा बोलतात आणि ही तर त्यांची सुरुवात आहे! लवकरच, जे काही करण्याचा त्यांचा हेतू आहे ते करणे त्यांना मुळीच अशक्य होणार नाही.7चला आपण खाली जाऊन त्यांच्या भाषेचा घोटाळा करून टाकू. मग त्यांना एकमेकांचे बोलणे समजणार नाही.”8मग परमेश्वराने पृथ्वीभर त्यांची पांगापांग केली आणि म्हणून नगर बांधण्याचे काम त्यांनी थांबवले.9त्यामुळे त्या ठिकाणाचे नाव बाबेल पडले, कारण तेथे परमेश्वराने सर्व पृथ्वीच्या भाषेचा घोटाळा केला आणि परमेश्वराने त्यांना तेथून सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगविले.
1आता परमेश्वर अब्रामाला म्हणाला, “तू आपला देश, आपले नातलग आणि बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा.2मी तुझे मोठे राष्ट्र करीन आणि मी तुला आशीर्वाद देईन आणि मी तुझे नाव मोठे करीन आणि तू आशीर्वादित होशील,3जे लोक तुला आशीर्वाद देतील त्यांना मी आशीर्वाद देईन, परंतु जो कोणी तुझा अनादर करील त्यास मी शाप देईन. तुझ्यामुळे पृथ्वीवरील सर्व कुटुंबे आशीर्वादित होतील.”4परमेश्वराने अब्रामाला सांगितल्याप्रमाणे त्याने केले, तो गेला आणि त्याच्याबरोबर लोट गेला. त्याने हारान सोडले त्या वेळी अब्राम पंचाहत्तर वर्षांचा होता.5अब्रामाने त्याची पत्नी साराय, त्याच्या भावाचा मुलगा लोट आणि हारान प्रदेशामध्ये त्यांनी जमा केलेली सर्व मालमत्ता, आणि हारानात विकत घेतलेले लोक या सर्वांना बरोबर घेतले. ते कनान देशात जाण्यासाठी निघाले आणि कनान देशात आले.6अब्राम कनान देशातून प्रवास करीत शखेमापर्यंत मोरेच्या एलोन झाडापर्यंत गेला. त्या काळी त्या देशात कनानी लोक राहत होते.7परमेश्वर अब्रामाला दर्शन देऊन म्हणाला, “हा देश मी तुझ्या वंशजांना देईन.” ज्या जागेवर परमेश्वराने अब्रामाला दर्शन दिले त्या जागी त्याने परमेश्वरासाठी वेदी बांधली.8मग अब्राम तेथून निघाला आणि प्रवास करीत तो बेथेलच्या पूर्वेस डोंगराळ भागात पोहचला व त्याने तेथे तंबू ठोकला; तेथून बेथेल पश्चिमेस होते आणि आय शहर पूर्वेस होते; तेथे त्याने परमेश्वरासाठी दुसरी वेदी बांधली आणि परमेश्वराचे नाव घेऊन प्रार्थना केली.9त्यानंतर अब्राम पुन्हा पुढच्या प्रवासास निघाला व दक्षिणेकडील नेगेब वाळवंटाकडे गेला.
1अशा रीतीने अब्रामाने मिसर देश सोडला आणि तो, त्याची पत्नी साराय, आणि त्याचे जे सर्वकाही होते ते घेऊन नेगेबात गेला. लोटही त्याच्याबरोबर गेला.2आता अब्राम जनावरे, तसेच सोने आणि चांदी यांनी फार श्रीमंत झाला होता.3तो आपला प्रवास करीत नेगेबापासून बेथेल नगरामध्ये गेला, बेथेल व आय यांच्यामध्ये ज्या ठिकाणी त्याचा तंबू पूर्वी होता तेथपर्यंत गेला.4जेथे त्याने पहिल्याने वेदी बांधली होती तेथेच ही जागा आहे आणि तेथे त्याने परमेश्वराच्या नावाचा धावा केला.5आता लोट जो अब्रामाबरोबर प्रवास करीत होता. याच्याकडेसुद्धा कळप, गुरेढोरे व लोक+ तंबू होते.6तो देश त्या दोघांना एकत्र जवळ राहण्यास पुरेना, कारण त्यांची मालमत्ता फारच मोठी होती, ती इतकी की त्यांना एकत्र राहता येईना.7तेथे अब्रामाचे गुराखी व लोटाचे गुराखी यांच्यामध्ये भांडणेसुद्धा होऊ लागली; त्या काळी त्या देशात कनानी व परिज्जी लोक राहत होते.8तेव्हा अब्राम लोटाला म्हणाला, “तुझ्यामध्ये व माझ्यामध्ये, तसेच तुझे गुराखी व माझे गुराखी यांच्यामध्ये भांडण नसावे. शेवटी आपण एक कुटुंब आहोत.9तुझ्यापुढे सर्व देश नाही काय? पुढे जा आणि माझ्यापासून तू वेगळा हो. तू जर डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईन, आणि तू जर उजवीकडे गेलास तर मी डावीकडे जाईन.”10लोटाने सभोवार पाहिले, आणि यार्देन खोऱ्याकडे नजर टाकली तेव्हा तेथे सर्वत्र भरपूर पाणी असल्याचे त्यास दिसले. परमेश्वराने सदोम व गमोरा या शहरांचा नाश करण्यापूर्वी सोअराकडे जाते त्या वाटेने लागणारे खोरे परमेश्वराच्या बागेसारखे, मिसर देशासारखे होते.11तेव्हा लोटाने यार्देनेचे सर्व खोरे निवडले. मग ते दोघे वेगळे झाले आणि लोटाने पूर्वेकडे प्रवास करण्यास सुरुवात केली, आणि ते एकमेकांपासून वेगळे झाले.12अब्राम कनान देशातच राहिला आणि लोट यार्देनेच्या मैदानातल्या शहरामध्ये जाऊन राहिला; लोट दूर सदोमाला गेला आणि तेथेच त्याने आपला तंबू ठोकला.13सदोम नगराचे लोक अतिशय दुष्ट असून परमेश्वराच्या विरूद्ध पाप करणारे होते.14लोट अब्राहापासून वेगळा झाल्यावर परमेश्वर अब्रामाला म्हणाला, “तू जेथे उभा आहेस त्या ठिकाणापासून उत्तरेकडे व दक्षिणेकडे, पूर्वेकडे व पश्चिमेकडे पाहा.15तू पाहतोस हा सगळा प्रदेश मी तुला आणि तुझ्यानंतर तुझ्या संततीला कायमचा देईन.16मी तुझी संतती या पृथ्वीवरील धुळीच्या कणांइतकी करीन, ते असे की, जर कोणाला ते धुळीचे कण मोजता येतील तर तुझे संतानही मोजता येईल.17ऊठ, देशातून येथून तेथून चालत जा आणि त्याची लांबी व त्याची रुंदी पाहा, कारण तो मी तुला देणार आहे.”18तेव्हा अब्रामाने आपला तंबू हलविला व तो हेब्रोन शहराजवळील मम्रेच्या एलोन झाडाशेजारी रहावयास गेला. परमेश्वरासाठी त्याने तेथे वेदी बांधिली.
1त्यानंतर शिनाराचा राजा अम्राफेल, एल्लासाराचा राजा अर्योक, एलामाचा राजा कदार्लागोमर आणि गोयिमाचा राजा तिदाल यांच्या दिवसात असे झाले की,2त्यांनी सदोमाचा राजा बेरा, गमोराचा राजा बिर्शा, अदमाचा राजा शिनाब, सबोयिमाचा राजा शमेबर आणि बेला ज्याला सोअर म्हणतात त्याच्या राजांशी युद्ध केले.3नंतर हे पाच राजे सिद्दीम खोऱ्यात एकत्र जमले. या खोऱ्याला क्षार समुद्र असेही म्हणतात.4त्यांनी बारा वर्षे कदार्लागोमरची सेवा केली होती, परंतु तेराव्या वर्षी त्यांनी त्याच्या विरूद्ध बंड केले.5त्यानंतर चौदाव्या वर्षी कदार्लागोमर व त्याच्या बरोबरचे राजे आले आणि त्यांनी अष्टरोथ-कर्णईम येथे रेफाईम लोकांस, हाम येथे जूजीम लोकांस, शावेह किर्याथाईम येथे एमीम या लोकांस मारले.6आणि होरी यांना त्यांच्या सेईर डोंगराळ प्रदेशात जे एल पारान रान आहे तेथपर्यंत त्यांनी जाऊन मारले.7नंतर ते मागे फिरून एन-मिशपात म्हणजे कादेश येथे आले. आणि त्यांनी सर्व अमालेकी देशाचा आणि तसेच हससोन-तामार येथे राहणाऱ्या अमोरी लोकांचाही पराभव केला.8नंतर सदोमाचा राजा, गमोराचा राजा, अदमाचा राजा, सबोयिमाचा राजा आणि बेला म्हणजे सोअराचा राजा ह्यांनी लढाईची तयारी केली.9एलामाचा राजा कदार्लागोमर, गोयिमाचा राजा तिदाल, शिनाराचा राजा अम्राफेल आणि एल्लासाराचा राजा अर्योक यांच्या विरूद्ध ते लढले. हे चार राजे पाच राजांविरूद्ध लढले.10सिद्दीम खोऱ्यात पूर्ण डांबराने भरलेले खड्डे होते आणि सदोम व गमोराचे राजे पळून जाताना त्यामध्ये पडले, जे राहिले ते डोंगराकडे पळून गेले.11अशा रीतीने शत्रूंनी सदोम व गमोरा नगराच्या सर्व वस्तू आणि त्यांचा सर्व अन्नसाठा लुटून घेऊन माघारी गेले.12ते गेले तेव्हा त्यांनी अब्रामाच्या भावाचा मुलगा लोट जो सदोमात राहत होता, त्यालासुद्धा त्याच्या सर्व मालमत्तेसह नेले.13तेथून पळून आलेल्या एकाने अब्राम इब्रीला हे सांगितले. तो तर अष्कोल व आनेर ह्यांचा भाऊ मम्रे अमोरी याच्या एलोन झाडांजवळ राहत होता आणि ते सर्व अब्रामाचे सहकारी होते.14जेव्हा अब्रामाने ऐकले की, त्याच्या नातेवाइकांना शत्रूंनी पकडून नेले आहे तेव्हा त्याने आपल्या घरी जन्मलेली, लढाईचे शिक्षण घेतलेली तीनशे अठरा माणसे घेऊन सरळ दान नगरापर्यंत शत्रूंचा पाठलाग केला.15त्याने रात्री त्याचे लोक त्यांच्याविरुद्ध विभागले आणि त्यांच्यावर हल्ला केला आणि दिमिष्काच्या डावीकडे होबापर्यंत त्यांचा पाठलाग केला.16अब्रामाने सगळी मालमत्ता आणि त्याचा नातेवाइक लोट आणि त्याच्या वस्तू, त्याचप्रमाणे स्त्रिया आणि इतर लोक यांना परत आणले.
1या गोष्टी घडल्यानंतर अब्रामाला दृष्टांतात परमेश्वराचे वचन आले. तो म्हणाला, “अब्रामा, भिऊ नको. मी तुझे संरक्षण करीन आणि तुला फार मोठे प्रतिफळ देईन.”2अब्राम म्हणाला, “हे प्रभू परमेश्वरा, मी अजून निपुत्रिक आहे, आणि माझ्या घराचा वारस दिमिष्क शहरातील अलिएजर हाच होईल, तेव्हा तू मला काय देणार?”3अब्राम म्हणाला, “तू मला संतान दिले नाहीस म्हणून माझ्या घराचा कारभारीच माझा वारस आहे.”4नंतर, पाहा, परमेश्वराचे वचन अब्रामाकडे आले. तो म्हणाला, “हा मनुष्य तुझा वारस होणार नाही, तर तुझ्या पोटी येईल तोच तुझा वारस होईल.”5मग त्याने त्यास बाहेर आणले, आणि म्हटले, “या आकाशाकडे पाहा, तुला तारे मोजता येतील तर मोज.” तो त्यास म्हणाला, “असे तुझे संतान होईल.”6त्याने परमेश्वरावर विश्वास ठेवला. आणि तो विश्वास त्याचा प्रामाणिकपणा असा मोजण्यात आला.7परमेश्वर त्यास म्हणाला, “हा देश तुला वतन करून देण्याकरता खास्द्यांच्या ऊर देशातून तुला आणणारा मीच परमेश्वर आहे.”8तो त्यास म्हणाला, “हे प्रभू परमेश्वरा मला हे वतन मिळेल हे मी कशावरून समजू?”9तो त्यास म्हणाला, “माझ्यासाठी तीन वर्षांची एक कालवड, तीन वर्षांची एक शेळी, तीन वर्षांचा एक एडका तसेच एक होला व एक पारव्याचे पिल्लू आण.”10त्याने ते सर्व त्याच्याकडे आणले आणि त्यांना चिरून त्या प्रत्येकाचे दोन दोन तुकडे केले व प्रत्येक अर्धा भाग दुसऱ्या अर्ध्या भागासमोर ठेवला. पण पक्षी त्याने चिरले नाहीत; 11कापलेल्या प्राण्यांचे मांस खाण्याकरिता पक्ष्यांनी त्यावर झडप घातली, परंतु अब्रामाने त्यांना हाकलून लावले.12नंतर जेव्हा सूर्य मावळू लागला, तेव्हा अब्रामाला गाढ झोप लागली आणि पाहा निबिड आणि घाबरून सोडणाऱ्या काळोखाने त्यास झाकले.13मग परमेश्वर अब्रामाला म्हणाला, “तुला या गोष्टी समजल्या पाहिजेत; तुझे वंशज जो देश त्यांचा नाही त्या अनोळखी देशात राहतील आणि ते तेथे गुलाम होतील आणि चारशे वर्षे त्यांचा छळ होईल.14परंतु ज्याने त्यांना गुलाम बनवले त्या राष्ट्राचा मी न्याय करीन, आणि मग आपल्या बरोबर पुष्कळ धन घेऊन ते त्या देशातून निघतील.15तू स्वतः फार म्हातारा होऊन शांतीने आपल्या पूर्वजांकडे जाशील आणि चांगला म्हातारा झाल्यावर तुला पुरतील.16मग चार पिढ्यानंतर तुझे लोक या देशात माघारे येतील. कारण अमोरी लोकांचा अन्याय अद्याप त्याच्या मर्यादेपर्यंत पोहोचलेला नाही.”17सूर्य मावळल्यानंतर गडद अंधार पडला; मारलेल्या जनावरांच्या तेथेच पडलेल्या त्या तुकड्यांमधून धुराची अग्नीज्वाला आणि अग्नीची ज्योती गेली.18त्या दिवशी परमेश्वराने अब्रामाशी करार केला. तो म्हणाला, “मिसर देशाच्या नदीपासून फरात महानदीपर्यंतचा19केनी, कनिज्जी, कदमोनी,20हित्ती, परिज्जी, रेफाईम,21अमोरी, कनानी, गिर्गाशी व यबूसी यांचा देश मी तुझ्या संतानाला देतो.”
1अब्रामाला आपली पत्नी साराय हिच्यापासून मूल झाले नाही, परंतु तिची एक मिसरी दासी होती, जिचे नाव हागार होते.2साराय अब्रामाला म्हणाली, “परमेश्वराने मला मुले होण्यापासून वंचित ठेवले आहे. तेव्हा तुम्ही माझ्या दासीपाशी जा. कदाचित तिच्यापासून मला मुले मिळतील.” अब्रामाने आपली पत्नी साराय हिचे म्हणणे मान्य केले.3अब्राम कनान देशात दहा वर्षे राहिल्यानंतर, अब्रामाची पत्नी साराय हिने आपली मिसरी दासी हागार ही, आपला पती अब्राम याला पत्नी म्हणून दिली.4त्याने हागार सोबत शरीरसंबंध केले, आणि अब्रामापासून ती गरोदर राहिली. आणि जेव्हा तिने पाहिले की आपण गरोदर आहोत, तेव्हा ती आपल्या मालकीणीकडे तिरस्काराने पाहू लागली.5नंतर साराय अब्रामाला म्हणाली, “माझ्यावरचा अन्याय तुमच्यावर असो. मी आपली दासी तुम्हास दिली, आणि आपण गरोदर आहो हे लक्षात आल्यावर, मी तिच्या दृष्टीने तुच्छ झाले. परमेश्वर तुमच्यामध्ये व माझ्यामध्ये न्याय करो.”6परंतु अब्राम सारायला म्हणाला, “तू हागारेची मालकीण आहेस, तुला काय पाहिजे तसे तू तिचे कर.” तेव्हा साराय तिच्याबरोबर निष्ठुरपणे वागू लागली म्हणून हागार तिला सोडून पळून गेली.7शूर गावाच्या वाटेवर वाळवंटातील एका पाण्याच्या झऱ्याजवळ हागार परमेश्वराच्या एका देवदूताला आढळली.8देवदूत तिला म्हणाला, “सारायचे दासी हागारे, तू येथे का आलीस? तू कोठे जात आहेस?” हागार म्हणाली, “माझी मालकीण साराय हिच्यापासून मी पळून जात आहे.”9परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, “तू आपल्या मालकिणीकडे परत जा आणि तिच्या अधिकारात तिच्या अधीनतेत राहा.”10परमेश्वराचा दूत तिला आणखी म्हणाला, “तुझी संतती मी इतकी बहुगुणित करीन, की ती मोजणे शक्य होणार नाही.”11परमेश्वराचा दूत तिला असे सुद्धा म्हणाला, “तू आता गरोदर आहेस आणि तुला मुलगा होईल त्याचे नाव तू इश्माएल+ अर्थ-देव ऐकतो म्हणजे परमेश्वर ऐकतो असे ठेव, कारण प्रभूने तुझ्या दुःखाविषयी ऐकले आहे.12इश्माएल जंगली गाढवासारखा मनुष्य असेल. तो सर्वांविरूद्ध असेल आणि सर्व लोक त्याच्या विरूद्ध असतील+ तो पूर्वेस वस्ती करेल , आणि तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्या भावांच्यापासून वेगळा राहील.”13नंतर तिच्याशी बोलणारा जो परमेश्वर त्याचे नाव, “तू पाहणारा देव आहेस+ एल-रोही ,” असे तिने ठेवले, कारण ती म्हणाली, “जो मला पाहतो त्यास मी येथेही मागून पाहिले काय?”14तेव्हा तेथील विहिरीला बैर-लहाय-रोई+ ऐकणाऱ्या जिवंत देवाची विहीर असे नाव पडले; पाहा, ती कादेश व बेरेद यांच्या दरम्यान आहे.15हागारेने अब्रामाच्या पुत्राला जन्म दिला, आणि ज्याला हगारेने जन्म दिला त्या त्याच्या पुत्राचे नाव अब्रामाने इश्माएल ठेवले.16हागारेला अब्रामापासून इश्माएल झाला तेव्हा अब्राम शहाऐंशी वर्षांचा होता.
1अब्राम नव्याण्णव वर्षांचा झाला तेव्हा परमेश्वराने त्यास दर्शन दिले व त्यास म्हटले, “मी सर्वशक्तिमान देव आहे. माझ्या समक्षतेत चाल, आणि सात्त्विकतेने राहा.2तू असे करशील, तर मी माझ्यामध्ये व तुझ्यामध्ये एक करार करीन, आणि मी तुला अनेक पटींनी वाढवीन असे अभिवचन देतो.”3मग अब्रामाने देवास लवून नमन केले आणि देव त्यास म्हणाला,4“पाहा, तुझ्यासोबत माझा करार असा आहे: तू अनेक राष्ट्रांचा महान पिता होशील.5येथून पुढे तुझे नाव अब्राम + अर्थ-थोर पूर्वज असणार नाही, तर तुझे नाव अब्राहाम असे होईल. कारण मी तुला अनेक राष्ट्रांचा पिता असे नेमले आहे.6मी तुला भरपूर संतती देईन, आणि मी तुझ्यापासून नवीन राष्ट्रे उदयास आणीन, आणि तुझ्यापासून राजे उत्पन्न होतील.7मी तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये आणि तुझ्या वंशजांमध्येही पिढ्यानपिढ्या कायम लागू राहील असा सनातन करार करीन, तो असा की, मी तुझा आणि तुझ्यानंतर तुझ्या वंशजांचा देव होईन.8ज्या प्रदेशामध्ये तू राहत आहेस तो, म्हणजे कनान देश, मी तुला व तुझ्या वंशजांना कायमचे वतन म्हणून देईन, आणि मी तुमचा देव होईन.”9नंतर देव अब्राहामाला पुढे म्हणाला, “आता या करारातील तुझा भाग हा असा, तू माझा करार पाळावा, तू आणि तुझ्या मागे तुझ्या वंशजांनी पिढ्यानपिढ्या पाळावयाचा माझा करार पाळावा.10माझा करार जो, तू आणि तुझ्या मागे तुझ्या संतानाने पाळायचा तो हा की: तुमच्यातील प्रत्येक पुरुषांची सुंता व्हावी.11माझ्यामध्ये आणि तुझ्यामध्ये असलेला करार हा, तुम्ही आपली सुंता करून घ्यावी.12पिढ्यानपिढ्या तुमच्यातील प्रत्येक पुरुषाची त्याच्या जन्मानंतर आठ दिवसानी सुंता करावी. मग तो पुरुष तुझ्या कुटुंबात जन्मलेला असो किंवा तो तुझ्या वंशातला नसून परक्यापासून पैसा देऊन घेतलेला असो.13अशा रीतीने तुझ्या राष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येक पुरुषांची सुंता करावी, मग तो तुझ्या कुटुंबातील असो किंवा विकत घेतलेल्या गुलामाच्या कुटुंबात जन्मलेला असो; तुझ्या व माझ्यामध्ये केलेला करार या खुणेवरून कायम राहील.14ज्या कोणाची सुंता झाली नाही अशा पुरुषाला त्याच्या लोकांतून बाहेर टाकावे; कारण त्याने माझा करार मोडला आहे.”15देव अब्राहामाला म्हणाला, “तुझी पत्नी साराय, हिला येथून पुढे साराय असे संबोधू नको. त्या ऐवजी तिचे नाव सारा असे होईल.16मी तिला आशीर्वादित करीन, आणि मी तुला तिच्यापासून मुलगा देईन. मी तिला आशीर्वादीत करीन, आणि ती अनेक राष्ट्रांची माता होईल. लोकांचे राजे तिच्यापासून निपजतील.”17अब्राहामाने देवाला लवून नमन केले आणि तो हसला, तो मनात म्हणाला, “शंभर वर्षांच्या मनुष्यास मुलगा होणे शक्य आहे का? आणि सारा, जी नव्वद वर्षांची आहे, तिला मुलगा होऊ शकेल का?”18अब्राहाम देवाला म्हणाला, “इश्माएल तुझ्या समोर जगावा तेवढे पुरे!”19देव म्हणाला, “नाही! परंतु तुझी पत्नी सारा हिलाच मुलगा होईल, आणि त्याचे नाव तू इसहाक असे ठेव. मी त्याच्याशी निरंतरचा करार करीन; तो करार त्याच्यानंतर त्याच्या वंशजांसोबत निरंतर असेल.20तू मला इश्माएलविषयी विचारलेस ते मी ऐकले आहे. पाहा, मी आतापासून पुढे त्यास आशीर्वाद देईन, आणि त्यास फलद्रुप करीन आणि त्यास बहुगुणित करीन. तो बारा सरदारांच्या वंशांचा पिता होईल, आणि मी त्यास एक मोठे राष्ट्र करीन.21परंतु मी इसहाकाबरोबर माझा करार स्थापीन, ज्याला सारा पुढल्या वर्षी याच वेळी जन्म देईल.”22देवाने त्याच्याशी बोलणे संपवल्यावर, देव अब्राहामापासून वर गेला.23त्यानंतर अब्राहामाने त्याचा मुलगा इश्माएल आणि त्याच्या घराण्यात जन्मलेले आणि जे सर्व मोल देऊन विकत घेतलेले अशा सगळ्या पुरुषांना एकत्र केले, आणि देवाने सांगितल्याप्रमाणेच त्याच्या घरातील सर्व पुरुषांची त्या एकाच दिवशी सुंता केली.24अब्राहाम नव्याण्णव वर्षांचा होता तेव्हा त्याची सुंता झाली.25आणि त्याचा मुलगा इश्माएल तेरा वर्षांचा होता तेव्हा त्याची सुंता झाली.26अब्राहाम आणि त्याचा मुलगा इश्माएल या दोघांची एकाच दिवशी सुंता झाली.27त्याच्या घरी जन्मलेले व त्याने विकत घेतलेले असे त्याच्या घरचे सगळे पुरुष यांचीही त्याच्या बरोबर सुंता झाली.
1परमेश्वराने मम्रेच्या एलोन झाडांजवळ अब्राहामाला दर्शन दिले, तेव्हा तो दुपारच्या उन्हाच्या वेळी तंबूच्या दाराशी बसला होता.2त्याने वर पाहिले आणि, पाहा, आपल्यासमोर तीन पुरुष उभे असलेले त्याने पाहिले. अब्राहामाने जेव्हा त्यांना पाहिले, तेव्हा तो त्यांना भेटण्यासाठी तंबूच्या दारापासून पळत गेला आणि त्याने त्यांना जमिनीपर्यंत खाली वाकून नमन केले.3तो म्हणाला, “प्रभू, जर माझ्यावर तुमची कृपादृष्टी असेल तर तुझ्या सेवकाला सोडून पुढे जाऊ नका.4थोडे पाणी आणू द्या, तुमचे पाय धुवा, आणि तुम्ही झाडा खाली आराम करा.5मी तुमच्यासाठी थोडे अन्न आणतो, जेणेकरून तुम्हास ताजेतवाने वाटेल. मग तुम्ही तुमच्या मार्गाने जा, यासाठीच तुमच्या या सेवकाकडे तुमचे येणे झाले असावे.” आणि ते म्हणाले, “तू म्हणतोस तसे कर.”6अब्राहाम पटकन तंबूत सारेकडे गेला आणि म्हणाला, “लवकर + साधारण एकवीस किलो तीन मापे सपीठ घेऊन ते मळ आणि भाकरी कर.”7नंतर अब्राहाम गुरांच्या कळपाकडे पळत गेला आणि त्यातून त्याने कोवळे आणि चांगले वासरू घेतले आणि सेवकाजवळ देऊन त्याने त्यास ते लवकर तयार करण्यास सांगितले.8त्याने तयार केलेले वासरू, तसेच दूध व लोणी त्यांच्यापुढे खाण्यासाठी ठेवले आणि ते जेवत असता तो झाडाखाली त्यांच्याजवळ उभा राहिला.9ते त्यास म्हणाले, “तुझी पत्नी सारा कोठे आहे?” त्याने उत्तर दिले, “तेथे ती तंबूत आहे.”10त्यांच्यातील एक म्हणाला, “मी वसंतऋतूच्या वेळी तुझ्याकडे नक्की परत येईन, आणि पाहा तेव्हा तुझी पत्नी सारा हिला मुलगा होईल.” तेव्हा त्याच्यामागे असलेल्या तंबूच्या दारामागून सारेने हे ऐकले.11आता अब्राहाम व सारा म्हातारे झाले होते, त्यांचे वय बरेच झाले होते, आणि स्त्रीला ज्या वयात मुले होऊ शकतात, ते साराचे वय निघून गेले होते.12म्हणून सारा स्वतःशीच हसून म्हणाली, “मी म्हातारी झाली आहे, आणि माझा पतीही म्हातारा झाला आहे, आता मला ते सुख लाभेल काय?”13परमेश्वर अब्राहामाला म्हणाला, “सारा का हसली? मी आता इतकी म्हातारी झाली असताना मला मुलगा होईल काय, असे ती का म्हणाली?14परमेश्वरास काही अशक्य आहे काय? येत्या वसंतऋमध्ये, सांगितल्याप्रमाणे मी पुन्हा येईन. पुढील वर्षी साधारण याच वेळी सारा हिला मुलगा होईल.”15नंतर सारा नाकारून म्हणाली, “मी हसले नाही,” कारण ती फार घाबरली होती. त्याने उत्तर दिले, “नाही, तू हसलीसच.”
1संध्याकाळी ते दोन देवदूत सदोमास आले, त्या वेळी लोट सदोमाच्या वेशीजवळ बसला होता. लोटाने त्यांना पाहिले, तो त्यांना भेटण्यास उठला, आणि त्याने भूमीपर्यंत तोंड लववून त्यांना नमन केले.2तो म्हणाला, “माझ्या स्वामी, मी तुम्हास विनंती करतो की, कृपा करून तुम्ही आपल्या सेवकाच्या घरात या, आपले पाय धुवा, आणि आजची रात्र मुक्काम करा.” मग तुम्ही लवकर उठून तुमच्या मार्गाने जा. पण ते म्हणाले, “नाही, आम्ही रात्र नगरातील चौकात घालवू.”3परंतु लोटाने त्यांना आग्रहाने विनंती केली, म्हणून ते त्याच्याबरोबर त्याच्या घरी गेले. त्याने त्यांच्यासाठी जेवण तयार केले व बेखमीर भाकरी भाजल्या आणि ते जेवले.4परंतु ते झोपण्यापूर्वी, त्या नगरातील मनुष्यांनी, सदोम नगराच्या सर्व भागातील तरुण व वृद्ध अशा सर्व माणसांनी लोटाच्या घराला वेढले.5त्यांनी लोटाला हाक मारून म्हटले “आज रात्री तुझ्याकडे आलेली माणसे कोठे आहेत? त्यांना आमच्याकडे बाहेर आण; म्हणजे आम्ही त्यांच्याशी समागम करू.”6लोट घराच्या दारातून बाहेर त्यांच्याकडे आला व त्याने आपल्यामागे दार बंद करून घेतले.7तो म्हणाला, “माझ्या बंधूनो, मी तुम्हास विनंती करतो, तुम्ही असे भयंकर वाईट काम करू नका.8पाहा, माझ्या दोन मुली आहेत ज्यांचा अद्याप कोणाही पुरुषाशी संबंध आला नाही. मी तुम्हास विनंती करतो, मला त्यांना तुमच्याकडे बाहेर आणू द्या, आणि तुम्हास जे चांगले दिसेल तसे त्यांना करा. फक्त या मनुष्यांना काही करू नका, कारण ते माझ्या छपराच्या सावलीखाली राहण्यास आले आहेत.”9ते म्हणाले, “बाजूला हो!” ते असेही म्हणाले, “हा आमच्यात परदेशी म्हणून राहण्यास आला. आणि आता हा आमचा न्यायाधीश बनू पाहत आहे! आता आम्ही तुझे त्यांच्यापेक्षा वाईट करू.” ते त्या मनुष्यास म्हणजे लोटाला अधिक जोराने लोटू लागले व दरवाजा तोडण्यास ते जवळ आले.10परंतु त्या पुरुषांनी त्यांचा हात बाहेर काढून लोटाला आपणाजवळ घरात घेऊन दार बंद केले.11लोटाच्या पाहुण्यांनी घराच्या दाराबाहेर जी सर्व तरुण व म्हातारी माणसे होती, त्यांना आंधळे करून टाकले. ते घराचे दार शोधण्याचा प्रयत्न करून करून थकून गेले.
1अब्राहाम तेथून नेगेबकडे प्रवास करीत आणि कादेश व शूर यांच्यामध्ये राहिला. तो गरारात परदेशी मनुष्य म्हणून राहिला होता.2अब्राहाम आपली पत्नी सारा हिच्याविषयी म्हणाला, “ती माझी बहीण आहे.” गराराचा राजा अबीमलेखाने आपली माणसे पाठवली आणि ते सारेला घेऊन गेले.3परंतु देव रात्री अबीमलेखाच्या स्वप्नात येऊन म्हणाला, “पाहा जी स्त्री तू घेऊन आलास तिच्यामुळे तू मेलाच म्हणून असे समज, कारण ती एका मनुष्याची पत्नी आहे.”4परंतु अबीमलेख तिच्याजवळ गेला नव्हता. तो म्हणाला, “प्रभू, तू नीतिमान राष्ट्राचाही नाश करणार काय?5‘ती माझी बहीण आहे,’ असे तो स्वतःच मला म्हणाला नाही काय? आणि ‘तो माझा भाऊ आहे,’ असे तिनेही म्हटले. मी आपल्या अंतःकरणाच्या शुद्धपणाने आणि आपल्या हाताच्या निर्दोषतेने हे केले आहे.”6मग देव त्यास स्वप्नात म्हणाला, “होय! तू आपल्या अंतःकरणाच्या शुद्धतेने हे केले आहेस हे मला माहीत आहे, आणि तू माझ्याविरूद्ध पाप करू नये म्हणून मी तुला आवरले. मीच तुला तिला स्पर्श करू दिला नाही.7म्हणून आता तू अब्राहामाची पत्नी सारा हि त्यास परत दे; कारण तो संदेष्टा आहे; तो तुझ्यासाठी प्रार्थना करील व तू वाचशील. परंतु तू तिला त्याच्याकडे परत पाठवले नाहीस, तर तू आणि तुझ्या बरोबर जे सर्व तुझे आहेत ते खात्रीने मरतील, हे लक्षात ठेव.”8अबीमलेख सकाळीच लवकर उठला आणि त्याने आपल्या सर्व सेवकांना स्वतःकडे बोलावले. त्याने सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या तेव्हा ती माणसे फारच घाबरली.9मग अबीमलेखाने अब्राहामास बोलावून त्यास म्हटले, “तू हे आम्हांला काय केले? मी तुझ्याविरूद्ध काय पाप केले की तू माझ्यावर आणि माझ्या राष्ट्रावर असे मोठे पाप आणले? तू माझ्याशी करू नये ते केले आहे अशा गोष्टी तू करायच्या नव्हत्या.”10अबीमलेख अब्राहामाला म्हणाला, “तुला हे करण्यास कोणी सुचवले?”11अब्राहाम म्हणाला, “या ठिकाणी देवाचे भय खात्रीने नाही, म्हणून ते माझ्या पत्नीकरीता मला ठार मारतील, असा विचार मी केला.12शिवाय ती खरोखर माझी बहीण आहे. ती माझ्या बापाची मुलगी आहे, पण माझ्या आईची ती मुलगी नाही आणि म्हणून ती माझी पत्नी झाली आहे.13देवाने मला माझ्या बापाचे घर सोडून देऊन जागोजागी प्रवास करायला लावले, तेव्हा मी तिला म्हणालो, तू माझी पत्नी म्हणून मला एवढा विश्वासूपणा दाखव; जेथे जेथे आपण जाऊ तेथे तेथे माझ्याविषयी हा, ‘माझा भाऊ आहे असे सांग.’”14अबीमलेखाने अब्राहामाला सारा परत दिली; तसेच त्याने त्यास मेंढरे, बैल व दास-दासीही दिल्या.15अबीमलेख म्हणाला, “पाहा, माझा हा सर्व देश तुझ्यासमोर आहे; तुला बरे वाटेल तेथे तू राहा.”16तो सारेला म्हणाला, “तुझा भाऊ अब्राहाम याला मी चांदीची एक हजार नाणी दिली आहेत. तुझ्यासोबत असलेल्या सर्व लोकांसमोर तुझी भरपाई करण्यासाठी ते आहेत, आणि या प्रकारे तू सर्वांसमोर पूर्णपणे निर्दोष ठरली आहेस.”17अब्राहामाने देवाची प्रार्थना केली आणि देवाने अबीमलेख, त्याची पत्नी आणि त्याच्या दासी यांना बरे केले. मग त्यांना मुले होऊ लागली.18कारण परमेश्वराने अब्राहामाची पत्नी सारा हिच्यामुळे अबीमलेखाच्या घराण्यातल्या सर्व स्त्रियांची गर्भाशये अगदी बंद केली होती.
1परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे सारेकडे लक्ष दिले, आणि परमेश्वराने सारेला वचन दिल्याप्रमाणे केले.2अब्राहामाच्या म्हातारपणी सारा गरोदर राहिली, त्यास जी नेमलेली वेळी देवाने सांगितली होती त्या वेळी त्याच्यापासून सारेला मुलगा झाला.3अब्राहामाला जो मुलगा सारेपासून झाला त्याचे नाव त्याने इसहाक ठेवले.4देवाने आज्ञा केल्याप्रमाणे अब्राहामाने त्याचा मुलगा इसहाक आठ दिवसाचा झाल्यावर त्याची सुंता केली.5इसहाकाचा जन्म झाला तेव्हा अब्राहाम शंभर वर्षांचा होता.6सारा म्हणाली, “देवाने मला हसवले आहे; जो कोणी हे ऐकेल तो प्रत्येकजण माझ्याबरोबर हसेल.”7आणखी ती असेही म्हणाली, “सारा या मुलाला स्तनपान देईल असे अब्राहामाला कोण म्हणाला असता? आणि तरीसुद्धा त्याच्या म्हातारपणात मला त्याच्यापासून मुलगा झाला आहे!”
1या गोष्टी झाल्यानंतर देवाने अब्राहामाची परीक्षा घेतली. तो अब्राहामाला म्हणाला, “अब्राहामा!” अब्राहाम म्हणाला, “हा मी येथे आहे.”2नंतर देव म्हणाला, “तुझा एकुलता एक प्रिय पुत्र, ज्याच्यावर तू प्रीती करतोस त्या इसहाकाला घेऊन तू मोरिया देशात जा आणि तेथे मी तुला सांगेन त्या डोंगरावर माझ्यासाठी त्याचे होमार्पण कर.”3तेव्हा अब्राहाम पहाटेस लवकर उठला, त्याने खोगीर घालून आपले गाढव तयार केले, आपला मुलगा इसहाक व त्याच्यासोबत दोन तरुण सेवकांना आपल्याबरोबर घेतले. त्याने होमार्पणाकरिता लाकडे फोडून घेतली आणि मग ते सर्व देवाने सांगितलेल्या ठिकाणी प्रवासास निघाले.4तिसऱ्या दिवशी अब्राहामाने वर पाहिले आणि दूर अंतरावर ती जागा पाहिली.5मग अब्राहाम आपल्या तरुण सेवकांना म्हणाला, “तुम्ही येथे गाढवाजवळ थांबा, आणि मी व मुलगा तिकडे जातो. आम्ही देवाची आराधना करू आणि तुम्हाकडे परत येऊ.”6अब्राहामाने होमार्पणासाठी लाकडे घेऊन इसहाकाच्या खांद्यावर ठेवली; त्याने स्वतःच्या हातात अग्नी व एक सुरा घेतला. आणि ते दोघे बरोबर निघाले.7इसहाक आपल्या पित्याला म्हणाला, “माझ्या बाबा.” अब्राहामाने उत्तर दिले, “मी येथे आहे, माझ्या मुला.” इसहाक म्हणाला, “मला लाकडे व अग्नी दिसतात, परंतु होमार्पणासाठी कोकरू कोठे आहे?”8अब्राहाम म्हणाला, “माझ्या मुला, होमार्पणासाठी कोकरू देव स्वतः आपल्याला पुरवेल.” तेव्हा अब्राहाम व त्याचा मुलगा बरोबर निघाले.9देवाने सांगिलेल्या ठिकाणी जेव्हा ते जाऊन पोहचले, तेथे अब्राहामाने एक वेदी बांधली, त्याने वेदीवर लाकडे रचली. नंतर त्याने आपला पुत्र इसहाक याला बांधले, आणि वेदीवरील लाकडावर ठेवले.10मग अब्राहामाने आपला हात पुढे करून आपल्या मुलाला मारण्यासाठी सुरा हातात घेतला.11परंतु तेवढ्यात, परमेश्वराच्या दूताने स्वर्गातून हाक मारून त्यास म्हटले, “अब्राहामा, अब्राहामा!” अब्राहामाने उत्तर दिले, “मी येथे आहे.”12तो म्हणाला, “तू आपल्या मुलावर हात टाकू नकोस, किंवा त्यास कोणत्याही प्रकारची इजा करू नकोस, कारण आता मला खात्रीने समजले की, तू देवाचे भय बाळगतोस, कारण तू माझ्यासाठी आपल्या एकुलत्या एका पुत्राला ही राखून ठेवले नाही.”13आणि मग अब्राहामाने वर पाहिले आणि पाहा, त्याच्यामागे एका झुडपात शिंगे अडकलेला असा एक एडका होता. मग त्याने जाऊन तो घेतला व आपल्या मुलाच्या ऐवजी त्या एडक्याचे होमार्पण म्हणून अर्पण केले.14तेव्हा अब्राहामाने त्या जागेला, “+ यहोवा-यीरे परमेश्वर पुरवठा करेल,” असे नाव दिले, आणि आजवर देखील, “परमेश्वराच्या डोंगरावर तो पुरवठा केला जाईल,” असे बोलले जाते.15नंतर स्वर्गातून परमेश्वराच्या दूताने अब्राहामास दुसऱ्यांदा हाक मारली16आणि म्हटले, हे परमेश्वराचे शब्द आहेत, “मी परमेश्वर आपलीच शपथ वाहून म्हणतो की, तू ही जी गोष्ट केली आहे, म्हणजे तू आपल्या एकुलत्या एका मुलाला राखून ठेवले नाही,17मी खरोखर तुला आशीर्वाद देईन व तुझे वंशज आकाशातल्या ताऱ्यांसारखे व समुद्र किनाऱ्यावरील वाळू इतके बहुतपट वाढवीनच वाढवीन; आणि तुझे वंशज आपल्या शत्रूच्या वेशीचा ताबा मिळवतील.18पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या संततीद्वारे आशीर्वादित होतील, कारण तू माझा शब्द पाळला आहेस.”19मग अब्राहाम आपल्या तरुण सेवकाकडे परत आला आणि अब्राहाम, इसहाक व त्याचे सेवक असे सर्व मिळून बैर-शेबाला गेले, आणि तो बैर-शेबा येथे राहिला.
1सारा एकशे सत्तावीस वर्षे जगली; ही सारेच्या आयुष्याची वर्षे होती.2सारा कनान देशातील किर्याथ-आर्बा, म्हणजे, कनान देशातले हेब्रोन येथे मरण पावली. अब्राहामाने सारेसाठी शोक केला आणि तिच्यासाठी तो रडला.3मग अब्राहाम उठला आणि आपल्या मृत पत्नीपासून गेला, व हेथीच्या मुलांकडे जाऊन म्हणाला,4“मी तुमच्यात परदेशी आहे. कृपा करून मृताला पुरण्यासाठी मला तुमच्यामध्ये माझ्या मालकीची अशी जागा मंजूर करा, म्हणजे मी माझ्या मृताला पुरू शकेन.”5हेथीच्या मुलांनी अब्राहामाला म्हटले,6“माझ्या स्वामी, आमचे ऐका. तुम्ही आमच्यामध्ये देवाचे सरदार आहात. आमच्याकडे असलेल्या उत्तम थडग्यात तुमच्या मयताला पुरा. आमच्यातील कोणीही आपले थडगे तुम्हास द्यायला मना करणार नाही.”7अब्राहाम उठला व त्याने हेथीच्या मुलांना आणि देशातील लोकांस नमन केले.8तो त्यांना म्हणाला, “जर माझ्या मयताला पुरण्यासाठी तुम्ही सहमत आहात, तर मग माझे ऐका आणि माझ्याबरोबर सोहराचा मुलगा एफ्रोन याला माझ्यासाठी विनंती करा.9त्याच्या मालकीची शेताच्या एका टोकाला असलेली मकपेलाची गुहा मला विकत द्यायला सांगा. ती त्याने पूर्ण किंमतीस मला उघडपणे माझ्या मालकीची मृतांना पुरण्याची जागा म्हणून विकत द्यावी.”10तेथे एफ्रोन हा हेथीच्या मुलांबरोबर बसलेला होता, आणि हेथीची मुले व त्याच्या नगराच्या वेशीत येणारे सर्व ऐकत असता, एफ्रोन हित्ती याने अब्राहामाला उत्तर दिले, तो म्हणाला,11“नाही, माझे स्वामी, माझे ऐका. मी ते शेत आणि त्यामध्ये असलेली गुहा तुम्हास देतो. येथे माझ्या लोकांच्या मुलांसमक्ष मी ते शेत व ती गुहा मी तुम्हास देतो. तुमच्या मृताला पुरण्यास मी ते तुम्हास देतो.”12मग अब्राहामाने देशातील लोकांसमोर स्वतः वाकून नमन केले.13देशातले लोक ऐकत असता तो एफ्रोनास म्हणाला, “परंतु जर तुझी इच्छा आहे, तर कृपा करून माझे ऐक. मी शेताची किंमत तुला देईन. माझ्याकडून त्याचे पैसे घे, आणि मग मी आपल्या मयतास तेथे पुरेन.”14एफ्रोनाने अब्राहामाला उत्तर दिले, तो म्हणाला,15“माझे स्वामी, कृपया माझे जरा ऐका. जमिनीचा हा एक तुकडा + साधारण 4.6 किलो ग्राम चारशे शेकेल रुपे किंमताचा, तो माझ्या व तुमच्यामध्ये एवढा काय आहे? तुमच्या मृताला पुरा.”16तेव्हा अब्राहामाने एफ्रोनाचे ऐकले आणि हेथीची मुले ऐकत असता त्याने जितके रुपे सांगितले होते तितके, म्हणजे व्यापाऱ्याकडचे चलनी चारशे शेकेल रुपे एफ्रोनाला तोलून दिले.17एफ्रोनाचे जे शेत मम्रे शेजारी मकपेला येथे होते, ते शेत, व त्यामध्ये असलेली गुहा व त्याच्यासभोवती सीमेतील सर्व झाडे,18ही हेथीच्या मुलांसमक्ष व त्याच्या नगराच्या वेशीत जाणाऱ्या-येणाऱ्या सर्वांसमक्ष अब्राहामाने विकत घेतली.19त्यानंतर अब्राहामाने आपली पत्नी सारा हिला कनान देशातील मम्रे म्हणजे हेब्रोन शहराच्या शेजारी मकपेलाच्या शेतातील गुहेत पुरले.20ते शेत व त्यातील गुहा ही मृतांना पुरण्याची जागा म्हणून हेथीच्या मुलांकडून अब्राहामाच्या मालकीची झाली.
1आता अब्राहाम बऱ्याच वयाचा म्हातारा झाला होता आणि परमेश्वराने अब्राहामाला सर्व गोष्टींत आशीर्वादित केले होते.2अब्राहामाने त्याच्या सर्व मालमत्तेचा व घरादाराचा कारभार पाहणाऱ्या आणि त्याच्या घरातील सर्वांत जुन्या सेवकाला म्हटले, “तू आपला हात माझ्या मांडीखाली ठेव+ हि त्याकाळी शपथ घेण्याची प्रथा होती ,3आणि आकाशाचा देव व पृथ्वीचा देव जो परमेश्वर, याची शपथ मी तुला घ्यायला लावतो की, ज्या कनानी लोकांमध्ये मी राहत आहे, त्यांच्या मुलींतून तू माझ्या मुलांसाठी पत्नी पाहणार नाहीस.4परंतु, तू माझ्या देशाला माझ्या नातेवाइकांकडे जाशील, आणि तेथून माझा मुलगा इसहाक याच्यासाठी पत्नी मिळवून आणशील.”5सेवक त्यास म्हणाला, “ती स्त्री जर माझ्याबरोबर या देशात येण्यास तयार झाली नाही तर? ज्या देशातून तुम्ही आला त्या देशात मी मुलाला घेऊन जावे काय?”6अब्राहाम त्यास म्हणाला, “तू माझ्या मुलाला तिकडे परत घेऊन न जाण्याची खबरदारी घे!7आकाशाचा देव परमेश्वर, ज्याने मला माझ्या वडिलाच्या घरातून व माझ्या नातेवाइकांच्या देशातून+ जन्मदेशातून मला आणले व ज्याने बोलून, ‘मी हा देश तुझ्या संततीला देईन,’ असे शपथपूर्वक अभिवचन दिले, तो परमेश्वर आपल्या दूताला तुझ्या पुढे पाठवील, आणि तू तेथून माझ्या मुलासाठी पत्नी आणशील.8परंतु ती स्त्री तुझ्याबरोबर येथे येण्यास कबूल झाली नाही, तर मग तू माझ्या शपथेतून मोकळा होशील. परंतु माझ्या मुलाला तू तिकडे घेऊन जाऊ नकोस.”9तेव्हा त्या सेवकाने आपला धनी अब्राहाम याच्या मांडीखाली हात ठेवला आणि त्या बाबीसंबंधाने त्याच्याशी शपथ घेतली.10मग त्या सेवकाने धन्याच्या उंटांपैकी दहा उंट घेतले आणि निघाला (त्याच्या धन्याची सर्व मालमत्ता त्याच्या हाती होती). त्याने आपल्या धन्याकडून सर्व प्रकारच्या भेटवस्तू आपल्याबरोबर देण्यासाठी घेतल्या. तो अराम-नहराईम+ मसोपटोमिया प्रदेशातील नाहोराच्या नगरात गेला.11त्याने नगराबाहेरच्या विहिरीजवळ आपले उंट खाली बसवले. ती संध्याकाळ होती, त्या वेळी पाणी काढायला स्त्रिया तेथे येत असत.12नंतर तो म्हणाला, “हे परमेश्वरा, तू माझा धनी अब्राहाम याचा देव आहेस, आज मला यश मिळण्यास मदत कर आणि तू प्रामाणिकपणाने करार पाळणारा आहेस हे माझा धनी अब्राहाम ह्याला दाखवून दे.13पाहा, मी पाण्याच्या झऱ्याजवळ उभा आहे. आणि नगरातील लोकांच्या मुली पाणी काढण्यास बाहेर येत आहेत.14तर असे घडू दे की, मी ज्या मुलीस म्हणेन, ‘मुली तुझी पाण्याची घागर उतरून मला प्यायला पाणी दे,’ आणि ती जर ‘तुम्ही प्या, आणि मी तुमच्या उंटांनाही पाणी पाजते,’ तर मग तीच तुझा सेवक इसहाक ह्याच्यासाठी तू नेमलेली असू दे. त्यावरून मी असे समजेन की, तू माझ्या धन्यासोबत करार पाळण्याचा प्रामाणिकपणा दाखवला आहे.”15मग असे झाले की, त्याचे बोलणे संपले नाही तोच, पाहा, रिबका तिची मातीची घागर तिच्या खांद्यावर घेऊन बाहेर आली. रिबका ही अब्राहामाचा भाऊ नाहोर याच्यापासून मिल्केला झालेल्या बथुवेलाची कन्या होती.16ती तरुण स्त्री फार सुंदर आणि कुमारी होती. तिचा कोणाही पुरुषाबरोबर संबंध आलेला नव्हता. ती विहिरीत खाली उतरून गेली आणि तिची घागर भरून घेऊन वर आली.17तेव्हा तो सेवक धावत जाऊन तिला म्हणाला, “कृपा करून तुझ्या घागरीतून मला थोडे पाणी पाज.”18ती म्हणाली, “प्या माझ्या प्रभू,” आणि तिने लगेच आपली घागर आपल्या हातावर उतरून घेऊन घेतली, आणि त्यास पाणी पाजले.19त्यास पुरे इतके पाणी पाजल्यानंतर ती म्हणाली, “मी तुमच्या उंटांसाठीसुद्धा, त्यांना पुरेल इतके पाणी पिण्यास काढते.”20म्हणून तिने घाईघाईने उंटांसाठी घागर कुंडात ओतली, आणि आणखी पाणी काढण्याकरिता ती धावत विहिरीकडे गेली, आणि याप्रमाणे तिने त्याच्या सगळ्या उंटांना पाणी पाजले.21तेव्हा, परमेश्वर देवाने आपला प्रवास यशस्वी केला की नाही, हे समजावे म्हणून तो मनुष्य तिच्याकडे शांतपणे पाहत राहिला.22उंटांचे पाणी पिणे संपल्यावर त्या मनुष्याने अर्धा शेकेल वजनाची सोन्याची नथ आणि तिच्या हातासाठी दहा शेकेल वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या काढल्या,23आणि विचारले, “तू कोणाची मुलगी आहेस? तसेच तुझ्या वडिलाच्या घरी आम्हा सर्वांना रात्री मुक्काम करावयास जागा आहे का ते कृपा करून सांग.”24ती त्यास म्हणाली, “मी बथुवेलाची, म्हणजे नाहोरापासून मिल्केला जो मुलगा झाला त्याची मुलगी आहे.”25ती आणखी त्यास म्हणाली, “आमच्याकडे तुमच्या उंटांसाठी भरपूर गवत व पेंढा आहे आणि तुमच्या सर्वांसाठी मुक्काम करण्यासाठी आमच्याकडे भरपूर जागा आहे.”26तेव्हा त्या मनुष्याने लवून परमेश्वराची उपासना केली.27तो म्हणाला, “माझा धनी, अब्राहाम ह्याचा देव परमेश्वर धन्यवादित असो, त्याने माझ्या धन्यासंबंधीचा कराराचा प्रामाणिकपणा आणि विश्वसनीयता सोडली नाही, माझ्याबाबत सांगायचे तर, परमेश्वराने मला माझ्या धन्याच्या नातेवाइकाकडेच सरळ मार्ग दाखवून आणले.”28नंतर ती तरुण स्त्री पळत गेली आणि तिने या सर्व गोष्टींबद्दल आपल्या आईला व घरच्या सर्वांना सांगितले.29रिबकेला एक भाऊ होता, आणि त्याचे नाव लाबान होते. लाबान बाहेर विहिरीजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या त्या मनुष्याकडे पळत गेला.30जेव्हा त्याने आपल्या बहिणीच्या नाकातील नथ व हातातील सोन्याच्या बांगड्या पाहिल्या, आणि “तो मनुष्य मला असे म्हणाला,” असे आपल्या बहिणीचे, म्हणजे रिबकेचे शब्द ऐकले, तेव्हा तो त्या मनुष्याकडे आला, आणि पाहतो तो, तो उंटांपाशी विहिरीजवळ उभा होता.31आणि लाबान त्यास म्हणाला, “परमेश्वराचा आशीर्वाद लाभलेले तुम्ही, आत या. तुम्ही बाहेर का उभे आहात? मी तुमच्यासाठी घर तयार केले आहे आणि उंटासाठीही जागा केली आहे.”32तो मनुष्य घरी आला आणि त्याने उंट सोडले. उंटांना गवत व पेंढा दिला आणि त्याचे पाय व त्याच्या बरोबरच्या लोकांचे पाय धुण्यासाठी पाणी देण्यात आले.33त्यांनी त्याच्या पुढे जेवण वाढले, परंतु तो म्हणाला, “मला जे काही सांगायचे ते सांगेपर्यंत मी जेवणार नाही.” तेव्हा लाबान म्हणाला, “सांगा.”34तो म्हणाला, “मी अब्राहामाचा सेवक आहे.35परमेश्वर देवाने माझ्या धन्याला फार आशीर्वादित केले आहे आणि तो महान बनला आहे. त्याने त्यास मेंढरांचे कळप, गुरेढोरे, तसेच सोने, चांदी, दासदासी, उंट व गाढवे दिली आहेत.36सारा, ही माझ्या धन्याची पत्नी वृद्ध झाली तेव्हा तिच्यापासून माझ्या धन्याला मुलगा झाला, आणि त्यास त्याने आपले सर्वकाही दिले आहे.37माझ्या धन्याने माझ्याकडून वचन घेतले, तो म्हणाला, ‘ज्यांच्या राज्यात मी माझे घर केले आहे त्या कनानी लोकांतून माझ्या मुलासाठी कोणी मुलगी पत्नी करून घेऊ नकोस.38त्याऐवजी माझ्या वडिलाच्या परिवाराकडे जा, आणि माझ्या नातलगांकडे जा व तेथून माझ्या मुलासाठी तू पत्नी मिळवून आण.’39मी माझ्या धन्याला म्हणालो, ‘यदाकदाचित मुलगी माझ्याबरोबर येणार नाही?’40परंतु तो मला म्हणाला, ‘ज्या परमेश्वरासमोर मी चालत आहे, तो त्याच्या दूताला तुझ्याबरोबर पाठवील व तो तुझा मार्ग यशस्वी करील, आणि तू माझ्या नातलगांतून व माझ्या वडिलाच्या घराण्यातून माझ्या मुलासाठी पत्नी आणशील.41परंतु जेव्हा तू माझ्या नातलगांमध्ये जाशील आणि जर त्यांनी तुला ती दिली नाही, तर मग तू माझ्या शपथेतून मोकळा होशील.’42आणि आज मी या झऱ्याजवळ आलो आणि म्हणालो, ‘हे परमेश्वरा, माझा धनी अब्राहाम याच्या देवा, कृपा करून जर खरोखर माझ्या प्रवासाचा हेतू यशस्वी करीत असलास तर,43मी येथे या झऱ्याजवळ उभा आहे, आणि असे होऊ दे की, जी मुलगी पाणी काढण्यास येईल आणि जिला मी म्हणेन, “मी तुला विनंती करतो, तू आपल्या घागरीतले थोडे पाणी मला प्यायला दे,”44तेव्हा जी मला म्हणेल, “तुम्ही प्या, आणि मी तुमच्या उंटासाठी ही पाणी काढते” तीच मुलगी माझ्या धन्याच्या मुलासाठी परमेश्वराने निवडलेली आहे असे मी समजेन.45मी माझ्या मनात बोलणे संपण्याच्या आत पाहा रिबका खांद्यावर घागर घेऊन बाहेर आली. ती विहिरीत खाली उतरली आणि पाणी काढले. मग मी तिला म्हणालो, “मुली, कृपा करून मला थोडे पाणी प्यायला दे.”46तेव्हा तिने लगेच खांद्यावरून घागर उतरली आणि म्हणाली, “प्या आणि मी तुमच्या उंटांनाही पाणी पाजते.” मग मी प्यालो आणि तिने उंटांनाही पाणी पाजले.47मग मी तिला विचारले, “तू कोणाची मुलगी आहेस?” ती म्हणाली, “नाहोरापासून मिल्केला झालेल्या बथुवेलाची मी मुलगी,” तेव्हा मग मी तिला सोन्याची नथ आणि हातात घालण्यासाठी सोन्याच्या दोन बांगडया दिल्या.48नंतर मी मस्तक लववून माझा धनी अब्राहाम याचा देव परमेश्वर याची स्तुती केली, कारण त्याने मला माझ्या धन्याच्या भावाच्या मुलीला त्याच्या मुलाकडे नेण्याचा योग्य मार्ग दाखवला.49“आता तुम्ही माझ्या धन्याशी प्रामाणिकपणाने आणि सत्याने वागण्यास तयार असाल तर मला सांगा. परंतु जर नाही तर तसे मला सांगा; यासाठी की मी उजवीकडे किंवा डावीकडे वळेन.”50मग लाबान व बथुवेल यांनी उत्तर दिले, “ही गोष्ट परमेश्वराकडून आली आहे. आम्ही तुम्हास बरे किंवा वाईट काही बोलू शकत नाही.51पाहा, रिबका तुमच्यासमोर आहे. तिला तुम्ही घेऊन जा आणि परमेश्वर बोलल्याप्रमाणे ती तुमच्या धन्याच्या मुलाची पत्नी व्हावी.”52जेव्हा अब्राहामाच्या सेवकाने हे त्यांचे शब्द ऐकले, तेव्हा त्याने भूमीपर्यंत वाकून परमेश्वर देवाला नमन केले.53सेवकाने सोन्याचे दागिने व चांदीचे दागिने व वस्त्रे रिबकेला दिली. त्याने तिचा भाऊ व तिची आई यांनाही मोलवान देणग्या दिल्या.54मग त्याने व त्याच्या बरोबरच्या माणसांनी त्यांचे खाणे व पिणे झाल्यावर रात्री तेथेच मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर ते म्हणाले, “आता मला माझ्या धन्याकडे पाठवा.”55तेव्हा तिची आई व भाऊ म्हणाले, “रिबकेला आमच्याजवळ थोडे दिवस म्हणजे निदान दहा दिवस तरी राहू द्या. मग तिने जावे.”56परंतु तो त्यांना म्हणाला, “मला थांबवून घेऊ नका, कारण परमेश्वराने माझा मार्ग यशस्वी केला आहे, मला माझ्या मार्गाने पाठवा जेणेकरून मी माझ्या धन्याकडे जाईन.”57ते म्हणाले, “आम्ही मुलीला बोलावून तिला विचारतो.”58मग त्यांनी रिबकेला बोलावून तिला विचारले, “या मनुष्याबरोबर तू जातेस काय?” तिने उत्तर दिले, “मी जाते.”59मग त्यांची बहीण रिबका, तिच्या दाईसोबत अब्राहामाचा सेवक व त्याची माणसे यांच्या बरोबर प्रवासास निघाली.60त्यांनी रिबकेला आशीर्वाद दिला आणि तिला म्हटले, “आमच्या बहिणी, तू हजारो लाखांची आई हो, आणि तुझे वंशज त्यांचा द्वेष करणाऱ्यांच्या वेशीचा ताबा घेवोत.”61मग रिबका उठली व ती व तिच्या दासी उंटावर बसल्या आणि त्या मनुष्याच्या मागे गेल्या. अशा रीतीने सेवकाने रिबकेला घेतले आणि त्याच्या मार्गाने गेला.62इकडे इसहाक नेगेब येथे राहत होता आणि नुकताच बैर-लहाय-रोई विहिरीपासून परत आला होता.63इसहाक संध्याकाळी मनन करण्यास शेतात गेला होता. त्याने आपली नजर वर केली व पाहिले तेव्हा त्यास उंट येताना दिसले.64रिबकेने नजर वर करून जेव्हा इसहाकाला पाहिले तेव्हा ती उंटावरून उडी मारून खाली उतरली.65ती सेवकाला म्हणाली, “शेतातून आपल्याला भेटावयास सामोरा येत असलेला पुरुष कोण आहे?” सेवकाने उत्तर दिले, “तो माझा धनी आहे.” तेव्हा तिने बुरखा घेतला आणि स्वतःला झाकून घेतले.66सेवकाने इसहाकाला सर्व गोष्टी, त्याने काय केले त्याविषयी सविस्तर सांगितले.67मग इसहाकाने मुलीला आपली आई सारा हिच्या तंबूत आणले. आणि त्याने रिबकेला स्विकारले, आणि ती त्याची पत्नी झाली, आणि त्याने तिच्यावर प्रेम केले. अशा रीतीने आपल्या आईच्या मरणानंतर इसहाक सांत्वन पावला.
1अब्राहामाने दुसरी पत्नी केली; तिचे नाव कटूरा होते.2तिच्यापासून त्यास जिम्रान, यक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक व शूह ही मुले झाली.3यक्षानास शबा व ददान झाले. अश्शूरी, लटूशी व लऊमी लोक हे ददानाचे वंशज होते.4एफा, एफर, हनोख, अबीदा व एल्दा हे मिद्यानाचे पुत्र होते. हे सर्व कटूरेचे वंशज होते.5अब्राहामाने आपले सर्वस्व इसहाकास दिले.6अब्राहामाने आपल्या उपपत्नीच्या मुलांना देणग्या दिल्या, आणि आपण जिवंत असतानाच त्याने आपला मुलगा इसहाकापासून त्यांना वेगळे करून दूर पूर्वेकडील देशात पाठवून दिले.
1अब्राहामाच्या दिवसात जो पहिला दुष्काळ पडला होता त्यासारखा दुसरा दुष्काळ त्या देशात पडला. तेव्हा इसहाक पलिष्ट्यांचा राजा अबीमलेख याजकडे गरार नगरामध्ये गेला.2परमेश्वराने त्यास दर्शन देऊन म्हटले, “तू मिसर देशात खाली जाऊ नकोस; जो देश मी तुला सांगेन त्यामध्येच राहा.3या देशात उपरी म्हणून राहा आणि मी तुझ्याबरोबर असेन आणि मी तुला आशीर्वाद देईन; कारण हे सर्व देश मी तुझ्या वंशजाला देईन, आणि तुझ्या बाप अब्राहाम याला शपथ घेऊन जे वचन दिले आहे ते सर्व मी पूर्ण करीन.4मी तुझे वंशज आकाशातील ताऱ्यांइतके बहुगुणित करीन आणि हे सर्व देश मी तुझ्या वंशजांना देईन. तुझ्या वंशजांद्वारे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील.5मी हे करीन कारण अब्राहामाने माझा शब्द पाळला आणि माझे विधी, माझ्या आज्ञा, माझे नियम व माझे कायदे पाळले.”6म्हणून मग इसहाक गरारातच राहिला.7जेव्हा तेथील लोकांनी त्याच्या पत्नीविषयी त्यास विचारले, तेव्हा तो म्हणाला, “ती माझी बहीण आहे.” “ती माझी पत्नी आहे,” असे म्हणण्यास तो घाबरला. कारण त्याने विचार केला की, “रिबकेला मिळविण्यासाठी या ठिकाणचे लोक माझा घात करतील, कारण ती दिसायला इतकी सुंदर आहे.”8इसहाक बराच काळ तेथे राहिल्यावर, पलिष्ट्यांचा राजा अबीमलेख ह्याने एकदा खिडकीतून बाहेर पाहताना पाहिले की, इसहाक त्याच्या पत्नीला रिबकेला प्रेमाने कुरवाळत आहे.9अबीमलेखाने इसहाकाला बोलावले आणि म्हणाला, “पाहा नक्कीच ही तुझी पत्नी आहे. मग, ‘ती तुझी बहीण आहे’ असे तू का सांगितलेस?” इसहाक त्यास म्हणाला, “कारण मला वाटले की, तिला मिळविण्यासाठी कोणीही मला मारून टाकेल.”10अबीमलेख म्हणाला, “तू आम्हांला हे काय केलेस? कारण आमच्या लोकांतून कोणीही तुझ्या पत्नीबरोबर सहज लैंगिक संबंध केला असता, आणि त्यामुळे तू आमच्यावर दोष आणला असतास.”11म्हणून अबीमलेखाने सर्व लोकांस ताकीद दिली आणि म्हणाला, “जो कोणी या मनुष्यास किंवा याच्या पत्नीला हात लावेल त्यास खचित जिवे मारण्यात येईल.”12इसहाकाने त्या देशात धान्य पेरले आणि त्याच वर्षी त्यास शंभरपट पीक मिळाले, कारण परमेश्वराने त्यास आशीर्वाद दिला.13इसहाक धनवान झाला, तो अधिकाधिक वाढत गेला आणि खूप महान होईपर्यंत वाढत गेला.14त्याच्याकडे पुष्कळ मेंढरे व गुरेढोरे, मोठा कुटुंबकबिला होता. त्यावरून पलिष्टी त्याचा हेवा करू लागले; 15म्हणून त्याच्या वडिलाच्या हयातीत पूर्वी त्याच्या नोकरांनी खणलेल्या सर्व विहिरी पलिष्ट्यांनी मातीने बुजवल्या होत्या.16तेव्हा अबीमलेख इसहाकास म्हणाला, “तू आमचा देश सोडून निघून जा कारण आमच्यापेक्षा तू अधिक शक्तीमान झाला आहेस.”17म्हणून इसहाकाने तो देश सोडला व गराराच्या खोऱ्यात त्याने तळ दिला आणि तेथेच राहिला.18अब्राहामाने आपल्या दिवसात ज्या पाण्याच्या विहिरी खणल्या होत्या, परंतु अब्राहामाच्या मरणानंतर त्या पलिष्टी लोकांनी मातीने बुजविल्या होत्या त्या पुन्हा एकदा इसहाकाने खणून घेतल्या, आणि त्याच्या वडिलाने दिलेली नावेच पुन्हा त्याने दिली.19जेव्हा इसहाकाच्या नोकरांनी एक विहीर खोऱ्यात खणली, तेव्हा त्या विहिरीत त्यांना एक जीवंत पाण्याचा झरा लगला.20गरार खोऱ्यातील गुराख्यांनी इसहाकाच्या गुराख्यांशी भांडणे केली, ते म्हणाले, “हे पाणी आमचे आहे.” ते त्याच्याशी भांडले म्हणून इसहाकाने त्या विहिरीचे नाव “एसेक+ अर्थ-तंटा ” ठेवले.21मग त्यांनी दुसरी विहीर खणली, आणि तिच्यावरूनही ते भांडले म्हणून त्याने तिचे नाव “सितना” ठेवले.22तो तेथून निघाला आणि त्याने आणखी एक विहीर खणली, परंतु तिच्यासाठी ते भांडले नाहीत म्हणून त्याने तिचे नाव रहोबोथ + अर्थ-मोठी जागा ठेवले. आणि तो म्हणाला, “आता परमेश्वरने आम्हासाठी जागा शोधून दिली आहे, आणि देशात आमची भरभराट होईल.”23नंतर तेथून इसहाक बैर-शेबा येथे गेला.24त्याच रात्री परमेश्वराने इसहाकाला दर्शन देऊन म्हटले, “मी तुझा बाप अब्राहाम याचा देव आहे. भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे आणि माझा सेवक अब्राहाम याच्यासाठी मी तुला आशीर्वादित करीन व तुझे वंशज बहुतपट करीन.”25तेव्हा इसहाकाने तेथे वेदी बांधली व परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली. त्याने तेथे आपला तंबू ठोकला आणि त्याच्या नोकरांनी एक विहीर खणली.
1जेव्हा इसहाक म्हातारा झाला आणि त्याची नजर मंद झाल्यामुळे त्यास दिसेनासे झाले तेव्हा त्याने आपला वडील मुलगा एसाव याला बोलावून म्हटले, “माझ्या मुला.” तो म्हणाला, “काय बाबा?”2तो म्हणाला, “हे पाहा, मी म्हातारा झालो आहे, माझ्या मरणाचा दिवस मला माहीत नाही.3म्हणून तुझी हत्यारे, बाणांचा भाता व धनुष्य घे, आणि बाहेर रानात जा आणि माझ्यासाठी शिकार घेऊन ये.4मला आवडणारे रुचकर जेवण तयार करून माझ्याकडे आण, म्हणजे मग मी ते खाईन व मरण्यापूर्वी मी तुला आशीर्वाद देईन.”5जेव्हा इसहाक त्याच्या मुलाशी बोलत होता तेव्हा रिबका ऐकत होती. एसाव रानात शिकार करून घेऊन येण्यासाठी गेला.6रिबका आपला मुलगा याकोब याला म्हणाली, “हे पाहा, तुझ्या बापाला तुझा भाऊ एसावाशी बोलताना मी ऐकले. तो म्हणाला,7‘माझ्यासाठी शिकार घेऊन ये आणि त्याचे रुचकर जेवण करून माझ्याकडे घेऊन ये म्हणजे मी ते खाईन आणि माझ्या मरण्यापूर्वी परमेश्वराच्या उपस्थितीत तुला आशीर्वाद देईन.’8तर आता माझ्या मुला, मी तुला आज्ञा देते त्याप्रमाणे माझा शब्द पाळ.9आपल्या कळपाकडे जा आणि त्यातून दोन चांगली करडे घेऊन मला आणून दे. मी त्यांचे तुझ्या वडिलाच्या आवडीचे रुचकर जेवण तयार करते,10मग ते जेवण तुझ्या बापाकडे घेऊन जा, म्हणजे मग ते खाऊन तुझा बाप मरण्यापूर्वी तुला आशीर्वाद देईल.”11परंतु याकोब आपली आई रिबका हिला म्हणाला, “माझा भाऊ एसाव केसाळ मनुष्य आहे; मी गुळगुळीत मनुष्य आहे.12कदाचित माझा बाप मला स्पर्श करेल आणि मी फसवणारा असा होईल. मी आपणावर शाप ओढवून घेईन, आशीर्वाद आणणार नाही.”13त्याची आई त्यास म्हणाली, “माझ्या मुला, तुझ्यावरचा शाप माझ्यावर येवो. केवळ माझा शब्द पाळ आणि जा, माझ्याकडे ते घेऊन ये.”14मग याकोब गेला आणि ती करडे आईकडे घेऊन आला. त्याच्या आईने त्यांचे त्याच्या वडिलाच्या आवडीचे रुचकर जेवण तयार केले.15रिबकाने आपला वडील मुलगा एसावाचे चांगले कपडे घरात तिच्याजवळ होते ते घेऊन आपला धाकटा मुलगा याकोबाच्या अंगात घातले.16तसेच तिने करडांचे कातडे याकोबाच्या हातावर व त्याच्या मानेवरच्या गुळगुळीत भागावर लावले.17तिने स्वतः इसहाकासाठी तयार केलेले रुचकर जेवण आणि भाकर आणून याकोबाच्या हातात दिले.18ते घेऊन याकोब आपल्या बापाकडे गेला आणि म्हणाला, “माझ्या बापा” तो म्हणाला, “मी येथे आहे, माझ्या मुला तू कोण आहेस?”19याकोब आपल्या बापाला म्हणाला, “मी तुमचा वडील मुलगा एसाव आहे; तुम्ही मला सांगतिले तसे मी केले आहे. तेव्हा आता उठून बसा व तुमच्यासाठी शिकार करून आणलेले मांस खा म्हणजे मग तुम्ही मला आशीर्वाद द्याल.”20इसहाक आपल्या मुलाला म्हणाला, “माझ्या मुला एवढ्या लवकर तुला शिकार कशी काय मिळाली?” याकोब म्हणाला, “कारण तुमचा देव परमेश्वराने मला मिळवून दिली.”21इसहाक याकोबाला म्हणाला, “माझ्या मुला, माझ्याजवळ ये, म्हणजे मी तुला स्पर्श करतो आणि मग तू खरेच माझा मुलगा एसावच आहेस की नाही हे मला समजेल.”22तेव्हा याकोब आपल्या बापाजवळ गेला. इसहाकाने त्यास स्पर्श केला आणि म्हणाला, “तुझा आवाज तर याकोबाच्या आवाजासारखा आहे. परंतु तुझे हात मात्र एसावाच्या हातासारखे केसाळ आहेत.”23इसहाकाने त्यास ओळखले नाही कारण त्याचे हात एसावाच्या हातासारखे केसाळ होते, म्हणून त्याने त्यास आशीर्वाद दिला.24तो म्हणाला, “तू खरेच माझा मुलगा एसावच आहेस काय?” आणि तो म्हणाला, “मी आहे.”25इसहाक म्हणाला, “तू जेवण माझ्याकडे आण, आणि मी तू आणलेले हरणाचे ते मांस खाईन, मग तुला आशीर्वाद देईन.” तेव्हा याकोबाने आपल्या बापाला जेवण दिले. इसहाकाने ते खाल्ले आणि याकोबाने त्याच्यासाठी द्राक्षारसही दिला आणि तो प्याला.26मग इसहाक त्याचा बाप त्यास म्हणाला, “माझ्या मुला जरा माझ्याजवळ ये व मला चुंबन दे.”27मग याकोब आपल्या बापाजवळ गेला आणि त्याने त्याचे चुंबन घेतले. आणि त्याने त्याच्या कपड्यांचा वास घेतला; त्याने त्यास आशीर्वाद दिला. तो म्हणाला, “पाहा ज्या शेताला परमेश्वराने आशीर्वाद दिला त्याचा वास जसा येतो तसा माझ्या मुलाचा वास आहे.28देव तुला आकाशातले दव व भूमीची समृद्धी व भरपूर धान्य व द्राक्षारस देईल.29लोक तुझी सेवा करोत व राष्ट्रे तुझ्यापुढे नमोत. तू तुझ्या भावांवर राज्य करशील. तुझ्या आईची मुले तुला नमन करतील. तुला शाप देणारा प्रत्येकजण शापित होईल आणि तुला आशीर्वाद देणारा प्रत्येकजण आशीर्वादित होईल.”30इसहाकाने याकोबाला आशीर्वाद देण्याचे संपविले आणि त्यानंतर याकोब आपल्या बापापासून निघून गेला तोच एसाव शिकारीहून आला.31त्यानेही आपल्या वडिलाच्या आवडीचे रुचकर भोजन तयार करून आपल्या बापाजवळ आणले, तो त्याच्या बापाला म्हणाला, “माझ्या वडिलाने उठावे आणि तुमच्या मुलाने शिकार करून आणलेले मांस खावे जेणेकरून मला आशीर्वाद द्यावा.”32इसहाक त्याचा बाप त्यास म्हणाला, “तू कोण आहेस?” तो म्हणाला, “मी तुमचा मुलगा वडील मुलगा एसाव आहे.”33मग इसहाक भीतीने थरथर कापत म्हणाला, “तर मग तू येण्या अगोदर ज्याने मांस तयार करून मला आणून दिले तो कोण होता? मी ते सर्व खाऊन त्यास आशीर्वाद दिला. खरोखर तो आशीर्वादित होईल.”34जेव्हा एसावाने आपल्या बापाचे शब्द ऐकले, तो खूप मोठ्याने ओरडून आणि दुःखाने रडून म्हणाला “माझ्या पित्या; मलाही आशीर्वाद द्या.”35इसहाक म्हणाला, “तुझा भाऊ कपटाने येथे आला आणि तो तुझे आशीर्वाद घेऊन गेला.”36एसाव म्हणाला, “त्याचे याकोब + अर्थ-पाय पकडणारा किंवा धोका देणारा हे नाव त्यास योग्यच आहे की नाही? त्याने माझी दोनदा फसवणूक केली आहे. त्याने माझा ज्येष्ठपणाचा हक्क हिरावून घेतला आणि आता त्याने माझा आशीर्वादही काढून घेतला आहे.” आणि एसाव म्हणाला, “माझ्याकरिता तुम्ही काही आशीर्वाद राखून ठेवला नाही काय?”37इसहाकाने एसावास उत्तर दिले आणि म्हणाला “पाहा, मी त्यास तुझ्यावर धनीपणा करण्याचा अधिकार दिला आहे, आणि तुझे सर्व बंधू त्याचे सेवक होतील. आणि त्यास मी धान्य व नवा द्राक्षारस दिला आहे. माझ्या मुला, मी तुझ्यासाठी काय करू.”38एसाव आपल्या बापाला म्हणाला, “माझ्या बापा, माझ्यासाठी तुमच्याकडे एकही आशीर्वाद नाही काय? माझ्या बापा मलाही आशीर्वाद द्या.” एसाव मोठ्याने रडला!39मग त्याचा बाप इसहाकाने उत्तर दिले आणि त्यास म्हणाला, “पाहा, जेथे पृथ्वीवरील समृद्धी व आकाशातले दंव पडते त्या ठिकाणापासून दूर तुझी वस्ती होईल.40तुझ्या तलवारीने तू जगशील व आपल्या भावाची सेवा करशील, परंतु जेव्हा तू बंड करशील, तू आपल्या मानेवरून त्याचे जू मोडून टाकशील.”
1इसहाकाने याकोबाला बोलावून त्यास आशीर्वाद दिला आणि त्यास आज्ञा दिली, “तू कनानी मुलगी पत्नी करून घेऊ नको.2ऊठ, तू पदन-अरामात तुझ्या आईचा बाप बथुवेल याच्या घरी जा. आणि तुझ्या आईचा भाऊ लाबान त्याच्या मुलींपैकीच एकीला पत्नी करून घे.3सर्वसमर्थ देव तुला आशीर्वादित करो आणि तू राष्ट्रांचा समुदाय व्हावे म्हणून तो तुला सफळ करून बहुतपट करो.4तो तुला व तुझ्यानंतर तुझ्या वंशजाला अब्राहामाचे आशीर्वाद देवो, आणि जो हा देश परमेश्वराने अब्राहामाला दिला व ज्यात तू राहतोस तो देश तुला वतन म्हणून लाभो.”5अशा रीतीने इसहाकाने याकोबाला दूर पाठवले. याकोब पदन-अराम येथे, अरामी बथुवेलाचा मुलगा, याकोब व एसाव यांची आई रिबका हिचा भाऊ लाबान याच्याकडे गेला.
1नंतर याकोबाने आपला प्रवास पुढे चालू ठेवला आणि तो पूर्वेकडील लोकांच्या देशात आला.2त्याने पाहिले तेव्हा त्यास एका शेतात एक विहीर दिसली आणि पाहा तिच्याजवळ मेंढरांचे तीन कळप बसलेले होते. या विहिरीतून कळपांना पाणी पाजीत असत आणि या विहिरीच्या तोंडावरचा दगड मोठा होता.3जेव्हा सर्व कळप तेथे जमत तेव्हा मेंढपाळ विहिरीच्या तोंडावरील मोठा दगड ढकलून बाजूला काढीत मग सर्व कळपांचे पाणी पिऊन झाल्यावर ते तो दगड परत त्याच जागेवर ठेवत.4याकोब त्यांना म्हणाला, “माझ्या बंधूंनो, तुम्ही कोठून आलात?” ते म्हणाले, “आम्ही हारान प्रदेशाहून आलो आहोत.”5मग तो त्यांना म्हणाला, “नाहोराचा नातू + मुलगा लाबान याला तुम्ही ओळखता का?” ते म्हणाले, “होय, आम्ही त्यास ओळखतो.”6याकोबाने त्यांना विचारले, “तो बरा आहे काय?” त्यांनी उत्तर दिले, “तो बरा आहे आणि ती पाहा त्याची मुलगी राहेल मेंढरे घेऊन इकडे येत आहे.”7याकोब म्हणाला, “हे पाहा, अद्याप दिवस बराच आहे आणि तसेच कळपांना एकत्र करण्याची अजून वेळ झाली नाही. तेव्हा मेंढरांना पाणी पाजा, आणि चरण्यासाठी त्यांना परत जाऊ द्या.”8परंतु ते म्हणाले, “आम्हांला तसे करता येत नाही, कारण सर्व कळप एकत्र आल्यावरच आम्ही विहिरीवरील दगड बाजूला सारतो व मग सर्व कळपांना पाणी पाजतो.”9याकोब त्यांच्याशी बोलत असतानाच राहेल आपल्या बापाची मेंढरे घेऊन आली. कारण तीच त्यांना राखीत होती.10जेव्हा याकोबाने आपल्या आईचा भाऊ लाबान याची मुलगी राहेल हिला व आपल्या आईच्या भावाच्या मेंढरांना पाहिले तेव्हा याकोबाने जवळ येऊन विहिरीच्या तोंडावरून दगड लोटला व आपल्या आईचा भाऊ लाबान याच्या मेंढरांना पाणी पाजले.11याकोबाने राहेलीचे चुंबन घेतले आणि मोठ्याने रडला.12याकोबाने राहेलला सांगितले की, तो तिच्या वडिलाच्या नात्यातील आहे, म्हणजे रिबकेचा मुलगा आहे. तेव्हा राहेल धावत गेली आणि तिने आपल्या बापाला सांगितले.13जेव्हा आपल्या बहिणीचा मुलगा याकोब आल्याची बातमी लाबानाने ऐकली, तेव्हा लाबान धावत जाऊन त्यास भेटला. त्यास मिठी मारली, त्याची चुंबने घेतली आणि त्यास आपल्या घरी घेऊन आला. मग याकोबाने सर्व गोष्टी लाबानाला सांगितल्या.14मग लाबान त्यास म्हणाला, “खरोखर तू माझे हाड व माझे मांस आहेस.” त्यानंतर याकोब एक महिनाभर त्याच्यापाशी राहिला.15लाबान याकोबाला म्हणाला, “तू काही मोबदला न घेता काम करीत राहावेस काय? कारण तू माझा नातलग आहेस तर तुला मी काय वेतन द्यावे ते सांग?”16लाबानाला दोन मुली होत्या; थोरल्या मुलीचे नाव होते लेआ आणि धाकटीचे राहेल.17लेआचे डोळे अधू होते, परंतु राहेल सुडौल बांध्याची व दिसावयास सुंदर होती.18याकोबाचे राहेलीवर प्रेम होते, म्हणून तो लाबानास म्हणाला, “तुझी धाकटी मुलगी राहेल हिच्यासाठी मी सात वर्षे तुमची सेवाचाकरी करीन.”19लाबान म्हणाला, “परक्या मनुष्यास देण्यापेक्षा, ती मी तुला द्यावी हे बरे आहे. माझ्यापाशी राहा.”20म्हणून याकोबाने सात वर्षे राहेलसाठी सेवाचाकरी केली; आणि राहेलीवरील प्रेमामुळे ती वर्षे त्यास फार थोड्या दिवसांसारखी वाटली.21नंतर याकोब लाबानास म्हणाला, “आता माझी मुदत भरली आहे, माझी पत्नी मला द्या म्हणजे मी तिच्याशी लग्न करीन.”22तेव्हा लाबानाने तेथील सर्व लोकांस एकत्र केले आणि मेजवानी दिली.23त्या संध्याकाळी लाबानाने आपली मुलगी लेआ हिला घेतले आणि याकोबाकडे आणले; तो तिच्यापाशी गेला24लाबानाने आपली दासी जिल्पा आपल्या मुलीची दासी म्हणून तिला दिली.25सकाळी याकोबाने पाहिले तो पाहा, ती लेआ होती. मग याकोब लाबानाला म्हणाला, “तुम्ही मला हे काय केले आहे? मी राहेलीसाठी तुमची चाकरी केली नाही काय? तुम्ही मला का फसवले?”26लाबान म्हणाला, “आमच्या रीतीरीवाजाप्रमाणे थोरल्या मुलीच्या आधी आम्ही धाकट्या मुलीला देत नाही.27या मुलीचा लग्न विधीचा सप्ताह पूर्ण होऊ दे, म्हणजे मग मी तुला लग्न करण्यासाठी दुसरीही देतो, परंतु त्यासाठी तू आणखी सात वर्षे माझी सेवाचाकरी केली पाहिजेस.”28त्याप्रमाणे याकोबाने केले, लेआचे सप्तक पूर्ण केले. मग लाबानाने त्याची धाकटी कन्या राहेल त्यास पत्नी करून दिली;29लाबानाने आपली दासी बिल्हा, आपली कन्या राहेल हिला दासी म्हणून दिली.30तेव्हा मग याकोबाने राहेलीशीही लग्न केले; आणि याकोबाचे लेआपेक्षा राहेलीवर अधिक प्रेम होते, म्हणून लाबानाकडे याकोबाने राहेलीसाठी आणखी सात वर्षे सेवाचाकरी केली.
1याकोबापासून आपल्याला मुल होत नाहीत हे पाहिल्यावर राहेल आपली बहीण लेआ हिचा मत्सर करू लागली; तेव्हा राहेल याकोबाला म्हणाली, “मला मुल द्या, नाही तर मी मरेन.”2याकोबाचा राहेलवर राग भडकला. तो म्हणाला, “ज्याने तुला मुल होण्यापासून रोखून धरले आहे, त्या देवाच्या ठिकाणी मी आहे की काय?”3ती म्हणाली, “पाहा, माझी दासी बिल्हा आहे. तुम्ही तिच्या जवळ जा म्हणजे मग ती माझ्या मांडीवर मुलाला जन्म देईल व तिजपासून मलाही मुले मिळतील.”4अशा रीतीने तिने त्यास आपली दासी बिल्हा पत्नी म्हणून दिली. आणि याकोबाने तिच्याबरोबर संबंध ठेवला.5तेव्हा बिल्हा गरोदर राहिली व याकोबाच्या मुलाला जन्म दिला.6मग राहेल म्हणाली, “देवाने माझे ऐकले आहे. त्याने माझा आवाज नक्कीच ऐकला आहे आणि मला मुलगा दिला आहे.” म्हणून तिने त्याचे नाव दान ठेवले.7राहेलची दासी बिल्हा पुन्हा गर्भवती झाली व तिने याकोबाच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला.8राहेल म्हणाली, “मी माझ्या बहिणीशी प्रबळ स्पर्धा करून लढा दिला व विजय मिळवला आहे.” तिने त्याचे नाव नफताली ठेवले.9जेव्हा लेआने पाहिले की, आता आपल्याला मुले होण्याचे थांबले आहे. तेव्हा तिने आपली दासी जिल्पा हिला घेतले आणि याकोबाला पत्नी म्हणून दिली.10नंतर लेआची दासी जिल्पाने याकोबाच्या मुलाला जन्म दिला.11लेआ म्हणाली, “मी सुदैवी आहे.” तेव्हा तिने त्याचे नाव गाद ठेवले.12नंतर लेआची दासी जिल्पाने याकोबाच्या दुसऱ्या मुलाला दिला.13लेआ म्हणाली, “मी आनंदी आहे! इतर स्त्रिया मला आनंदी म्हणतील” म्हणून तिने त्याचे नाव आशेर ठेवले.14गहू कापणीच्या हंगामाच्या दिवसात रऊबेन शेतात गेला आणि त्यास पुत्रदात्रीची फळे + पुत्रप्राप्तीसाठी किंवा प्रेमवाढीसाठी वापरले जाणारे औषध सापडली. त्याने ती आपली आई लेआ हिच्याकडे आणून दिली. नंतर राहेल लेआस म्हणाली, “तुझा मुलगा रऊबेन याने आणलेल्या पुत्रदात्रीच्या फळातून मला काही दे.”15लेआ तिला म्हणाली, “तू माझ्या नवऱ्याला माझ्यापासून घेतलेस हे काय कमी झाले? आता माझ्या मुलाची पुत्रदात्रीची फळेही तू घेतेस काय?” राहेल म्हणाली, “तुझ्या मुलाची पुत्रदात्रीची फळे मला देशील तर त्याच्या बदल्यात आज रात्री तो तुझ्याबरोबर झोपेल.”16संध्याकाळी याकोब शेतावरून आला. तेव्हा लेआ त्यास भेटण्यास बाहेर गेली व ती म्हणाली, “आज रात्री तुम्ही माझ्याबरोबर झोपणार आहात, कारण माझ्या मुलाची पुत्रदात्रीची फळे देऊन मी तुम्हास मोलाने घेतले आहे.” तेव्हा याकोब त्या रात्री लेआपाशी झोपला.17तेव्हा देवाने लेआचे ऐकले व ती गर्भवती राहिली आणि तिने याकोबाच्या पाचव्या मुलाला जन्म दिला.18लेआ म्हणाली, “देवाने माझे वेतन मला दिले आहे कारण मी माझी दासी माझ्या नवऱ्याला दिली.” तेव्हा तिने आपल्या मुलाचे नाव इस्साखार ठेवले.19लेआ पुन्हा गरोदर राहिली व तिने याकोबाच्या सहाव्या मुलाला जन्म दिला.20लेआ म्हणाली, “देवाने मला उत्तम देणगी दिली आहे. आता माझा पती माझा आदर करील कारण मी त्याच्या सहा मुलांना जन्म दिला आहे.” तिने त्याचे नाव जबुलून + अर्थ-बक्षिस ठेवले.21त्यानंतर तिला एक मुलगी झाली. तिने तिचे नाव दीना ठेवले.22मग देवाने राहेलीचा विचार केला आणि तिचे ऐकले. त्याने तिची कूस वाहती केली.23ती गर्भवती झाली व तिला मुलगा झाला. ती म्हणाली, “देवाने माझा अपमान दूर केला आहे.”24तिने त्याचे नाव योसेफ ठेवले. ती म्हणाली, “परमेश्वर देवाने आणखी एक मुलगा मला दिला आहे.”
1लाबानाचे पुत्र आपसात बोलत असताना याकोबाने ऐकले ते म्हणाले, “जे आपल्या बापाचे त्यातून सर्वकाही याकोबाने घेतले आहे आणि जे आमच्या वडिलाच्या त्या मालमत्तेतून तो संपन्न झाला आहे.”2याकोबाने लाबानाचा चेहरा पाहिला. त्याच्या वागण्यात बदल झाल्याचे त्याच्या लक्षात आले.3परमेश्वर याकोबाला म्हणाला, “तुझ्या वडिलाच्या देशात आपल्या नातलगांकडे तू परत जा, आणि मी तुझ्याबरोबर असेन.”4तेव्हा याकोबाने राहेल व लेआ यांना, तो आपले शेरडामेंढरांचे कळप राखीत होता, तेथे शेतात बोलावले,5आणि त्यांना म्हणाला, “तुमच्या वडिलाच्या वागण्यात मला बदल झालेला जाणवला आहे. परंतु माझ्या बापाचा देव माझ्याबरोबर आहे.6तुम्हास माहीत आहे की, मी आपल्या सर्व शक्तीने तुमच्या बापाची सेवा केली आहे.7तुमच्या वडिलाने मला फसवले आणि त्याने माझ्या वेतनात दहा वेळा बदल केलेला आहे. परंतु देवाने माझे नुकसान करण्याची परवानगी त्यास दिली नाही.8जेव्हा तो म्हणाला, सर्व ठिपकेदार शेळ्यामेंढ्या तुझे वेतन होतील, सर्व शेळ्यामेंढ्यांना ठिपकेदार करडे होऊ लागली. परंतु मग लाबान म्हणाला, तू बांड्या बकऱ्या घे; त्या तुला वेतनादाखल होतील. त्याने असे म्हटल्यानंतर सर्व बकऱ्यांना बांडी करडे होऊ लागली,9तेव्हा अशा रीतीने देवाने तुमच्या वडिलाच्या कळपातून गुरेढोरे काढून घेऊन ती मला दिलेली आहेत.10एकदा शेळ्यामेंढ्यांचा कळप निपजण्याच्या वेळेस मी आपली दृष्टी वर करून स्वप्नात पाहिले, तो पाहा, कळपातल्या माद्यांवर नर उडत होते ते फक्त ठिपकेदार व बांडे, करडे होते.”11देवाचा दूत मला स्वप्नात म्हणाला, “याकोबा,” मी म्हणालो, “काय आज्ञा आहे?”12तो म्हणाला, “आपले डोळे वर करून पाहा, ‘फक्त ठिपकेदार व बांडे, करडे असलेलेच नर माद्यांवर उडत आहेत. लाबान तुला काय करीत आहे ते सर्व मी पाहिले आहे.13बेथेलचा मी देव आहे. जेथे तू एका स्मारकस्तंभास अभिषेक केलास, जेथे नवस करून तू मला वचन दिले, आणि आता तू हा देश सोड आणि आपल्या जन्मभूमीस परत जा.’”14राहेल व लेआ यांनी त्यास उत्तर दिले आणि त्यास म्हणाल्या, “आमच्या वडिलाच्या घरी आम्हांला वारसा किंवा तेथे काही भाग नाही.15आम्ही परक्या असल्यासारखे त्याने आम्हांला वागवले नाही काय? त्याने आम्हास तुम्हास विकून टाकले, आणि आमचे पूर्ण पैसे खाऊन टाकले आहेत.16देवाने ही सर्व संपत्ती आमच्या पित्याकडून घेतली आणि आता ती आपली व आपल्या मुळाबाळांची संपत्ती झाली आहे. तेव्हा देवाने तुम्हास जे करावयास सांगितले आहे ते करा.”17तेव्हा याकोब उठला आणि त्याने आपल्या स्त्रिया व मुलांना उंटांवर बसवले.18तो आपली सर्व गुरेढोरे आणि आपण मिळवलेले सर्व धन, म्हणजे जे गुरांढोरांचे कळप त्याने पदन-अरामात मिळवले होते, ते घेऊन आपला बाप इसहाक याच्याकडे कनान देशास जाण्यास निघाला.19त्याच वेळी लाबान आपल्या मेंढरांची लोकर कातरण्यास गेला होता. तेव्हा राहेलने आपल्या वडिलाच्या कुलदेवतांच्या मूर्ती चोरल्या.20याकोबानेही अरामी लाबानाला फसवले. आपण येथून सोडून जात आहो हे त्यास सांगितले नाही.21याकोब आपली बायकामुले व सर्व चीजवस्तू घेऊन ताबडतोब पळाला. त्यांनी फरात नदी ओलांडली आणि ते गिलाद डोंगराळ प्रदेशाकडे निघाले.
1याकोबही आपल्या मार्गाने गेला आणि त्यास देवाचे दूत भेटले.2जेव्हा याकोबाने त्यांना पाहिले तेव्हा तो म्हणाला, “ही देवाची छावणी आहे.” म्हणून त्याने त्या जागेचे नाव महनाईम + देवाचा तळ ठेवले.3याकोबाने आपला भाऊ एसाव याच्याकडे सेईर देशात म्हणजे अदोम प्रांतात आपले निरोपे पाठवले.4त्याने त्यांना आज्ञा देऊन म्हटले, “तुम्ही माझे धनी एसाव यांना सांगा, आपला सेवक याकोब असे म्हणतो की, ‘आजपर्यंत अनेक वर्षे मी लाबानाकडे राहिलो.5माझ्यापाशी पुष्कळ गाई-गुरे, गाढवे, शेरडामेंढरांचे कळप आणि दास व दासी आहेत. आपली कृपादृष्टी माझ्यावर व्हावी म्हणून मी आपल्या धन्याला हा निरोप पाठवीत आहे.’”6निरोपे याकोबाकडे परत आले आणि म्हणाले, “आम्ही आपला भाऊ एसाव याच्याकडे गेलो व त्यास भेटलो. तो आपणाला भेटावयास येत आहे. त्याच्या बरोबर चारशे माणसे आहेत.”7तेव्हा याकोब घाबरला आणि अस्वस्थ झाला. त्याने आपल्या सोबत असणाऱ्या लोकांच्या दोन टोळ्या केल्या, तसेच शेरडेमेंढरे, गुरेढोरे आणि उंट व गाढवे यांच्याही त्याने दोन टोळ्या केल्या.8तो म्हणाला, “जर एसावाने एका टोळीवर हल्ला करून मार दिला तर दुसरी टोळी निसटून जाईल व वाचेल.”9याकोब म्हणाला, “माझा बाप अब्राहाम याच्या देवा, आणि माझा बाप इसहाक याच्या देवा, परमेश्वर देवा, तू मला माझ्या देशात व माझ्या कुटुंबात परत येण्यास सांगितलेस. तसेच तू माझी भरभराट केलीस,10तू माझ्यावर करुणा व सर्व सत्य विश्वसनीयता दाखवून, करार पाळून, आपल्या दासासाठी जे काही केले आहेस, त्यास मी पात्र नाही. आणि मी यार्देनेच्या पलीकडे गेलो तेव्हा माझ्याजवळ एका काठीशिवाय काहीही नव्हते. परंतु आता माझ्या दोन टोळ्या आहेत.11कृपा करून तू माझा भाऊ एसाव याच्यापासून मला वाचव. तो येऊन मला, व मायलेकरांना मारून टाकील, अशी मला भीती वाटते.12परंतु तू मला म्हणालास की, ‘मी नक्कीच तुझी भरभराट करीन. मी तुझी संतती वाढवीन आणि जिची गणना करता येणार नाही, अशी समुद्राच्या वाळूइतकी ती करीन.’”13त्या रात्री याकोब त्या ठिकाणी राहिला. त्याने आपल्याजवळ जे होते त्यातून, आपला भाऊ एसावाला देण्यासाठी भेट तयार केली.14त्याने दोनशे शेळ्या व वीस बोकड, दोनशे मेंढ्या व वीस एडके,15तसेच तीस दुभत्या सांडणी व त्यांची शिंगरे, चाळीस गाई व दहा बैल, वीस गाढवी व दहा गाढवे घेतली.16त्याने प्रत्येक कळप एकेका नोकराच्या ताब्यात दिला. मग तो नोकरांना म्हणाला, “प्रत्येक कळप वेगळा करा आणि कळपाकळपात थोडे अंतर ठेवून माझ्यापुढे चाला.”17याकोबाने कळपाच्या पहिल्या टोळीच्या चाकराला आज्ञा देऊन तो म्हणाला, “जेव्हा माझा भाऊ एसाव तुझ्याकडे येईल व विचारील, ‘ही कोणाची जनावरे आहेत? तू कोठे चाललास? तू कोणाचा नोकर आहेस?’18तेव्हा तू त्यास असे उत्तर दे, ‘ही जनावरे आपला सेवक याकोब याच्या मालकीची आहेत. त्याने ही माझा धनी एसाव याला भेट म्हणून पाठवली आहेत. आणि पाहा, तो आमच्या पाठोपाठ येत आहे.’”19याकोबाने दुसऱ्या, तिसऱ्या आणि इतर सर्व चाकरांना अशीच आज्ञा करून अशाच प्रकारे उत्तर देण्यास सांगितले. तो म्हणाला, “तुम्हास जेव्हा एसाव भेटेल तेव्हा तुम्ही असेच म्हणावे.”20तुम्ही असेही म्हणावे की, “आपला दास याकोब आमच्या मागून येत आहे.” त्याने विचार केला, “जर मी ही माणसे भेटीसह पुढे पाठवली तर कदाचित एसावाचा राग शांत होईल. त्यानंतर जेव्हा मी त्यास भेटेन, तेव्हा कदाचित तो माझा स्विकार करील.”21म्हणून त्याप्रमाणे याकोबाने भेट पुढे पाठवली. तो स्वतः त्या रात्री तळावर मागेच राहिला.
1याकोबाने वर पाहिले आणि पाहा, त्यास एसाव येताना दिसला आणि त्याच्या बरोबर चारशे माणसे होती. तेव्हा याकोबाने लेआ व राहेल व दोघी दासी यांच्याजवळ मुले वाटून दिली.2याकोबाने त्याच्या दासी व त्यांची मुले यांना आघाडीस त्यानंतर त्याच्यामागे लेआ व तिची मुले आणि राहेल व योसेफ यांना सर्वांत शेवटी ठेवले.3याकोब स्वतः पुढे गेला. आपल्या भावापर्यंत पोहचेपर्यंत त्याने सात वेळा भूमीपर्यंत लवून त्यास नमन केले.4एसावाने जेव्हा याकोबाला पाहिले तेव्हा त्यास भेटण्यास तो धावत गेला आणि त्यास आलिंगन दिले. त्याने गळ्यात गळा घालून याकोबाला मिठी मारली. त्याचे चुंबन घेतले, आणि ते दोघे रडले.5एसावाने आपल्या समोरील स्त्रिया व मुले पाहून विचारले, “तुझ्याबरोबर ही कोण मंडळी आहे?” याकोबाने उत्तर दिले, “तुझ्या सेवकाला ही मुले देऊन देवाने माझे कल्याण केले आहे.”6मग दोन दासी आपल्या मुलांबरोबर पुढे आल्या आणि त्यांनी एसावाला खाली वाकून नमन केले.7त्यानंतर लेआ व तिची मुले, मग राहेल व योसेफ एसावापुढे गेले आणि त्यांनी त्यास खाली वाकून नमन केले.8एसावाने विचारले, “इकडे येताना मला भेटलेल्या सर्व टोळ्यांचा अर्थ काय आहे?” याकोबाने उत्तर दिले, “माझ्या धन्याच्या दृष्टीने मला कृपा मिळावी म्हणून.”9एसाव म्हणाला, “माझ्या बंधू मला भरपूर आहे, तुझे तुला असू दे.”10याकोब म्हणाला, “मी आपणाला विनंती करतो, असे नको, आता जर मी तुमच्या दृष्टीने खरोखर कृपा पावलो तर माझ्या हातून या भेटीचा स्विकार करा, कारण मी आपले तोंड पाहिले, आणि जणू काय देवाचे मुख पाहावे तसे मी तुमचे मुख पाहिले आहे आणि आपण माझा स्विकार केला.11मी विनंती करतो की, मी आणलेल्या भेटीचा स्विकार करा. कारण देवाने माझे कल्याण केले आहे, आणि माझ्यापाशी भरपूर आहे.” याप्रमाणे याकोबाने एसावास आग्रहाची विनवणी केली आणि मग एसावाने त्यांचा स्विकार केला.12मग एसाव म्हणाला, “आता आपण आपल्या वाटेस लागू. मीही तुझ्या पुढे चालतो.”13परंतु याकोब त्यास म्हणाला, “माझी मुले लहान आहेत हे माझ्या स्वामीला माहीत आहे, आणि माझी मेंढरे व गुरेढोरे यांच्या पिल्लांची मला काळजी घेतली पाहिजे. मी जर त्यांची एका दिवशी अधिक दौड केली, तर सगळी जनावरे मरून जातील.14तर माझे धनी आपण आपल्या सेवकापुढे जा. मी माझी गुरेढोरे, शेरडेमेंढरे इत्यादी जनावरांना जितके चालवेल आणि माझी लहान मुलेही थकणार नाहीत अशा चालीने सावकाश चालेन व आपणास सेईर प्रदेशामध्ये येऊन भेटेन.”15तेव्हा एसाव म्हणाला, “मग मी माझ्या मनुष्यातून काही माणसे तुला मदत करण्यासाठी मागे ठेवतो.” परंतु याकोब म्हणाला, “तसे कशाला? माझ्या धन्याची आधीच माझ्यावर पुरेशी कृपा झालेली आहे.”16तेव्हा त्याच दिवशी एसाव सेईरास परत जाण्यास निघाला.17याकोब प्रवास करीत सुक्कोथास गेला. तेथे त्याने स्वतःसाठी घर बांधले आणि गुराढोरांसाठी गोठे बांधले, म्हणून त्या ठिकाणाचे नाव सुक्कोथ पडले.18याकोबाने पदन-अरामपासून सुरू केलेला प्रवास कनान देशातील शखेम शहरात सुखरूपपणे संपवला. त्या नगराजवळ त्याने आपला तळ दिला.19नंतर त्याने जेथे आपला तंबू ठोकला होता ती जमीन शखेमाचा बाप हमोर याच्या लोकांकडून शंभर चांदीची नाणी देऊन विकत घेतली.20त्याने तेथे एक वेदी बांधली आणि तिचे नाव “एल-एलोहे-इस्राएल” + अर्थ-देव, इस्राएलाचा देव, इस्राएलाचा शक्तिशाली देव असे ठेवले.
1याकोबापासून लेआस झालेली मुलगी दीना ही त्या देशातील मुलींना भेटण्यास बाहेर गेली.2तेव्हा त्या देशाचा राजा हमोर हिव्वी याचा मुलगा शखेम याने तिला पाहिले तो तिला घेऊन गेला, आणि तिच्यापाशी निजून त्याने तिला भ्रष्ट केले.3याकोबाची मुलगी दीना हिच्याकडे तो आकर्षित झाला. त्या मुलीवर त्याचे प्रेम जडले आणि तो प्रेमळपणे तिच्याशी बोलला.4शखेमाने आपला बाप हमोर ह्याला म्हटले, “ही मुलगी मला पत्नी करून द्या.”5आपली मुलगी दीना हिला त्याने भ्रष्ट केले हे याकोबाने ऐकले. परंतु त्याची सर्व मुले गुराढोरांबरोबर रानात होती म्हणून ते घरी येईपर्यंत याकोब शांतच राहिला.6शखेमाचा बाप हमोर बोलणी करण्यासाठी याकोबाकडे गेला.7जे काही घडले ते याकोबाच्या मुलांनी रानात ऐकले आणि ते परत आले. ती माणसे दुखावली गेली होती. त्यांचा राग भडकला होता, कारण याकोबाच्या मुलीवर शखेमाने बळजबरी करून इस्राएलाला काळिमा लावला, जे करू नये ते त्याने केले होते.8हमोर त्यांच्याशी बोलला. तो म्हणाला, “माझा मुलगा शखेम तुमच्या मुलीवर प्रेम करतो. मी तुम्हास विनंती करतो की ती त्यास पत्नी म्हणून द्या.9आमच्या बरोबर सोयरीक करा, तुमच्या मुली आम्हांला द्या, आणि आमच्या मुली तुमच्यासाठी घ्या.10तुम्ही आमच्या बरोबर राहा, आणि हा देश राहण्यास व व्यापार करण्यास तुमच्यापुढे मोकळा असेल, आणि त्यामध्ये मालमत्ता घ्या.”11शखेम तिच्या बापाला व तिच्या भावांना म्हणाला, “माझ्यावर तुमची कृपादृष्टी व्हावी म्हणून तुम्ही जे काही मागाल ते मी जरुर देईन.12माझ्याकडे वधूबद्दल मोठी किंमत मागा, जे काही तुम्ही मागाल ते मी तुम्हास देईन, परंतु ही मुलगी मला पत्नी म्हणून द्या.”13त्यांची बहीण दीना हिला शखेमाने भ्रष्ट केले होते, म्हणून याकोबाच्या मुलांनी शखेम व त्याचा बाप हमोर यांना कपटाने उत्तर दिले.14ते त्यास म्हणाले, “ज्याची अद्याप सुंता झालेली नाही अशा मनुष्यास आम्ही आमची बहीण देऊ शकत नाही; त्यामुळे आम्हांला कलंक लागेल.15पण फक्त या एकाच अटीवर आम्ही तुझ्याशी सहमत होऊ: तुम्हा सर्वांची आमच्याप्रमाणे सुंता झाली पाहिजे, जर तुमच्यातील प्रत्येक पुरुषाची सुंता झाली तरच16आम्ही आमच्या मुली तुम्हास देऊ व तुमच्या मुली आम्ही करू आणि आम्ही तुम्हामध्ये राहू आणि आपण सर्व एक लोक होऊ.17पण जर तुम्ही आमचे ऐकणार नाही आणि सुंता करावयास नकार द्याल तर मग मात्र आमच्या बहिणीला घेऊ आणि निघून जाऊ.”18त्यांच्या शब्दाने हमोर व शखेम यांना फार आनंद झाला.19त्यांनी जे सांगितले होते ते करण्यास त्या तरुणाने उशीर केला नाही, कारण याकोबाच्या मुलीवर त्याचे मन बसले होते, आणि तो त्यांच्या वडिलाच्या घराण्यात सर्वांत आदरणीय होता.20हमोर व शखेम त्या नगराच्या वेशीपाशी गेले व नगरातील लोकांशी बोलले, ते म्हणाले,21“ही माणसे आपल्याशी शांतीने वागतात, म्हणून त्यांना आपणामध्ये आपल्या देशात राहू द्यावे आणि त्यामध्ये व्यापार करू द्यावा. खरोखरच, त्यांना पुरेल एवढा आपला देश मोठा आहे. त्यांच्या मुली आपण स्त्रिया करून घेऊ, आणि आपण आपल्या मुली त्यांना देऊ.22फक्त एकाच अटीवर ते लोक आपल्यासोबत राहायला आणि आपल्यासोबत एक व्हायला तयार आहेत: ती म्हणजे आपण सगळ्या पुरुषांनी त्या लोकांप्रमाणे सुंता करून घेण्याचे मान्य केले पाहिजे.23जर हे आपण करू तर मग त्यांची सर्व शेरडेमेंढरे गुरेढोरे व संपत्ती आपलीच होणार नाहीत काय? म्हणून आपण त्यांच्याशी सहमत होऊ, आणि मग ते आपल्या बरोबर येथेच वस्ती करून राहतील.”24तेव्हा वेशीतून येणाऱ्या सर्वांनी हे ऐकले व हमोर आणि शखेम यांचे म्हणणे मान्य केले. त्या वेळी तेथील सर्व पुरुषांनी सुंता करून घेतली.25तीन दिवसानंतर, सुंता केलेले लोक जखमांच्या वेदनांनी बेजार झालेले असताना, याकोबाची दोन मुले शिमोन व लेवी म्हणजे दीनाचे भाऊ यांनी आपआपली तलवार घेतली व ते नगर बेसावध असता त्यांनी तेथील सर्व पुरुषांना ठार मारले.26त्यांनी हमोर व त्याचा मुलगा शखेम यांनाही ठार मारले. नंतर दीनाला शखेमाच्या घरातून बाहेर काढून ते तिला घेऊन तेथून निघाले.27नंतर याकोबाची सर्व मुले नगरात गेली आणि त्यांनी तेथील सर्व चीजवस्तू लुटल्या, कारण त्यांनी त्यांच्या बहिणीला भ्रष्ट केले होते.28तेव्हा त्यांनी त्या लोकांची शेरडेमेंढरे, गुरेढोरे, गाढवे इत्यादी सर्व जनावरे आणि घरातील व शेतांतील सर्व वस्तू लुटल्या.29तसेच त्यांनी तेथील लोकांच्या मालकीची धनदौलत, मालमत्ता व सर्व चीजवस्तू आणि त्यांच्या स्त्रिया व मुलेबाळे देखील घेतली.30परंतु याकोब, शिमोन व लेवी यांना म्हणाला, “तुम्ही मला खूप त्रास देऊन संकटात टाकले आहे; आता या देशाचे रहिवासी कनानी व परिज्जी माझा द्वेष करतील व माझ्या विरूद्ध उठतील. आपण थोडकेच लोक आहोत. या देशातील सर्व लोक एकत्र होऊन आपल्या विरूद्ध जर लढावयास आले तर मग माझ्याजवळच्या आपल्या सर्वांचा माझ्याबरोबर नाश केला जाईल.”31परंतु शिमोन आणि लेवी म्हणाले, “शखेमाने आमच्या बहिणीशी वेश्येशी वागतात तसे वागावे काय?”
1देव याकोबाला म्हणाला, “ऊठ, बेथेल नगरामध्ये जा आणि तेथे राहा. तुझा भाऊ एसाव याजपासून तू पळून जात असताना ज्याने तुला दर्शन दिले, त्या देवासाठी तेथे एक वेदी बांध.”2तेव्हा याकोब आपल्या घरातील सर्व मंडळीला व आपल्याबरोबरच्या सगळ्यांना म्हणाला, “तुमच्याजवळ असलेल्या परक्या देवांचा त्याग करा. तुम्ही स्वतःला शुद्ध करा. आपले कपडे बदला.3नंतर आपण येथून निघून बेथेलास जाऊ. मी दुःखात असताना ज्याने मला उत्तर दिले आणि जेथे कोठे मी गेलो तेथे जो माझ्याबरोबर होता, त्या देवासाठी मी वेदी बांधीन.”4तेव्हा त्या लोकांनी त्यांच्या हातातले सर्व परके देव आणि आपल्या कानातील कुंडलेही आणून याकोबाला दिली. तेव्हा याकोबाने त्या सर्व वस्तू शखेम नगराजवळील एला झाडाच्या खाली पुरून टाकल्या.5ते तेथून निघाले, त्यांच्या सभोवतालच्या नगरावर देवाने भीती उत्पन्न केली, म्हणून त्यांनी याकोबाच्या मुलांचा पाठलाग केला नाही.6अशा रीतीने याकोब व त्याच्याबरोबरचे सर्व लोक कनान देशात लूज येथे येऊन पोहचले त्यालाच आता बेथेल म्हणतात.7त्याने तेथे एक वेदी बांधली, व त्या ठिकाणाचे नाव “एल-बेथेल+ अर्थ-बेथेलचा देव ” असे ठेवले. कारण आपला भाऊ एसाव याजपासून पळून जाताना याच जागी प्रथम देवाने त्यास दर्शन दिले होते.8रिबकेची दाई दबोरा या ठिकाणी मरण पावली तेव्हा त्यांनी तिला बेथेल येथे अल्लोन झाडाच्या खाली पुरले; त्या जागेचे नाव त्यांनी अल्लोन बाकूथ म्हणजे रडण्याचे अल्लोन असे ठेवले.9याकोब पदन-अराम येथून परत आला, तेव्हा देवाने त्यास पुन्हा दर्शन दिले आणि त्यास आशीर्वाद दिला.10देव त्यास म्हणाला, “तुझे नाव याकोब आहे, परंतु तुला आता याकोब म्हणणार नाहीत तर तुझे नवे नाव इस्राएल असे होईल.” म्हणून देवाने त्यास इस्राएल हे नाव दिले.11देव त्यास म्हणाला, “मी सर्व सर्वसमर्थ देव आहे. तू फलद्रूप आणि बहुगुणित हो. तुझ्यातून एक राष्ट्र आणि राष्ट्रांचा समुदाय येईल व तुझ्या वंशजातून राजे जन्मास येतील.12मी अब्राहाम व इसहाक यांना जो देश दिला, तो आता मी तुला व तुझ्यामागे राहणाऱ्या तुझ्या संततीला देतो.”13मग देव ज्या ठिकाणी त्याच्याशी बोलला तेथूनच वर निघून गेला.14मग याकोबाने तेथे स्मारक म्हणून दगडाचा एक स्तंभ उभा केला त्याने त्यावर पेयार्पण व तेल ओतले.15जेथे देवाने याकोबाशी भाषण केले होते त्या स्थानाचे नाव याकोबाने बेथेल ठेवले.
1एसाव म्हणजे अदोम याची वंशावळ ही,2एसावाने कनानी मुलींतून स्त्रिया करून घेतल्या, एलोन हित्ती याची मुलगी आदा, सिबोन हिव्वी ह्याची नात म्हणजे अनाची मुलगी अहलीबामा3आणि इश्माएलाची मुलगी नबायोथाची बहीण बासमथ.4एसावापासून आदेला झालेल्या मुलाचे नाव अलीपाज व बासमथला झालेल्या मुलाचे नाव रगुवेल होते.5आणि अहलीबामेस, यऊश, यालाम व कोरह हे झाले. हे एसावाचे पुत्र त्यास कनान देशात झाले.6एसाव आपल्या स्त्रिया, आपली मुले, आपल्या मुली आणि आपल्या घरातील सर्व माणसे, आपली गुरेढोरे, आपली सर्व जनावरे, आणि आपली सर्व मालमत्ता जी त्याने कनान देशात जमा केली होती हे सर्व घेऊन आपला भाऊ याकोब ह्याच्या पूर्वेकडील देशात गेला.7कारण त्यांची मालमत्ता इतकी वाढली होती की त्यांना एकत्र राहता येईना. ज्या देशात ते राहत होते त्यामध्ये त्यांच्या गुरांढोरांचा निर्वाह होईना.8एसाव सेईरच्या डोंगराळ प्रदेशात वस्ती करून राहिला. एसावाला अदोमसुद्धा म्हणतात.9सेईरच्या डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या अदोमी लोकांचा पूर्वज एसाव याची ही वंशावळ:10एसावाच्या मुलांची नावे: एसाव व आदा यांचा मुलगा अलीपाज आणि एसाव व बासमथ यांचा मुलगा रगुवेल.11अलीपाजचे पुत्र तेमान, ओमार, सपो, गाताम व कनाज.12अलीपाज याची तिम्ना नावाची एक उपपत्नी होती, तिला अलीपाजापासून अमालेक झाला. ही एसावाची पत्नी आदा हिची नातवंडे होती.13रगुवेलाचे हे पुत्र होते: नहाथ, जेरह, शाम्मा व मिज्जा. ही एसावाची पत्नी बासमथ हिची नातवंडे होती.14सिबोनाची मुलगी अना याची मुलगी व सिबोनाची नात अहलीबामा ही एसावाची पत्नी होती. यऊश, यालाम व कोरह हे तिला एसावापासून झाले.15एसावाचे वंशज आपापल्या कुळांचे सरदार झाले ते हे: एसावाचा पहिला मुलगा अलीपाज, त्याचे पुत्र: तेमान, ओमार, सपो, कनाज,16कोरह, गाताम व अमालेक. आपापल्या कुळांचे हे सरदार अलीपाजला अदोम देशात झाले. ही आदेची नातवंडे होती.17एसावाचा मुलगा रगुवेल याचे पुत्र हे: सरदार नहाथ, सरदार जेरह, सरदार शम्मा, सरदार मिज्जा. हे सर्व सरदार रगुवेलास अदोम देशात झाले. एसावाची पत्नी बासमथ हिची ही नातवंडे होती.18एसावाची पत्नी अहलीबामा हिचे पुत्र: यऊश, यालाम व कोरह. हे सरदार एसावाची पत्नी, अनाची मुलगी अहलीबामा हिला झाले.19हे एसावाचे पुत्र होते, आणि हे त्यांचे वंश होते.
1याकोब कनान देशात जेथे त्याचा बाप वस्ती करून राहिला होता त्या देशात राहिला.2याकोबासंबंधीच्या घटना या आहेत. योसेफ सतरा वर्षांचा तरुण होता. आपल्या भावांबरोबर तो कळप सांभाळीत असे. तो आपल्या वडिलाच्या स्त्रिया बिल्हा व जिल्पा यांच्या मुलांबरोबर होता. त्या भावांनी केलेल्या वाईट गोष्टीविषयी त्याने आपल्या बापाला सांगितले.3इस्राएल सर्व मुलांपेक्षा योसेफावर अधिक प्रीती करीत असे कारण तो त्याचा म्हातारपणाचा मुलगा होता. त्याने योसेफाला एक सुंदर पायघोळ झगा बनवून दिला होता.4आपला बाप आपल्या इतर भावांपेक्षा योसेफावर अधिक प्रीती करतो हे त्याच्या भावांना दिसले म्हणून ते त्याचा द्वेष करीत आणि त्याच्याशी प्रेमाने बोलत नसत.5योसेफास एक स्वप्न पडले. त्याने ते स्वप्न आपल्या भावांना सांगितले. त्यानंतर तर त्याचे भाऊ त्याचा अधिकच द्वेष करू लागले.6तो त्यांना म्हणाला, “मला पडलेले स्वप्न कृपा करून ऐका:7पाहा, आपण सर्वजण शेतात गव्हाच्या पेंढ्या बांधण्याचे काम करीत होतो, तेव्हा माझी पेंढी उठून उभी राहिली आणि तुम्हा सर्वांच्या पेंढ्या तिच्या भोवती गोलाकार उभ्या राहिल्या व त्यांनी माझ्या पेंढीला खाली वाकून नमन केले.”8हे ऐकून त्याचे भाऊ त्यास म्हणाले, “तू आमचा राजा होऊन आमच्यावर राज्य करणार काय? आणि खरोखर तू आम्हावर अधिकार करशील काय?” त्याच्या या स्वप्नामुळे व त्याच्या बोलण्यामुळे तर त्याचे भाऊ त्याचा अधिकच द्वेष करू लागले.9नंतर योसेफाला आणखी एक स्वप्न पडले. तेही त्याने आपल्या भावांना सांगितले. तो म्हणाला, “पाहा, मला आणखी एक स्वप्न पडले: सूर्य, चंद्र व अकरा तारे यांनी मला खाली वाकून नमन केले.”10त्याने आपल्या पित्यासही या स्वप्नाविषयी सांगितले. परंतु त्याच्या वडिलाने त्यास दोष देऊन म्हटले, “असले कसले हे स्वप्न आहे? तुझी आई, तुझे भाऊ व मी आम्ही भूमीपर्यंत लवून तुला नमन करू काय?”11योसेफाचे भाऊ त्याचा हेवा करीत राहिले. परंतु त्याच्या वडिलाने ही गोष्ट आपल्या मनात ठेवली.
1त्याच सुमारास यहूदा आपल्या भावांना सोडून अदुल्लाम नगरातील हिरा नावाच्या मनुष्याबरोबर त्याच्या घरी रहावयास गेला.2तेथे यहूदाला शूवा नावाच्या एका कनानी मनुष्याची मुलगी भेटली. तेव्हा त्याने तिच्यावर प्रेम केले आणि तिच्याशी लग्न केले.3ती गरोदर राहिली व तिला मुलगा झाला. त्याने त्याचे नाव एर ठेवले.4त्यानंतर ती पुन्हा गरोदर राहिली व तिला मुलगा झाला. तिने त्याचे नाव ओनान ठेवले.5त्यानंतर तिला आणखी एक मुलगा झाला आणि त्याचे नाव शेला ठेवले. त्यास जन्म दिला होता तेव्हा ती कजीब नगरामध्ये राहत होती.6यहूदाने आपला पहिला मुलगा एर याच्यासाठी पत्नी शोधली. तिचे नाव तामार होते.7परंतु यहूदाचा प्रथम जन्मलेला मुलगा एर हा परमेश्वराच्या दृष्टीने दुष्ट होता. परमेश्वराने त्यास ठार मारले.8मग यहूदा ओनान याला म्हणाला, “तू तुझ्या भावाच्या पत्नीवर प्रेम कर. तिच्याबरोबर दिराचे कर्तव्य पार पाड, आणि तुझ्या भावाकरता तिला संतान होऊ दे.”9ती मुले आपली होणार नाहीत, हे ओनानला माहीत होते. म्हणून जेव्हा तो त्याच्या भावाच्या पत्नीशी प्रेम करत असे, तेव्हा तो आपले वीर्य बाहेर जमिनीवर पाडत असे, यासाठी की त्यास त्याच्या भावासाठी मूल होऊ नये.10त्याने जे केले ते परमेश्वराच्या दृष्टीने वाईट होते, म्हणून परमेश्वराने त्यास मारून टाकले.11मग यहूदा आपली सून तामार हिला म्हणाला, “माझा मुलगा शेला लग्नाच्या वयाचा होईपर्यंत तू तुझ्या वडिलाच्या घरी जाऊन तेथे विधवा म्हणून राहा.” कारण त्याने विचार केला, “नाही तर, तोसुद्धा आपल्या दोन भावांप्रमाणे मरून जाईल.” मग तामार आपल्या वडिलाच्या घरी जाऊन राहिली.12बऱ्याच काळानंतर यहूदाची पत्नी, म्हणजे शूवाची मुलगी मरण पावली. तिच्यासाठी शोक करण्याचे दिवस संपल्यानंतर यहूदा अदुल्लाम येथील आपला मित्र हिरा याच्याबरोबर आपली मेंढरे कातरायला वर तिम्ना येथे गेला.13तेव्हा तामारेला कोणी सांगितले की, “पाहा, तुझा सासरा आपल्या मेंढरांची लोकर कातरवून घेण्याकरता तिम्ना येथे जात आहे.”14तिने आपली विधवेची वस्त्रे काढली आणि बुरखा घेऊन शरीर लपेटून घेतले. नंतर तिम्नाच्या रस्त्यावर एनाईम नगराच्या वेशीत ती बसून राहिली. कारण तिने पाहिले की, शेला आता प्रौढ झाला असूनही आपल्याला अजून त्याची पत्नी करून दिले नाही.15यहूदाने तिला पाहिले, परंतु ती एक वेश्या असावी असे त्यास वाटले. तिने आपले तोंड झाकले होते.16तेव्हा यहूदा तिच्याजवळ जाऊन म्हणाला, “मला तुझ्यापाशी निजू दे.” ती आपली सून आहे हे यहूदाला माहीत नव्हते. ती म्हणाली, “तुम्ही मला त्याबद्दल काय मोबदला द्याल?”17यहूदा म्हणाला, “मी तुला माझ्या कळपातून एक करडू पाठवून देईन.” ती म्हणाली, “परंतु ते पाठवून देईपर्यंत तुम्ही माझ्याजवळ काय गहाण ठेवाल?”18यहूदा म्हणाला, “गहाण म्हणून मी तुझ्याकडे काय ठेवू?” तामार म्हणाली, “तुम्ही अंगठी, गोफ व हातातली काठी मला द्या.” तेव्हा यहूदाने त्या वस्तू तिला दिल्या. मग तो तिजपाशी जाऊन निजला. त्याच्यापासून ती गरोदर राहिली.19ती उठली आणि निघून गेली. तिने आपला बुरखा काढून टाकला आणि आपली विधवेची वस्त्रे घातली.20यहूदाने आपला मित्र अदुल्लामकर ह्याला आपल्या कळपातील करडू घेऊन त्या स्त्रीला तारण म्हणून दिलेल्या वस्तू आणावयास पाठवले, परंतु त्यास ती सापडली नाही.21मग अदुल्लामकराने तेथील काही लोकांस विचारले, “येथे या एनाईमाच्या रस्त्यावर एक वेश्या होती ती कोठे आहे?” तेव्हा लोकांनी उत्तर दिले, “येथे कधीच कोणीही वेश्या नव्हती.”22तेव्हा यहूदाचा मित्र त्याच्याकडे परत गेला व म्हणाला, “ती वेश्या मला काही सापडली नाही, तेथे राहणारे लोक म्हणाले की, ‘तेथे कोणीही वेश्या कधीच नव्हती.’”23यहूदा म्हणाला, “जाऊ दे, त्या वस्तू तिला ठेवून घेऊ दे, नाहीतर आपलीच नालस्ती होईल. मी कबूल केल्याप्रमाणे तिला करडू देण्याचा प्रयत्न केला, परंतु ती आपल्याला सापडली नाही.”24या नंतर तीन महिन्यांनी कोणीतरी यहूदाला सांगितले, “तुझी सुन तामार हिने वेश्येप्रमाणे पापकर्म केले आणि त्या व्यभिचारामुळे ती आता गरोदर राहिली आहे.” यहूदा म्हणाला, “तिला बाहेर काढा व जाळून टाका.”25जेव्हा तिला बाहेर आणले तिने आपल्या सासऱ्यासाठी एक निरोप पाठवला, “ज्या मनुष्याच्या मालकीच्या या वस्तू आहेत त्याच्यापासून मी गरोदर आहे.” पुढे ती म्हणाली, “ही अंगठी, गोफ आणि काठी कोणाची आहेत ते ओळख.”26यहूदाने त्या वस्तू ओळखल्या आणि तो म्हणाला, “माझ्यापेक्षा ती अधिक नीतिमान आहे. कारण मी तिला वचन दिल्यानुसार माझा मुलगा शेला याला ती पत्नी म्हणून दिली नाही.” त्यानंतर त्याने तिच्याशी पुन्हा शरीरसंबंध केला नाही.27तिच्या प्रसुतीच्या वेळी असे झाले की, पाहा, तिच्या पोटात जुळी मुले होती.28प्रसुतीच्या वेळी एका बाळाचा हात बाहेर आला. तेव्हा दाईने त्याच्या हाताला लाल धागा बांधला व ती म्हणाली, “हा आधी जन्मला.”29परंतु त्या बाळाने आपला हात आखडून घेतला. त्यानंतर मग दुसरे बाळ प्रथम जन्मले. म्हणून मग ती सुईण म्हणाली, “तू आपल्यासाठी कशी वाट फोडलीस!” आणि त्याचे नाव पेरेस + अर्थ-मोडणारा असे ठेवले.30त्यानंतर त्याचा भाऊ, ज्याच्या हाताला लाल धागा बांधलेला होता, तो बाहेर आला आणि त्याचे नाव जेरह + सूर्योदयाचा लालसरपणा असे ठेवले.
1योसेफाला खाली मिसरात आणले. फारो राजाचा एक मिसरी अधिकारी, संरक्षक दलाचा सरदार पोटीफर, याने त्यास इश्माएली लोकांकडून विकत घेतले.2परमेश्वर देव योसेफाबरोबर होता. तो यशस्वी पुरुष होता. तो आपल्या मिसरी धन्याच्या घरी राहत असे.3परमेश्वर देव त्याच्याबरोबर आहे आणि म्हणून जे काही तो करतो त्या प्रत्येक कामात परमेश्वर देव त्यास यश देतो, हे त्याच्या धन्याला दिसून आले.4योसेफावर त्याची कृपादृष्टी झाली. त्याने पोटीफराची सेवा केली. पोटीफराने योसेफाला आपल्या घराचा कारभारी केले आणि त्याचे जे काही स्वतःचे होते ते सर्व त्याच्या ताब्यात दिले.5तेव्हा त्याने आपल्या घरात आणि आपले जे काही होते त्या सर्वावर योसेफाला कारभारी केले तेव्हापासून परमेश्वराने योसेफामुळे त्या मिसऱ्याच्या घरास आशीर्वाद दिला. घरात व शेतीत जे काही पोटीफराच्या मालकीचे होते त्या सर्वावर परमेश्वराचा आशीर्वाद होता.6पोटीफराने आपल्या घरादाराचा सर्व कारभार योसेफाच्या हवाली केला. तो जे अन्न खात असे, त्या पलीकडे कशाचाही तो विचार करत नव्हता. योसेफ फार देखणा व आकर्षक होता.7काही काळानंतर त्याच्या धन्याच्या पत्नीला योसेफाविषयी वासना निर्माण झाली. ती म्हणाली, “माझ्याबरोबर प्रेम कर.”8परंतु त्याने नकार दिला. तो त्याच्या धन्याच्या पत्नीला म्हणाला, “पाहा, घरात मी काय करतो याकडे माझा धनी लक्ष देत नाही आणि जे काही त्याचे आहे ते सर्व त्याने माझ्या ताब्यात सोपवले आहे.9या घरात माझ्यापेक्षा कोणीही मोठा नाही. तू त्याची पत्नी आहेस म्हणून तुझ्यावाचून त्याने माझ्यापासून काहीही राखून ठेवले नाही. असे असताना, देवाच्याविरूद्ध हे घोर पाप व मोठी दुष्टाई मी कशी करू?”10ती दररोज योसेफाबरोबर तेच बोलत असे, परंतु त्याने तिच्याबरोबर निजण्यास व प्रेम करण्यास नकार दिला.11एके दिवशी योसेफ आपले काही काम करण्याकरता आतल्या घरात गेला. तो तेथे अगदी एकटाच होता व घरात दुसरे कोणीही नव्हते.12तिने त्याचे वस्त्र धरून त्यास म्हटले “तू माझ्यापाशी नीज.” परंतु तो ते वस्त्र तिच्या हातात सोडून आतल्या घरातून बाहेर पळून गेला.13तेव्हा तो त्याचे वस्त्र आपल्या हाती सोडून आणि बाहेर पळून गेला हे तिने पाहिले.14आणि तिने हाक मारून तिच्या घरातील मनुष्यांना बोलावले. आणि ती म्हणाली, “पाहा, पोटीफराने या इब्र्याला आमच्या घरच्या मनुष्यांची अब्रू घेण्यासाठी आणून ठेवले आहे. त्याने आत येऊन माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु मी मोठ्याने ओरडले.15मी मोठ्याने ओरडले त्यामुळे त्याचे वस्त्र माइयापाशी टाकून तो पळाला आणि बाहेर गेला.”16तेव्हा त्याचा धनी घरी येईपर्यंत तिने त्याचे वस्त्र आपल्याजवळ ठेवले.17नंतर तिने त्यास सांगितले. ती म्हणाली, “तुम्ही हा जो इब्री घरी आणून ठेवला आहे त्याने माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला.18परंतु तो माझ्याजवळ आल्यावर मी मोठ्याने ओरडले म्हणून तो आपले वस्त्र माझ्याजवळ टाकून बाहेर पळून गेला.”19आणि असे झाले की, त्याच्या धन्याने पत्नीचे बोलणे ऐकले, ती त्यास म्हणाली की, “तुझ्या सेवकाने माझ्याशी असे वर्तन केले,” तो खूप संतापला.20योसेफाच्या धन्याने त्यास धरले आणि जेथे राजाच्या कैद्यांना कोंडत असत त्या तुरुंगात टाकले. योसेफ त्या तुरुंगात राहिला.21परंतु परमेश्वर देव योसेफाबरोबर होता, आणि त्याने त्यास कराराची सत्यता दाखवली. त्याने तुरुंगाच्या अधिकाऱ्याची त्याच्यावर कृपादृष्टी होईल असे केले.22त्या अधिकाऱ्याने तुरुंगातील सर्व कैद्यांना योसेफाच्या स्वाधीन केले. ते तेथे जे काही करीत होते, त्याचा योसेफ प्रमुख होता.23तुरुंगाचा अधिकारी त्याच्या हाताखालील कोणत्याही कामाबद्दल काळजी करीत नसे. कारण परमेश्वर त्याच्याबरोबर होता. तो जे काही करी, त्यामध्ये परमेश्वर देव त्यास यश देई.
1या गोष्टीनंतर असे झाले की, फारो राजाचा प्यालेबरदार म्हणजे राजाला द्राक्षारस देणारा आणि आचारी यांनी आपल्या धन्याचा, मिसराच्या राजाचा अपराध केला.2फारो राजा त्याच्या या दोन अधिकाऱ्यांवर म्हणजे त्याचा मुख्य प्यालेबरदार व त्याचा मुख्य आचारी यांच्यावर संतापला.3आणि त्याने त्यांना पहारेकऱ्यांचा सरदाराच्या वाड्यात, योसेफ कैदेत होता त्या ठिकाणी, तुरुंगात टाकले.4तेव्हा पहारेकऱ्यांच्या सरदाराने त्या दोघाही अपराध्यांना योसेफाच्या ताब्यात देऊन त्यांच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले. ते दोघे काही काळपर्यंत कैदेत राहिले.5मिसरी राजाला प्याला देणारा व त्याचा आचारी हे तुरुंगात असताना, त्या दोघांनाही एकाच रात्री त्यांना लागू पडतील अशी स्वप्ने पडली.6दुसऱ्या दिवशी सकाळी योसेफ त्यांच्याकडे गेला. तेव्हा पाहा, ते त्यास दुःखी असलेले दिसले.7तेव्हा, त्याच्या धन्याच्या वाड्यात जे फारोचे सेवक त्याच्या बरोबर कैदेत होते, त्यांना त्याने विचारले, “आज तुम्ही असे दुःखी का दिसता?”8ते त्यास म्हणाले, “आम्हा दोघांनाही रात्री स्वप्ने पडली, परंतु त्यांचा अर्थ सांगणारा कोणी नाही.” योसेफ त्यांना म्हणाला, “स्वप्नांचा अर्थ सांगणे देवाकडे नाही काय? कृपया, आपापले स्वप्न मला सांगा.”9तेव्हा राजाला प्याला देणाऱ्या प्यालेबरदाराने योसेफाला आपले स्वप्न सांगितले. तो म्हणाला, “मी माझ्या स्वप्नात पाहिले की, माझ्यासमोर एक द्राक्षवेल आहे.10द्राक्षवेलाला तीन फाटे होते. त्या फाट्यांना पाने फुटली व त्यास फुलवरा आला व नंतर त्याच्या घडास पिकलेली द्राक्षे आली.11फारो राजाचा प्याला माझ्या हातात होता. तेव्हा मी ती द्राक्षे घेतली आणि फारोच्या त्या प्याल्यात पिळली आणि द्राक्षारसाचा तो प्याला मी फारोच्या हातात दिला.”12योसेफ त्यास म्हणाला, “तुझ्या स्वप्नाचा अर्थ मी तुला उलगडून सांगतो. ते तीन फाटे म्हणजे तीन दिवस आहेत.13तीन दिवसानी फारो राजा तुझे मस्तक उंचावील व तुला पुन्हा तुझ्या पूर्वीच्या कामावर परत घेईल. तू आतापर्यंत फारोच्या प्यालेबरदाराचे जे काम करीत होतास तेव्हाच्या त्या पहिल्या रीतीप्रमाणे तू फारोचा प्याला त्याच्या हातात देशील.14परंतु तुझे चांगले होईल तेव्हा माझी आठवण कर, व कृपा करून फारोला माझ्यासंबंधी सांगून मला या तुरुंगातून बाहेर काढ.15कारण मला माझ्या इब्री लोकांच्या देशातून येथे पळवून आणले आहे. मी येथे तुरुंगात रहावे असा कोणाचा काहीच अपराध मी केला नाही.”16स्वप्नाचा अर्थ चांगला आहे हे पाहून मुख्य आचाऱ्याने योसेफाला म्हटले, “मलाही एक स्वप्न पडले. आणि पाहा, माझ्या डोक्यावर भाकरीच्या तीन टोपल्या होत्या.17सगळ्यात वरच्या टोपलीत फारो राजासाठी भट्टीत भाजलेली सर्व प्रकारची पक्वान्ने होती, परंतु माझ्या डोक्यावरील त्या टोपलीतील पदार्थ पक्षी खात होते.”18योसेफाने उत्तर दिले, “तुझ्या स्वप्नाचा अर्थ मी उलगडून सांगतो, त्या तीन टोपल्या म्हणजे तीन दिवस आहेत.19तीन दिवसात फारो राजा तुझे शीर वर करून उडवून टाकील आणि तुला झाडाला टांगील आणि पक्षी तुझे मांस तोडून खातील.”20तीन दिवसानंतर फारो राजाचा वाढदिवस होता. तेव्हा त्याने आपल्या सर्व सेवकवर्गाला एक मेजवानी दिली. त्या वेळी त्याने त्याचा आचारी आणि प्यालेबरदाराकडे त्याच्या इतर सेवकांपेक्षा अधिक लक्ष दिले.21त्याने प्यालेबरदाराची सुटका केली व त्यास पुन्हा पूर्वीप्रमाणे त्याच्या कामावर ठेवले; आणि प्यालेबरदाराने पुन्हा एकदा प्याला फारो राजाच्या हातात दिला.22परंतु, योसेफाने अर्थ सांगितला होता त्याप्रमाणेच त्याने आचाऱ्याला फाशी दिली.23पण त्या प्यालेबरदाराला योसेफाची आठवण राहिली नाही. त्यास त्याचा विसर पडला.
1साधारणपणे दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर फारो राजाला स्वप्न पडले. ते असे की, पाहा तो नाईल नदीच्या काठी उभा राहिला होता.2तेव्हा पाहा, त्याने सात गाई नाईल नदीतून बाहेर येताना पाहिल्या. त्या धुष्टपुष्ट व सुंदर होत्या. त्या तेथे उभ्या राहून गवतात चरत होत्या.3त्यानंतर आणखी सात दुबळ्या व कुरुप गाई नदीतून बाहेर आल्या व नदीच्या किनारी त्या सात धष्टपुष्ट व सुंदर गाईंच्या बाजूला उभ्या राहिल्या.4आणि त्या सात दुबळ्या व कुरुप गाईंनी त्या सात सुंदर व धष्टपुष्ट गाईंना खाऊन टाकले. त्यानंतर फारो राजा जागा झाला.5मग फारो राजा पुन्हा झोपल्यावर त्यास दुसऱ्यांदा स्वप्न पडले. त्यामध्ये त्याने पाहिले की, एकाच ताटाला सात भरदार कणसे आली.6त्यानंतर पाहा, त्या ताटाला सात खुरटलेली व पूर्वेच्या वाऱ्याने करपलेली अशी सात कणसे आली.7नंतर त्या सात खुरटलेल्या व करपलेल्या कणसांनी ती सात चांगली व टपोऱ्या दाण्यांची भरदार कणसे गिळून टाकली. तेव्हा फारो पुन्हा जागा झाला आणि ते तर स्वप्न असल्याचे त्यास समजले.8दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यावर फारो राजा त्या स्वप्नांमुळे चिंतेत पडून बेचैन झाला. त्याने मिसर देशातील जादूगार व ज्ञान्यांना बोलावले. फारोने आपली स्वप्ने त्यांना सांगितली. परंतु त्यांच्यातील कोणालाच त्या स्वप्नांचा अर्थ सांगता आला नाही.9तेव्हा प्यालेबरदार फारोस म्हणाला, “आज मला माझ्या अपराधाची आठवण होत आहे.10फारो, आपण माझ्यावर व आचाऱ्यावर संतापला होता आणि आपण आम्हांस पहारेकऱ्यांच्या सरदाराच्या वाड्यातील तुरुंगात टाकले होते.11तेव्हा तुरुंगात असताना एकाच रात्री मला व त्याला, आम्हा दोघांना स्वप्ने पडली. आम्हांला लागू होतील अशी निरनिराळी स्वप्ने आम्हांला पडली.12तेथे कोणी इब्री तरुण आमच्याबरोबर कैदेत होता. तो संरक्षण दलाच्या सरदाराचा दास होता. त्यास आम्ही आमची स्वप्ने सांगितली त्याने त्याचे स्पष्टीकरण केले. त्याने आमच्या प्रत्येकाच्या स्वप्नांचा अर्थ सांगितला.13आणि त्याने सांगितलेल्या अर्थाप्रमाणे तसे ते घडले. तो म्हणाला, फारो तुला पूर्वीप्रमाणे कामावर पुन्हा घेईल आणि परंतु दुसऱ्याला फाशी देईल.”14मग फारोने योसेफाला बोलावणे पाठवले. तेव्हा त्यांनी त्यास ताबडतोब तुरुंगातून बाहेर आणले. योसेफ दाढी करून व कपडे बदलून फारोकडे आला.15मग फारो योसेफास म्हणाला, “मला स्वप्न पडले आहे, परंतु त्याचा अर्थ सांगणारा कोणी नाही. मी तुझ्याविषयी ऐकले की, जेव्हा कोणी तुला स्वप्न सांगतो तेव्हा तू स्वप्नांचा अर्थ सांगतोस.”16योसेफाने फारोला उत्तर देऊन म्हणाला, “तसे सामर्थ्य माझ्यामध्ये नाही. देवच फारोला स्वप्नांचा अर्थ सांगेल.”17मग फारो योसेफाला म्हणाला, “माझ्या स्वप्नामध्ये मी नाईल नदीच्या काठी उभा होतो.18तेव्हा पाहा नदीतून सात धष्टपुष्ट व सुंदर गाई बाहेर आल्या व गवत खाऊ लागल्या असे मी पाहिले.19त्यानंतर पाहा, सात दुबळ्या व कुरुप गाई वर आल्या. मी सबंध मिसर देशात त्यांच्यासारख्या बेढब गाई कधीच पाहिल्या नव्हत्या.20त्या दुबळ्या व कुरुप गाईंनी आधीच्या धष्टपुष्ट व सुंदर गाई गिळून टाकल्या.21तरीही त्या दुबळ्या व कुरुपच राहिल्या, त्यांच्याकडे पाहिल्यावर त्यांनी त्या सात गाई गिळून टाकल्या असे वाटत नव्हते, त्या पूर्वीप्रमानेच कुरुप व दुबळ्या दिसत होत्या मग मी जागा झालो.22त्यानंतर माझ्या दुसऱ्या स्वप्नात एकाच ताटाला सात चांगली भरदार व टपोऱ्या दाण्यांची भरगच्च कणसे आली,23मग त्यांच्या मागून त्या ताटाला आणखी दुसरी वाळलेली, बारीक व पूर्वेच्या गरम वाऱ्याच्या झळांमुळे करपलेली सात कणसे आली.24बारीक कणसांनी ती चांगली सात कणसे गिळून टाकली. ही माझी स्वप्ने मी माझ्या जादुगारांना सांगितली. परंतु त्यांच्यातील कोणालाही त्यांचा उलगडा करून सांगता आले नाही.”25मग योसेफ फारोला म्हणाला, “महाराज, या दोन्हीही स्वप्नांचा अर्थ एकच आहे. देव जे काही करणार आहे ते त्याने आपणांस कळविले आहे.26त्या सात चांगल्या गाई आणि ती सात चांगली कणसे म्हणजे सात चांगली वर्षे आहेत. स्वप्ने सारखीच आहेत.27त्या दुसऱ्या सात दुबळ्या गाई व ती सात सुकलेली व पूर्वेच्या वऱ्याने करपलेली कणसेही म्हणजे अवघ्या देशावर येणाऱ्या दुष्काळाची सात वर्षे आहेत.28जी गोष्ट मी फारोला सांगितली ती हीच आहे. जे काय घडणार आहे हे देवाने आपणास दाखवले आहे.29पाहा सर्व मिसर देशात सात वर्षांच्या सुबत्तेच्या काळात चांगले व भरपूर पीक येईल.30परंतु सुकाळाच्या सात वर्षांनंतर सर्व देशभर दुष्काळाची अशी सात वर्षे येतील की, त्यामुळे मिसर देशाला सुकाळाचा विसर पडेल आणि हा दुष्काळ देशाचा नाश करील.31आणि भरपूर धान्य असतानाचे दिवस देशात कसे होते याचा लोकांस विसर पडेल, कारण तो फार भयंकर काळ असेल.32तेव्हा फारो महाराज, एकाच गोष्टीविषयी आपणाला दोनदा स्वप्ने पडली, ती यासाठी की, देव हे सर्व लवकरच व नक्की घडवून आणील हे आपणास दाखवावे.33तेव्हा, फारोने एखाद्या समंजस व शहाण्या मनुष्याची निवड करून त्यास सर्व मिसर देशावर नेमावे.34फारोने हे करावे: देशावर देखरेख करणारे नेमावे. त्यांनी येत्या सात वर्षांच्या सुकाळात मिसरातल्या पिकाचा पाचवा हिस्सा गोळा करून घ्यावा.35अशा रीतीने ही जी येणारी चांगली वर्षे, त्यामध्ये सर्व अन्नधान्य गोळा करावे. फारोच्या अधिकाराखाली ते धान्य नगरांमध्ये साठवून ठेवावे. त्यांनी त्याची राखण करावी.36येणाऱ्या दुष्काळातील सात वर्षांच्या काळात त्या धान्याचा पुरवठा मिसर देशाला करावा. अशा प्रकारे मग दुष्काळाच्या सात वर्षात देशाचा नाश होणार नाही.”
1मिसरमध्ये धान्य असल्याचे याकोबाला समजले. तेव्हा याकोब आपल्या मुलांना म्हणाला, “तुम्ही एकमेकांकडे असे का बघत बसलात?”2“इकडे पाहा, मिसर देशात धान्य आहे असे मी ऐकले आहे. तुम्ही खाली जाऊन आपणासाठी तिकडून धान्य विकत आणा म्हणजे आपण जगू, मरणार नाही.”3तेव्हा योसेफाचे दहा भाऊ धान्य विकत घेण्यासाठी मिसरला गेले.4याकोबाने, योसेफाचा भाऊ बन्यामीन याला त्याच्या भावाबरोबर पाठवले नाही, कारण तो म्हणाला, “कदाचित त्यास काही अपाय होईल.”5कनान देशात फारच तीव्र दुष्काळ पडला होता, पुष्कळ लोक धान्य विकत घ्यावयास मिसराला गेले त्या लोकात इस्राएलाचे पुत्रही होते.6त्या वेळी योसेफ मिसरचा अधिपती होता. तो देशातल्या सर्व लोकांस धान्य विकत असे. योसेफाचे भाऊ त्याच्याकडे आले आणि त्यांनी आपली तोंडे भूमीकडे करून खाली वाकून नमन केले.7योसेफाने आपल्या भावांना पाहिल्याबरोबर ओळखले, परंतु ते कोण आहेत हे माहीत नसल्यासारखे दाखवून तो त्यांच्याशी कठोरपणाने बोलला. त्याने त्यांना विचारले, “तुम्ही कोठून आला?” त्याच्या भावांनी उत्तर दिले, “महाराज, आम्ही कनान देशातून धान्य विकत घेण्यासाठी आलो आहो.”8योसेफाने आपल्या भावांना ओळखले, परंतु त्यांनी त्यास ओळखले नाही.9आणि मग योसेफाला आपल्या भावांविषयी पडलेली स्वप्ने आठवली. तो त्यांना म्हणाला, “तुम्ही हेर आहात. तुम्ही धान्य खरेदी करण्यास नव्हे तर आमच्या देशाचा कमजोर भाग हेरण्यास आला आहात.”10परंतु त्याचे भाऊ म्हणाले, “आमचे धनी, तसे नाही. आम्ही आपले दास अन्नधान्य विकत घ्यावयास आलो आहोत.11आम्ही सर्व भाऊ एका पुरुषाचे पुत्र आहोत. आम्ही प्रामाणिक माणसे आहोत. आम्ही तुमचे दास हेर नाही.”12नंतर तो त्यांना म्हणाला, “नाही, तुम्ही आमच्या देशाचा कमकुवत भाग पाहण्यास आलेले आहात.”13ते म्हणाले, “आम्ही तुमचे दास, बारा भाऊ, कनान देशातील एकाच मनुष्याचे बारा पुत्र आहोत. पाहा, आमचा सर्वांत धाकटा भाऊ घरी बापाजवळ आहे आणि आमच्यातला एक जिवंत नाही.”14परंतु योसेफ त्यांना म्हणाला, “मी तुम्हास म्हणालो तसेच आहे; तुम्ही हेरच आहात.15यावरुन तुमची पारख होईल. फारोच्या जिविताची शपथ, तुमचा धाकटा भाऊ येथे आल्याशिवाय तुम्हास येथून जाता येणार नाही.16तुमच्यातील एकाने मागे घरी जाऊन तुमच्या धाकट्या भावाला येथे घेऊन यावे, आणि तोपर्यंत तुम्ही येथे तुरुंगात रहावे. मग तुम्ही कितपत खरे बोलता हे आम्हांला कळेल. नाही तर फारोच्या जिवीताची शपथ खात्रीने तुम्ही हेर आहात.”17मग त्याने त्या सर्वांना तीन दिवस तुरुंगात अटकेत ठेवले.18तीन दिवसानंतर योसेफ त्यांना म्हणाला, “मी देवाला भितो, म्हणून मी सांगतो तसे करा आणि जिवंत राहा.19तुम्ही जर खरेच प्रामाणिक असाल तर मग तुम्हातील एका भावाला येथे तुरुंगात ठेवा व बाकीचे तुम्ही तुमच्या घरच्या मनुष्यांकरिता धान्य घेऊन जा.20मग तुमच्या धाकट्या भावाला येथे माझ्याकडे घेऊन या. यावरुन तुम्ही माझ्याशी खरे बोलता किंवा नाही याची मला खात्री पटेल आणि तुम्हास मरावे लागणार नाही.” तेव्हा त्यांनी तसे केले.21ते एकमेकांना म्हणाले, “खरोखर आपण आपल्या भावाविषयी अपराधी आहोत. कारण आपण त्याच्या जिवाचे दुःख पाहिले तेव्हा त्याने काकुळतीने रडून आपणास विनंती केली, परंतु आपण त्याचे ऐकले नाही. त्यामुळेच आता आपणांस हे भोगावे लागत आहे.”22मग रऊबेन त्यांना म्हणाला, “मी तुम्हास म्हणत नव्हतो का की, ‘मुलाविरूद्ध पाप करू नका,’ परंतु तुम्ही ते ऐकले नाही. आता पाहा, त्याचे रक्त तुमच्यापासून मागितले जात आहे.”23योसेफ दुर्भाष्यामार्फत आपल्या भावांशी बोलत असल्यामुळे, योसेफाला आपल्या भाषेतील बोलणे कळत असेल असे त्यांना वाटले नाही.24म्हणून तो त्यांच्यापासून बाजूला जाऊन रडला. थोड्या वेळाने तो परत त्यांच्याकडे आला आणि त्यांच्याशी बोलला. त्याने शिमोनाला त्यांच्यातून काढून घेतले आणि त्यांच्या नजरेसमोरच त्यास बांधले.25मग आपल्या भावांच्या पोत्यात धान्य भरण्यास सांगितले, तसेच त्या धान्याबद्दल त्याच्या भावांनी दिलेला पैसा ज्याच्या त्याच्या पोत्यात भरण्यास सांगितले, आणि त्यांच्या परतीच्या प्रवासात वाटेत खाण्यासाठी अन्नसामग्री देण्यास सेवकांना सांगतिले. त्यांच्यासाठी तसे करण्यात आले.
1कनान देशात दुष्काळ फारच तीव्र पडला होता.2असे झाले की, त्यांनी मिसर देशाहून आणलेले सगळे धान्य खाऊन संपल्यावर त्यांचा बाप त्यांना म्हणाला, “तुम्ही पुन्हा जाऊन आपल्याला खाण्यासाठी आणखी धान्य विकत आणा.”3परंतु यहूदा त्यास म्हणाला, “त्या देशाच्या अधिकाऱ्याने आम्हांला ताकीद दिली. तो म्हणाला, ‘तुम्ही जर तुमच्या धाकट्या भावाला तुमच्या बरोबर माझ्याकडे आणले नाही तर तुम्ही माझे तोंडदेखील पाहणार नाही.’4तेव्हा तुम्ही भावाला आमच्याबरोबर पाठवत असाल तरच आम्ही खाली जाऊन धान्य विकत आणू.5पण तुम्ही त्यास पाठवणार नाही तर मग आम्ही धान्य आणावयास खाली जाणार नाही. तुमच्या धाकट्या भावाशिवाय तुम्ही माझे तोंड पाहणार नाही असे त्या आधिकाऱ्याने आम्हांला बजावून सांगितले आहे.”6इस्राएल म्हणाला, “पण तुम्हास आणखी एक भाऊ आहे असे त्या मनुष्यास सांगून तुम्ही माझे असे वाईट का केले?”7ते म्हणाले, “त्या मनुष्याने आमच्याविषयी व आपल्या परिवाराविषयी बारकाईने विचारपूस केली. त्याने आम्हांला विचारले, ‘तुमचा बाप अजून जिवंत आहे का? तुमचा आणखी दुसरा भाऊ आहे का?’ आम्ही तर त्याच्या या प्रश्नाप्रमाणे त्यास उत्तरे दिली. ‘तुम्ही आपल्या भावाला घेऊन या’ असे सांगेल, हे आम्हांला कुठे माहीत होते?”8मग यहूदा आपला बाप इस्राएल याला म्हणाला, “मुलाला माझ्याबरोबर पाठवा. म्हणजे आम्ही जाऊ. मग आपण म्हणजे आम्ही, तुम्ही व आपली मुलेबाळे जिवंत राहू, मरणार नाही.9मी त्याची हमी घेतो. त्याच्यासाठी मला जबाबदार धरा. जर मी त्यास परत माघारी तुमच्याकडे आणले नाही तर मी तुमचा कायमचा दोषी होईन.10जर आम्ही उशीर केला नसता तर आतापर्यंत नक्कीच आमच्या धान्य आणण्याच्या दोन फेऱ्या झाल्या असत्या.”11मग त्यांचा बाप इस्राएल म्हणाला, “जर असे आहे तर आता हे करा, त्या अधिकाऱ्याकरता आपल्या देशातले चांगले निवडक पदार्थ म्हणजे थोडा मध, मसाल्याचे पदार्थ व बोळ, पिस्ते, बदाम, डिंक, गंधरस वगैरे तुमच्या गोण्यांत घेऊन त्यास बक्षीस म्हणून घेऊन जा.”12या वेळी दुप्पटीपेक्षा जास्त पैसा तुमच्या हाती घ्या. मागच्या वेळी तुम्ही दिलेला जो पैसा तुमच्या गोण्यामधून परत आला तोही परत घेऊन जा. कदाचित काही चूक झाली असेल.13तुमच्या भावालाही बरोबर घ्या. उठा आणि त्या मनुष्याकडे परत जा.14“त्या अधिकाऱ्यापुढे तुम्ही जाऊन उभे रहाल तेव्हा सर्वसमर्थ देव तुम्हास साहाय्य करो. यासाठी की, त्याने बन्यामिनाला व शिमोनाला सोडून द्यावे. आणि जर मी माझ्या मुलांना मुकलो, तर मुकलो.”15अशा रीतीने त्या मनुष्यांनी भेटवस्तू घेतल्या. त्यांनी त्यांच्या हातात दुप्पट पैसा आणि बन्यामिनाला घेतले. ते उठले आणि खाली मिसरात गेले व योसेफापुढे उभे राहिले.16त्या भावांच्याबरोबर योसेफाने बन्यामिनास पाहिले. तेव्हा तो आपल्या कारभाऱ्याला म्हणाला, “या लोकांस माझ्या घरी आण. पशू मारून भोजन तयार कर, कारण हे सर्वजण दुपारी माझ्याबरोबर भोजन करतील.”17तेव्हा त्या कारभाऱ्याने त्यास योसेफाने सांगितल्याप्रमाणे भोजनाची सर्व तयारी केली. नंतर त्याने त्या सर्व भावांना योसेफाच्या घरी नेले.18योसेफाच्या घरी नेल्यावर ते भाऊ फार घाबरले. ते म्हणाले, “मागच्या वेळी आपल्या गोणीत आपण दिलेले पैसे परत ठेवण्यात आले म्हणून आपणांस येथे आणले आहे, त्यावरून आपणास दोषी ठरवण्याची संधी शोधत आहे. तो आपली गाढवे घेईल व आपल्याला गुलाम करील असे वाटते.”19म्हणून मग ते भाऊ योसेफाच्या कारभाऱ्याकडे गेले आणि घराच्या दरवाजाजवळ ते त्याच्याशी बोलू लागले.20ते म्हणाले, “धनी, मागच्या वेळी आम्ही धान्य खरेदी करण्यासाठीच आलो होतो.21आम्ही घरी परत जाताना एका मुक्कामाच्या ठिकाणी आमची पोती उघडली तेव्हा पाहा, प्रत्येक मनुष्याचा पैसा ज्याच्या गोणीत पूर्ण वजनासह जसाच्या तसाच होता. आमच्या पोत्यात पैसे कसे आले हे आम्हांला माहीत नाही. परंतु ते सगळे पैसे तुम्हास परत देण्यासाठी आम्ही आमच्यासोबत आणले आहेत.22आणि आता या वेळी आणखी धान्य विकत घेण्यासाठी अधिक पैसे आणले आहेत, आमच्या गोणीत पैसे कोणी ठेवले हे आम्हांला ठाऊक नाही.”23परंतु कारभाऱ्याने उत्तर दिले, “तुम्हास शांती असो, भिऊ नका. तुमच्या व तुमच्या पित्याच्या देवाने तुमच्या गोणीत ते पैसे ठेवले असतील. मला तुमचे पैसे मिळाले आहेत.” नंतर त्या कारभाऱ्याने शिमोनाला तुरुंगातून सोडवून घरी आणले.24मग त्या कारभाऱ्याने त्या भावांना योसेफाच्या घरी आणले. त्याने त्यांना पाय धुण्यासाठी पाणी दिले व त्यांनी पाय धुतले. मग त्याने त्यांच्या गाढवांना वैरण दिली.25आपण योसेफासोबत भोजन करणार आहोत हे त्या भावांनी ऐकले होते. तेव्हा त्यांनी दुपारपर्यंत तयारी करून त्यास देण्याच्या भेटी तयार केल्या.26योसेफ घरी आला तेव्हा त्या भावांनी त्याच्यासाठी आपल्यासोबत आणलेली भेट त्याच्या हातात दिली व त्यांनी त्यास भूमीपर्यंत खाली वाकून नमन केले.27मग योसेफाने ते सर्व बरे आहेत ना, याची विचारपूस केली. तो म्हणाला, “तुमचा बाप, ज्यांच्याबद्दल तुम्ही मागे मला सांगितले होते, तो बरा आहे का? तो अजून जिवंत आहेत का?”28त्यांनी उत्तर दिले, “तुमचा दास, आमचा बाप, सुखरूप आहे. तो अजून जिवंत आहे.” त्यांनी खाली वाकून नमन केले.29मग त्याने नजर वर करून आपल्या आईचा मुलगा आपला भाऊ बन्यामीन याला पाहिले. तो म्हणाला, “तुम्ही मला ज्याच्याविषयी सांगितले तो हाच का तुमचा धाकटा भाऊ?” नंतर तो म्हणाला, “माझ्या मुला, देव तुझ्यावर कृपा करो.”30मग योसेफ घाईघाईने खोलीबाहेर निघून गेला. आपला भाऊ बन्यामीन याच्यासाठी त्याची आतडी तुटू लागली आणि कोठे तरी जाऊन रडावे असे त्यास वाटले. तो आपल्या खोलीत गेला व तेथे रडला.31मग तोंड धुऊन तो परत आला. मग स्वतःला सावरून तो म्हणाला, “जेवण वाढा.”32योसेफाला त्यांनी वेगळे व त्याच्या भावांना वेगळे वाढले. मिसरी लोक त्याच्यासोबत तेथे वेगळे असे जेवले, कारण इब्री लोकांबरोबर मिसरी लोक जेवण जेवत नसत, कारण मिसऱ्यांना ते तिरस्कारणीय वाटत असे.33त्याच्या भावांना त्याच्यासमोर बसवले, तेव्हा त्यांच्या ज्येष्ठतेच्या क्रमानुसार थोरल्या भावाला प्रथम बसवले, आणि इतरांस त्यांच्या वयांप्रमाणे बसवल्यामुळे ते चकित होऊन एकमेकांकडे पाहू लागले.34योसेफाने त्याच्या पुढील पक्वान्नामधून वाटे काढून त्यांना दिले, पण त्याने बन्यामिनाला इतरांपेक्षा पाचपट अधिक वाढले. ते सर्व भरपूर जेवले व मनमुराद पिऊन आनंदीत झाले.
1मग योसेफाने आपल्या कारभाऱ्याला आज्ञा देऊन म्हटले, “या लोकांच्या गोणीमधे जेवढे अधिक धान्य मावेल व त्यांना नेता येईल तेवढे भर. आणि त्यासोबत प्रत्येकाचे पैसेही त्या पोत्यात ठेव.2सर्वांत धाकट्याच्या गोणीत धान्याच्या पैशाबरोबर माझा विशेष चांदीचा प्यालाही ठेव.” योसेफाच्या कारभाऱ्याने त्याच्या आज्ञेप्रमाणे सर्वकाही केले.3दुसऱ्या दिवशी अगदी सकाळी त्या भावांना त्यांच्या गाढवांसह त्यांच्या देशाला रवाना करण्यात आले.4ते नगराबाहेर दूर गेले नाहीत, तोच थोड्या वेळाने योसेफ आपल्या कारभाऱ्याला म्हणाला, “जा आणि त्या लोकांचा पाठलाग कर आणि त्यांना थांबवून असे म्हण, ‘आम्ही तुमच्याशी भलेपणाने वागलो! असे असता तुम्ही आमच्याशी अशा वाईट रीतीने का वागला? तुम्ही माझ्या स्वामीचा चांदीचा प्याला का चोरला?5हा प्याला खास माझा धनी पिण्याकरिता वापरतात. तसेच देवाला प्रश्न विचारण्याकरिता उपयोग करतात. हा प्याला चोरून तुम्ही फार वाईट केले आहे.’”6तेव्हा त्या कारभाऱ्याने त्यांना गाठून योसेफाने आज्ञा केल्याप्रमाणे तो त्यांच्याशी बोलला.7परंतु ते कारभाऱ्याला म्हणाले, “माझे धनी असे का बरे बोलतात? आम्ही कधीच अशा गोष्टी करीत नाही.8पाहा, मागे आमच्या गोणीत मिळालेला पैसाही आम्ही कनान देशातून तुमच्याकडे परत आणला. तेव्हा आपल्या धन्याच्या घरातून आम्ही सोने किंवा चांदी कशी चोरणार?9या पेक्षा आम्हापैकी कोणाच्या पोत्यात तुम्हास जर तो चांदीचा प्याला मिळाला तर तो भाऊ मरेल. तुम्ही त्यास मारून टाकावे आणि मग आम्ही सर्वजण तुमच्या धन्याचे गुलाम होऊ.”10कारभारी म्हणाला, “ठीक आहे, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आपण करू. जर मला चांदीचा प्याला मिळाला तर मग तो मनुष्य माझ्या धन्याचा गुलाम होईल. इतरजण जाण्यास मोकळे राहतील.”11नंतर प्रत्येक भावाने लगेच आपली गोणी जमिनीवर उतरून उघडली.12कारभाऱ्याने थोरल्या भावापासून सुरुवात करून धाकट्या भावाच्या गोणीपर्यंत तपासून पाहिले. तेव्हा त्यास बन्यामिनाच्या गोणीत तो चांदीचा प्याला मिळाला.13दुःखामुळे त्यांनी आपली वस्त्रे फाडली आणि आपल्या गोण्या गाढवांवर लादून ते परत नगरात आले.14यहूदा व त्याचे भाऊ परत योसेफाच्या घरी गेले. योसेफ अजून घरातच होता. त्या भावांनी योसेफापुढे लोटांगण घातले.15योसेफ त्यांना म्हणाला, “तुम्ही असे का केले? मला शकून पाहण्याचे ज्ञान आहे हे तुम्हास माहीत नाही का?”16यहूदा म्हणाला, “माझ्या धन्याला आम्ही काय बोलावे? किंवा आम्ही अपराधी नाही हे कसे सिद्ध करावे? देवाला तुमच्या सेवकांचा दोष सापडला आहे. म्हणून आता त्याच्यासह आम्ही सर्वजण धन्याचे गुलाम झालो आहोत.”17परंतु योसेफ म्हणाला, “मी तुम्हा सर्वजणांना गुलाम करणार नाही. फक्त ज्याने चांदीचा प्याला चोरला तोच माझा गुलाम होईल. बाकीचे तुम्ही शांतीने आपल्या बापाकडे जाऊ शकता.”
1आता मात्र योसेफाला आपल्याजवळ जे उभे होते त्या सर्व सेवकांसमोर दुःख रोखून धरता येईना. तो मोठ्याने रडला. तो म्हणाला, “येथील सर्व लोकांस येथून बाहेर जाण्यास सांगा.” तेव्हा तेथील सर्वजण निघून गेले. केवळ त्याचे भाऊच त्याच्यापाशी राहिले. मग योसेफाने आपली ओळख त्यांना दिली.2तो मोठ्याने रडला. मिसर देशाच्या लोकांनी व फारो राजाच्या घराण्यातील लोकांनीही त्याचे रडणे ऐकले.3मग योसेफ आपल्या भावांना म्हणाला, “मी योसेफ आहे. माझा बाप अजून जिवंत आहे काय?” परंतु त्याचे भाऊ त्यास काही उत्तर देऊ शकले नाहीत. त्याच्या समोर ते फार घाबरले होते.4तेव्हा योसेफ आपल्या भावांना म्हणाला, “मी विनंती करतो जरा इकडे माझ्याजवळ या.” तेव्हा ते त्याच्या जवळ गेले. आणि तो त्यांना म्हणाला, “तुमचा भाऊ योसेफ मीच आहे. ज्याला तुम्ही मिसरी लोकांस विकले.5आता त्यासाठी काही खिन्न होऊ नका किंवा आपल्या स्वतःवर संताप करून घेऊ नका. मी येथे यावे व त्यामुळे आपणा सर्वांचे प्राण वाचावेत ही देवाचीच योजना होती.6हा दुष्काळ आता दोन वर्षे पडला आहे आणि आणखी पाच वर्षे पेरणी किंवा कापणी होणार नाही.7देवाने मला तुमच्या आधी येथे पाठवले आहे, यासाठी की, तुमचा पृथ्वीवर बचाव होऊन तुम्ही शेष रहावे आणि तुम्हास जिवंत ठेवून तुमची वंशवृद्धी होऊ द्यावी.8मला येथे पाठवण्यात तुमचा दोष नव्हता तर ही देवाची योजना होती. देवाने मला फारोच्या वडिलासमान केले आहे. त्यामुळे मी फारोच्या घरादाराचा धनी आणि सर्व मिसर देशाचा अधिकारी झालो आहे.”9योसेफ म्हणाला, “तर आता ताबडतोब माझ्या बापाकडे जाण्यास निघा. त्यास सांगा की, तुमचा मुलगा योसेफ याने तुम्हास संदेश पाठवला आहे. देवाने मला अवघ्या मिसर देशाचा धनी केले आहे. तर माझ्याकडे खाली निघून या. उशीर करू नका.10तुम्ही माझ्याजवळ गोशेन प्रांतात राहा. आणि तुम्ही, तुमची मुले, नातवंडे तसेच तुमची शेरडेमेंढरे, गुरेढोरे आणि जे काही तुमचे आहे ते माझ्याजवळ राहील.11येणाऱ्या दुष्काळाच्या पाच वर्षात मी तुम्हास सर्व प्रकारचा पुरवठा करीन त्यामुळे तुम्हावर व तुमच्या कुटुंबावर सर्व काही गमावून गरीब होण्याची वेळ येणार नाही.12पाहा, माझे तोंड तुम्हाशी बोलत आहे हे तुमचे डोळे, व माझा भाऊ बन्यामीन याचे डोळे पाहत आहेत.13मिसर देशातील माझे वैभव आणि तुम्ही येथे जे जे पाहिले आहे त्यासंबंधी माझ्या बापाला सांगा. आता लवकर जाऊन माझ्या बापाला माझ्याकडे खाली घेऊन या.”14मग त्याने आपला भाऊ बन्यामीन याला मिठी मारली आणि गळ्यात पडून रडला, आणि बन्यामीनही त्याच्या गळ्यात पडून रडला.15मग त्याने आपल्या प्रत्येक भावाला मिठी मारली व त्यांचे मुके घेतले आणि तो रडला. यानंतर त्याचे भाऊ त्याच्याबरोबर बोलू लागले.16“योसेफाचे भाऊ त्याजकडे आले आहेत” अशी बातमी फारो, त्याच्या घरची मंडळी व त्याचे सेवक यांना समजली त्यामुळे त्या सर्वांना आनंद झाला.17तेव्हा फारो योसेफाला म्हणाला, “तुझ्या भावांना सांग की, ‘तुम्हास गरज असेल तेवढी अन्नसामग्री जनावरांवर लादून कनान देशास जा.18तसेच तुमचा बाप आणि तुमच्या घरची सर्व मंडळी यांना घेऊन माझ्याकडे या. तुम्हास रहावयास मिसरमधील सर्वांत उत्तम प्रदेश मी देईन आणि तुमच्या घरातील मंडळी, यांना आमच्या येथे असलेले उत्तम पदार्थ खावयास मिळतील.’19तुला माझी आज्ञा आहे, तू त्यांना सांग की, ‘असे करा, तुमच्या स्त्रिया व तुमची मुले या सर्वांकरिता मिसर देशातून गाड्या घेऊन जा. तुमच्या वडिलांना घेऊन या.20तुमची मालमत्ता व जे काही असेल त्याची चिंता करू नका, कारण मिसर देशामधील जे उत्तम ते सर्व तुमचेच आहे.’”21तेव्हा इस्राएलाच्या मुलांनी तसे केले. योसेफाने त्यांना फारोने आज्ञा दिल्याप्रमाणे गाड्या दिल्या, आणि त्यांच्या प्रवासाकरिता भरपूर अन्नसामग्री दिली.22तसेच त्याने प्रत्येक भावाला एक एक पोशाख दिला व बन्यामिनाला पाच पोशाख आणि चांदीची तीनशे नाणी + साधारण 3.5 किलोग्राम चांदी दिली.23त्याने आपल्या वडिलासाठीही या देणग्या पाठवल्या: धान्य, भाकरी, आणि इतर पदार्थांनी लादलेल्या दहा गाढवी त्याच्या वडिलाच्या प्रवासासाठी पाठवल्या.24मग योसेफाने आपल्या भावांना निरोप दिला आणि ते निघाले. तो त्यांना म्हणाला, “रस्त्यात एकमेकांशी भांडू नका.”25अशा रीतीने त्याचे भाऊ मिसर सोडून कनान देशास आपला पिता याकोब याच्याकडे गेले.26त्यांनी आपल्या पित्यास सांगितले, “तुमचा मुलगा योसेफ अजून जिवंत आहे आणि तो अवघ्या मिसर देशाचा अधिकारी आहे.” हे ऐकून त्याचे हृदय विस्मित झाले, कारण त्याचा त्यांच्यावर विश्वास बसला नाही.27परंतु त्यांनी त्यास योसेफाने सांगितलेल्या सर्व गोष्टी कळवल्या. मग योसेफाने त्यास मिसरला घेऊन जाण्यासाठी पाठवलेल्या गाड्या याकोबाने पाहिल्या, तेव्हा त्यांचा बाप याकोब संजीवित झाला.28इस्राएल म्हणाला, “हे पुरेसे आहे. माझा मुलगा योसेफ अजून जिवंत आहे. आता मी मरण्यापूर्वी त्यास जाऊन भेटेन.”
1इस्राएलाने, आपले जे काही होते त्याबरोबर प्रवासास सुरुवात केली आणि तो बैर-शेबास गेला. तेथे त्याने आपला बाप इसहाक याच्या देवाला अर्पणे वाहिली.2रात्री देव स्वप्नात दर्शन देऊन इस्राएलाशी बोलला, तो म्हणाला, “याकोबा, याकोबा.” त्याने उत्तर दिले, “काय आज्ञा?”3तो म्हणाला “मी देव आहे, तुझ्या बापाचा देव आहे. खाली मिसर देशास जाण्यास तू भिऊ नको, कारण मी तुझ्यापासून तेथे एक मोठे राष्ट्र तयार करीन.4मी तुझ्याबरोबर खाली मिसरात जाईन, आणि मी तुला मिसरमधून पुन्हा आणीन. आणि योसेफ आपल्या हातांनी तुझे डोळे झाकील.”5मग याकोब बैर-शेबाहून उठला. इस्राएलाच्या मुलांनी आपला बाप, आपल्या स्त्रिया व मुले या सर्वांना फारोने पाठवलेल्या गाड्यांतून मिसरला आणले.6त्याच प्रमाणे त्यांनी आपली शेरडेमेंढरे, गुरेढोरे आणि कनान देशात त्यांनी मिळवलेले सर्वकाही मिसरला नेले; याप्रमाणे याकोब व त्याची संतती मिसर देशास आली.7त्याने आपल्यासोबत आपली मुले व नातू, आपल्या मुली व नाती या सर्व संतानांना मिसरात नेले.8इस्राएलाचे जे पुत्र त्याच्याबरोबर मिसरला गेले त्याची नावे अशी: याकोबाचा प्रथम जन्मलेला रऊबेन;9रऊबेनाचे पुत्र हनोख आणि पल्लू आणि हेस्रोन आणि कर्मी;10शिमोनाचे पुत्र यमुवेल, यामीन, ओहाद, याकोन, जोहर आणि कनानी स्त्रीपासून झालेला मुलगा शौल;11लेवीचे पुत्र गेर्षोन, कहाथ व मरारी;12यहूदाचे पुत्र एर, ओनान, शेला, पेरेस व जेरह, (परंतु एर व ओनान हे कनान देशात मरण पावले. पेरेसाचे पुत्र हेस्रोन व हामूल),13इस्साखाराचे पुत्र तोला, पुवा, लोब व शिम्रोन;14जबुलूनाचे पुत्र सेरेद, एलोन व याहलेल15(याकोबाला लेआपासून पदन-अरामात झालेली सहा मुले व दीना ही मुलगी; त्याच्या कुटुंबात मुले आणि मुली मिळून तेहतीस जण होते),16गादाचे पुत्र सिफयोन आणि हग्गी, शूनी आणि एसबोन, एरी, अरोदी, आणि अरेली;17आशेराचे पुत्र इम्ना आणि इश्वा, इश्वी, आणि बरीया, आणि त्याची बहीण सेराह; आणि बरीयाचे पुत्र हेबर व मलकीएल18(जिल्पा जी लाबानने आपली मुलगी लेआ हिला दिली होती, तिच्यापासून झालेले हे सगळे याकोबाचे पुत्र होते. ती एकंदर सोळा माणसे होती),19याकोबाची पत्नी राहेल हिचे पुत्र योसेफ व बन्यामीन हे होते;20(योसेफास मिसर देशातील ओनचा याजक पोटीफर याची मुलगी आसनथ हिच्या पोटी मनश्शे व एफ्राईम हे पुत्र झाले),21बन्यामिनाचे पुत्र बेला, बेकेर, आशबेल, गेरा, नामान, एही, रोष, मुप्पीम, हुप्पीम आणि आर्द.22(याकोबापासून राहेलीस झालेली ही मुले. सर्व मिळून ते सर्व चौदा जण होते),23हुशीम हा दान याचा मुलगा होता;24नफतालीचे पुत्र यासहेल, गुनी, येसेर आणि शिल्लेम हे होते.25(लाबानाने आपली मुलगी राहेल हिला दिलेल्या बिल्हाचे याकोबापासून झालेले हे पुत्र. हे सर्व मिळून सात जण होते).26याकोबाच्या वंशातील जी माणसे मिसरमध्ये गेली ती याकोबाच्या मुलांच्या स्त्रिया सोडून सहासष्ट जण होती.27योसेफास मिसर देशात झालेले दोन पुत्र मिळून एकंदर याकोबाच्या घराण्यातले सत्तर जण मिसर देशात होते.
1योसेफ फारोकडे जाऊन म्हणाला, “माझा बाप माझे भाऊ व त्यांच्या कुटुंबातील सर्व मंडळी कनान देशातून त्यांची शेरडेमेंढरे, गुरेढोरे व त्यांचे सर्वकाही घेऊन येथे आले आहेत. ते गोशेन प्रांतात आहेत.”2त्याने आपल्याबरोबर फारोसमोर जाण्यासाठी आपल्या भावांपैकी पाच जणांना घेतले आणि त्यांची ओळख करून दिली.3फारो राजा त्याच्या भावांना म्हणाला, “तुम्ही काय धंदा करता?” ते म्हणाले, “आम्ही आपले दास मेंढपाळ आहोत आणि आमचे पूर्वजही मेंढपाळच होते.”4ते फारोला पुढे म्हणाले, “कनान देशात फारच भयंकर व कडक दुष्काळ पडला आहे. तेथे एकाही शेतात तुमच्या दासांच्या कळपांसाठी हिरवे गवत किंवा हिरवा चारा राहिलेला नाही म्हणून आम्ही या देशात तात्पुरते राहण्यास आलो आहोत. आम्ही आपणांस विनंती करतो की आम्हास गोशेन प्रांतात राहू द्यावे.”5मग फारो योसेफाला म्हणाला, “तुझा बाप व तुझे भाऊ तुझ्याकडे आले आहेत.6त्यांना राहण्याकरिता तू मिसर देशातील कोणतेही ठिकाण निवड. त्यांना उत्तम जमीन असलेला प्रदेश दे, त्यांना गोशेन प्रांतात वस्ती करून राहू दे. आणि त्याच्यात जर कोणी हुशार मनुष्य मनुष्ये तुला माहीत असतील तर मग त्यांना माझ्या गुराढोरांवर अधिकारी कर.”7मग योसेफाने याकोब त्याचा बाप याला आणले आणि फारोच्या समोर सादर केले. तेव्हा याकोबाने फारोस आशीर्वाद दिला.8मग फारोने याकोबाला विचारले, “तुमचे वय किती आहे?”9याकोबाने फारोस उत्तर दिले, “माझ्या कष्टमय जीवनाची वर्षे फक्त एकशे तीस वर्षे आहेत. परंतु माझ्या पूर्वजांइतके दीर्घ आयुष्य मला लाभले नाही.”10याकोबाने फारोला आशीर्वाद दिला व मग तो फारोपुढून निघून गेला.11योसेफाने फारोच्या आज्ञेप्रमाणे आपल्या बापाला व भावांना रामसेस नगरजवळील प्रांतातील उत्तम भूमी त्यांना रहावयास दिली.12आणि त्याने आपला बाप, आपले भाऊ व त्यांच्या कुटुंबाप्रमाणे, त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांच्या संख्येप्रमाणे भरपूर अन्नसामग्री पुरवली.13त्या वेळी सर्व भूमीवर दुष्काळ तर फारच कडक पडला होता; अन्नधान्य कोठेच मिळत नव्हते. त्यामुळे मिसर व कनान देशातील जमीन दुष्काळामुळे उजाड झाली.14योसेफाने मिसर आणि कनान देशातील रहिवाशांना अन्नधान्य विकून त्यांच्याकडील सर्व पैसा गोळा केला. त्यानंतर योसेफाने तो पैसा फारोच्या राजवाड्यात आणला.15काही काळाने मिसर व कनान देशातील लोकांचे पैसे संपून गेले, त्यामुळे मिसरचे लोक योसेफाकडे येऊन म्हणाले, “आम्हास अन्न द्या! आमचे सर्व पैसे संपले आहेत म्हणून आम्ही तुमच्यासमोरच का मरावे?”16परंतु योसेफ म्हणाला, “जर तुमचे पैसे संपले आहेत, तर तुम्ही मला तुमची गुरेढोरे द्या आणि मग मी तुमच्या गुराढोरांच्या बदल्यात तुम्हास धान्य देईन.”17तेव्हा लोकांनी त्यांच्याकडील गुरेढोरे, शेरडेमेंढरे, घोडे, गाढवे आणि इतर जनावरे देऊन अन्नधान्य विकत घेतले. त्या वर्षात लोकांकडून गुरेढोरे घेऊन त्यांच्या बदल्यात योसेफाने त्यांना अन्नधान्य दिले.18परंतु त्या वर्षानंतर, पुढील वर्षी लोक योसेफाकडे जाऊन म्हणाले, “आमच्या धन्यापासून आम्ही काही लपवत नाही. आपणास माहीत आहे की, आमच्याकडे पैसे उरलेले नाहीत आणि आमची गुरेढोरेही धन्याची झाली आहेत. तेव्हा आमच्या धनाच्यासमोर आमची शरीरे व आमच्या जमिनी याशिवाय दुसरे काहीही उरलेले नाही.19तुमच्या डोळ्यांसमोर आम्ही का मरावे? आमचा व आमच्या जमिनीचाही नाश का व्हावा? परंतु जर आपण आम्हांला अन्नधान्य द्याल तर मग आम्ही आमच्या जमिनी फारोला देऊ आणि आम्ही त्याचे गुलाम होऊ. आम्हास बियाणे द्या म्हणजे आम्ही जगू, मरणार नाही आणि जमिनी ओस पडणार नाहीत.”
1या गोष्टीनंतर “त्याचा बाप आजारी असल्याचे” कोणी योसेफाला कळवले, म्हणून आपले दोन पुत्र मनश्शे व एफ्राईम यांना बरोबर घेऊन तो गेला.2“योसेफ आपणास भेटावयास आला आहे” असे याकोबास कोणी सांगितले, हे कळवल्याबरोबर इस्राएलाने शक्ती एकवटली आणि बिछान्यावर उठून बसला.3मग याकोब योसेफास म्हणाला, “सर्वसमर्थ देवाने मला कनानातील लूज येथे दर्शन देऊन आशीर्वाद दिला.4देव म्हणाला, ‘मी तुला खूप संतती देईन व ती वाढवीन आणि मी तुला राष्ट्रांचा समुदाय करीन. आणि तुझ्यानंतर तुझ्या संतानाला हा देश कायमचा वतन म्हणून देईल.’5आणि आता, मी येथे मिसर देशास येण्यापूर्वी, मिसराच्या भूमीमध्ये जे तुझ्या पोटी जन्मलेले हे दोन पुत्र, माझे आहेत. तुझे हे दोन पुत्र मनश्शे व एफ्राईम हे आता रऊबेन व शिमोन यांच्याप्रमाणेच माझे होतील.6त्यांच्यानंतर तुला जी संतती होईल ती तुझी होईल; त्यांच्या वतनात त्यांची नावे त्यांच्या भावांच्या नावांखाली नोंदवण्यात येतील.7परंतु पदन येथून मी येताना तुझी आई राहेल, एफ्राथापासून आम्ही थोड्याच अंतरावर असताना कनान देशात मरण पावली, त्यामुळे मी फार दुःखी झालो. तेव्हा एफ्राथच्या म्हणजे बेथलेहेमाच्या वाटेवर मी तिला पुरले.”8मग इस्राएलाने योसेफाच्या मुलांना पाहिले, तेव्हा इस्राएल म्हणाला, “हे कोणाचे आहेत?”9योसेफ आपल्या पित्यास म्हणाला, “हे माझे पुत्र आहेत. हे मला देवाने येथे दिले आहेत.” इस्राएल म्हणाला, “तुझ्या मुलांना माझ्याकडे आण म्हणजे मी त्यांना आशीर्वाद देईन.”10इस्राएल अतिशय म्हातारा झाला होता आणि त्याची नजर मंद झाल्यामुळे त्यास चांगले स्पष्ट दिसत नव्हते. तेव्हा इस्राएलाने त्या मुलांना कवटाळून त्यांचे मुके घेतले.11मग इस्राएल योसेफास म्हणाला, “मुला तुझे तोंड पुन्हा पाहावयास मिळेल असे वाटले नव्हते, पण देवाने तुझी व माझी भेट होऊ दिली. मला तुझी मुलेही पाहू दिली.”12मग योसेफाने आपल्या मुलांना इस्राएलाच्या मांडीवरून काढून घेतले. ते पुत्र इस्राएलासमोर उभे राहिले व त्यांनी त्यास लवून नमन केले.13योसेफाने मनश्शेला आपल्या डाव्या हाती म्हणजे तो इस्राएलाच्या उजव्या हाती येईल असे व एफ्राईमाला आपल्या उजव्या हाती म्हणजे तो इस्राएलाच्या डाव्या हाती येईल असे उभे केले.14परंतु इस्राएलाने आपला उजवा हात पुढे केला आणि एफ्राइमाच्या, म्हणजे जो धाकटा मुलगा होता त्याच्या डोक्यावर ठेवला आणि त्याचा डावा हात थोरल्याच्या म्हणजे मनश्शेच्या डोक्यावर ठेवला. त्याने त्याच्या हातांची अदलाबदल करून ते उजवेडावे केले.15इस्राएलाने योसेफाला आशीर्वाद देऊन म्हटले, “ज्या देवासमोर माझे वडील, अब्राहाम व इसहाक चालले, ज्या देवाने माझ्या सर्व आयुष्यभर मला चालवले आहे,16तोच मला सर्व संकटातून सोडवणारा माझा देवदूत होता, तोच या मुलांना आशीर्वाद देवो. आता या मुलांना माझे नाव व वडील अब्राहाम व इसहाक यांचे नाव देण्यात येवो. ते वाढून त्यांची पृथ्वीवर अनेक कुटुंबे, कुळे व राष्ट्रे होवोत.”17आपल्या वडिलाने एफ्राईमाच्या डोक्यावर आपला उजवा हात ठेवला असे योसेफाने पाहिले तेव्हा त्यास ते आवडले नाही. तो हात एफ्राईमाच्या डोक्यावरून काढून मनश्शेच्या डोक्यावर ठेवावा म्हणून योसेफाने आपल्या बापाचा हात घेतला.18योसेफ आपल्या पित्यास म्हणाला, “असे नाही बाबा, कारण हा प्रथम जन्मलेला आहे. तुमचा उजवा हात याच्या डोक्यावर ठेवा.”19परंतु त्याचा वडिलाने नकार दिला आणि म्हटले, “माझ्या मुला, मला माहीत आहे. होय, मला माहीत आहे की, तोसुद्धा महान होईल. परंतु धाकटा भाऊ त्याच्यापेक्षाही अधिक महान होईल आणि त्याची कुळे वाढून त्यांचा मोठा राष्ट्रसमूह निर्माण होईल.”20त्या दिवशी इस्राएलाने त्या मुलांना या शब्दांत आशीर्वाद दिला, तो म्हणाला, “इस्राएल लोक आशीर्वाद देताना तुमची नावे उच्चारितील, ते म्हणतील, ‘देव तुम्हास एफ्राईमासारखा, मनश्शेसारखा आशीर्वाद देवो.’”21मग इस्राएल योसेफाला म्हणाला, “पाहा, मी आता मरणार आहे. परंतु देव तुमच्या बरोबर राहील, तो तुम्हास तुमच्या पूर्वजांच्या देशात घेऊन येईल.22तुझ्या भावांपेक्षा तुला एक भाग अधिक देतो, मी स्वतः तलवारीने व धनुष्याने लढून अमोरी लोकाकडून जिंकलेला डोंगरउतार तुला देतो.”
1त्यानंतर याकोबाने आपल्या सर्व मुलांना आपल्याजवळ बोलावले, तो म्हणाला, “माझ्या मुलांनो, माझ्याजवळ या म्हणजे पुढील काळी तुमचे काय होईल, ते मी तुम्हास सांगतो.”
1त्यानंतर योसेफ आपल्या बापाला कवटाळून खूप रडला. त्याने त्याची चुंबने घेतली.2योसेफाने आपल्या सेवकांतील वैद्यांना आपल्या वडिलाच्या प्रेताला मसाला लावण्याची व भरण्याची आज्ञा केली. तेव्हा त्यांनी खास मिसरच्या पद्धतीने इस्राएलाचे प्रेत मसाला लावून, भरून तयार केले.3त्याकरता त्यांना चाळीस दिवस लागले, कारण तशा खास पद्धतीने प्रेत तयार करण्यासाठी तेवढा वेळ घेत. मिसरच्या लोकांनी त्याच्यासाठी सत्तर दिवस शोक केला.4सत्तर दिवसानंतर शोक करण्याचा काळ संपला, तेव्हा योसेफ फारोच्या शाही अधिकाऱ्यांना म्हणाला, “जर मला तुमच्या दृष्टीने कृपा लाभली असेल तर, फारोला हे सांगा,5‘माझा बाप मरावयास टेकला असताना त्याने मला शपथ घेण्यास सांगून म्हटले, “पाहा, मी मरणार आहे. माझी जी कबर मी आपणासाठी कनान देशात खणून ठेवली आहे तिच्यात तू मला नेऊन पूर.” तेव्हा कृपा करून माझ्या पित्यास पुरावयास जाऊ द्या; मग मी परत येईन.6फारोने उत्तर दिले, “जा आणि आपल्या बापाला शपथ दिल्याप्रमाणे त्यास पुरून ये.”7तेव्हा योसेफ आपल्या बापाला पुरण्यासाठी गेला. तेव्हा फारोचे सर्व अधिकारी व मिसरचे नेते आणि सर्व वडीलजन योसेफाबरोबर गेले.8आपले कुटुंबीय, आपले भाऊ व त्यांचे कुटुंबीय तसेच आपल्या बापाचे कुटुंबीय योसेफाबरोबर होते. फक्त लहान मुले व पशू एवढेच गोशेन प्रांतात मागे राहिले होते.9तो लोकांचा खूप मोठा समूह होता. सैनिकांची एक पलटणही घोड्यांवर व रथांत बसून मोठ्या संख्येने योसेफाबरोबर गेली.10ते यार्देन नदीच्या पूर्वेस अटादाच्या खळ्यावर आले, तेव्हा त्यांनी फारच मोठा शोक केला. योसेफाने त्याच्या पित्याकरिता सात दिवस शोक केला.11कनान देशात राहणाऱ्या लोकांनी अटादाच्या येथील हे प्रेतक्रियेचे विधी व संस्कार पाहिले तेव्हा ते म्हणाले, “मिसरच्या लोकांचा हा फारच दुःखाचा प्रसंग आहे.” त्यामुळे आता त्या जागेला आबेल-मिस्राईम असे नाव पडले आहे.12अशा प्रकारे याकोबाच्या मुलांनी आपल्या वडिलाने दिलेल्या आज्ञेप्रमाणे केले; 13त्यांनी त्याचे प्रेत कनान देशात नेऊन एफ्रोन हित्ती याजकडून कबरस्तान म्हणून उपयोगी पडावे यासाठी अब्राहामाने विकत घेतलेल्या मम्रे येथील शेतातील मकपेला गुहेत पुरले.14आपल्या वडिलाच्या प्रेतक्रियेनंतर योसेफ आणि त्याच्याबरोबर गेलेला सर्व समुदाय मिसरला माघारी गेला.